अंधारलेली रात्र
अंधारलेली रात्र
काय सखे अजुनी आज
दिस कां निघाला नाही
डोळे दुखून आले माझे
अ गं झोप कां लागतं नाही!!१!!
अंधारलेल्या रात्री अगं
पोट गेले खपाटीला
ताट पुढे असुनी भूक
मज कां लागतं नाही!!२!!
हात धरिता तुझा सखे अगं
मला अंगी कापरे येत आहे
या कळा वरुनी त्या कळावर
फिरतो याशी इलाज काय आहे!!३!!
स्वप्नं मनीचे माझ्यागं
आकाशी झेप घेत होते
आकाशातूनी उडताना
फक्त तुलाच पाहत होते!!४!!
अशी काय जादू केली
होती तूं अगं मला सांगना?
पारिजातकांचा सडा दारी
त्या सुगंधात धुंद होतोना?!!५!!
कुठे गेला तो गंध आज
सखे मला तू सांगना?
चूर्गळुन गेले स्वप्न माझे कां
नाश जीवनसाचा सांगना?!!६!!
