संगीत मार्तंड जसराजजी
संगीत मार्तंड जसराजजी
1 min
732
स्वरमय स्वरसाधका
स्वरमंडित पूजका
स्वराकाशी विहरता
शांतल स्वरचंद्र तू
स्वप्रकाशी संगीतातील
तेजस 'मार्तंड' तू
मग्न तू स्वरदर्पणी
चिंतनी स्वरमंथनी
अमृतस्वर शिंपिलेस
रसिकांच्या जीवनी
अवतरला अवनीवरि
स्वरनायक स्वर्गीचा
'जसराजा' 'स्वरराजा'
गंधर्व तू रे पृथ्विचा
आणि अशा महान गायकास जवळून ऐकणे हा क्षण आनंद देऊन गेला .. अभिमान वाटला .. भारतीय असल्याचा .. ज्या भारतात असा अद्वितीय कलावंत जन्मला.
