देव
देव
1 min
243
कधीच नसते
का रे सुट्टी तुला
वाचवतोस अपघातातून
प्रत्येकवेळी तुझ्या भक्ताला
कोणी तुझी करो
न करो भक्ती
वेळेला धावतोस
दाखवून तुझी शक्ती
कोणी मानत नाही तुला
कोणी मानते करून पूजाअर्चा
पण कधीच करत
नाहीस तू ह्याची चर्चा
नेहमीच असतोस
भक्तांना जपण्यात व्यस्त
कधीच होत नाहीस
गाऱ्हाणी ऐकून त्रस्त
देवा तुझे आहेत
आम्हावर थोर उपकार
तुझ्या या देणगीने
जन करी जयजयकार
अशीच राहू दे सदैव
पाठीशी तुझी खेळी
सावरत आम्हाला
अडीअडचणीच्या वेळी
