महाराष्ट्र गीत-1मे
महाराष्ट्र गीत-1मे
अंतराळी यान उडाले
चंद्रावर ते जाऊन बसले
भारत दर्शन मज झाले
मला रे महाराष्ट्र दर्शन झाले
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर
चारी दिशाना सुंदर डोंगर
सौन्दर्याने सारे नटले
फळा, फुलानी शेते सजले
बर्फ,वृक्षानी पर्वत नटले
सुंदर फुलानी सौंदर्य खुलले
भारत दर्शन मज झाले
मला रे महाराष्ट्र दर्शन झाले
किल्ले, लेणी, चारीधाम
अथांग सागर ,सुंदर शाम
पक्षी, प्राणी, जलचर सारे
सुगंधी वारे, सुंदर तारे
भारत दर्शन मज झाले
मला रे महाराष्ट्र दर्शन झाले
बारा ज्योतिर्लिंग पाहिले
जीवनाचे ते सार्थक झाले
मंदिर, मस्जिद, गुरुद्वार, विहार
चर्च चे मोठे मनोरे
सुंदर ते दिसले
भारत दर्शन मज झाले
मला रे महाराष्ट्र दर्शन झाले
सोनेरी किरण त्यावर सुंदर
तेजस्वी दिसे चौफेर
मनमोहक नक्षीदार
यानातून मज दिसले
भारत दर्शन मज झाले
मला रे महाराष्ट्र दर्शन झाले
अंतराळी यान उडाले
चंद्रावर ते जाऊन बसले
भारत दर्शन मज झाले
मला रे महाराष्ट्र दर्शन झाले.