मायमराठी
मायमराठी
1 min
13.3K
रूप मनोहर लेऊन
मराठी ही नटली
बोलीभाषांच्या राज्यात
साम्राज्ञी ही बनली
शालू शालीनतेचा नेसून
मराठी ही लाजली
सह्याद्रीच्या कडेकपारीत
दुमदुमू लागली
चंचल मराठी ही
मुखामुखात वसली
सार्या मराठमोळयांची
वाणी ही बनली
गर्जा महाराष्ट्र माझा
म्हणत महाराष्ट्र गाजवू लागली
महाराष्ट्राच्या जननीने
कीर्ती आसमंतात पसरवली
अंतकरणाशी साद घालत
हृदयाशी नाळ जोडत
स्वाभिमानाने तिने
हृदयात घरे केली.