STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

कोरोना..कोरोना..

कोरोना..कोरोना..

1 min
48

सांगतो मी माझं ऐकून घ्या ना

येणार नाही हा जीव पुन्हा,

नका पडू बाहेर करुन बहाना

बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...


बाहेर नको जाऊ खबरदार

खाऊ नका पोलीसांचा मार

नका करू कोणी तो गुन्हा...

बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...


घरातच आनंदी आनंद

दुनिया सारी आहे बंद,

समजून सांगतो पुन्हा, पुन्हा

बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना..


एकमेकांपासून राहा दूर सारे

जीवाची ह्या सारे काळजी घ्या रे,

करु नका मुळीच स्पर्श कुणा...

बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...


कोरोनावर नाही या मुळी उपचार

त्रस्त डॉक्टर, पोलीस, सरकार,

कळू द्या हे लोकांना..

बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...


Rate this content
Log in