STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

रातराणी

रातराणी

1 min
348

सांजवेळी उधळण तिमिराची

नभी होते जणू वर्षा चांदण्यांची


शुभ्र रातराणी फुलली अंगणी

तशी हसून मोहरली धरणी


आसमंती दरवळे अबोलशी

उल्हसित होई बेधुंद मनही


डोकावूनी हिमांशु स्मित हासूनी

जागवूनी प्रीत लाजली चांदणी


गंधाळल्या दाही दिशा मोहरुनी

प्रीत प्रियाची आठवी वेड्या मनी


शुभ्रकांती पुष्पांनी निशा नाहली

जणू स्वर्गच उतरला भूतली



Rate this content
Log in