STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

तुझ्या शहरात

तुझ्या शहरात

1 min
292

सुखात नांदतेस तू दिन रात

रोग बनून राहिलं प्रेम तुझ्या शहरात....


तुझ्या गल्लीनं माझं स्वप्नं मारलं 

तुझ्या घराकडे पाहून मी सारं हरलं

माझ्या डोळ्यापुढे निघाली तूझी वरात....


कोणी किंमत केली ना ईथे प्रेमाची 

आज ही पूजा करतो तुझ्या नामाची 

माझं मनं लागेना ईथे भाड्याच्या घरात....


तुझ्या प्रेमात जाग झालं ना भाग्य 

तुला कोणी मिळाला ते तूझं सौभाग्य

एकटा जगत आहे तुझ्या अश्रूंच्या पुरात....


तुझ्या शहरात माझी आत्मा मेली 

संगमला एकटं सोडून तू दूर गेली 

माझं मनं ही लागेना आज लातुरात.....


Rate this content
Log in