Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

4.4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

भारतीय संविधान- गीत.

भारतीय संविधान- गीत.

1 min
19.3K


प्रिय असे आपले भारताचे संविधान

वैचारिक लेखनीचा लाभला बहुमान

आम्ही नागरीक भारताचे सार्वभौम महान

एकतेने सर्वधर्म नांदतात किती छान!


स्वातंत्र्य, समानता, न्याय मूल्यांचे जतन

राष्ट्रीय एकात्मता,अखंडता संविधानाची शान

विश्वबंधुभाव जगात मिळतो भारताला सन्मान

शांतीची शिकवण देते भारताचे संविधान


आदर्श मूल्ये आपली संस्कृती जगी महान

जाती, धर्म, पंथ सारे तिरंगा ध्वजाचा सन्मान

वैरभाव कधी ना घडो राष्ट्रीय संपत्तीचे जतन

ऐतिहासिक वास्तुनचे व्हावे राष्ट्र संवर्धन


विचार अभिव्यक्तीने घडले आपले जीवन

अर्थ आला जगण्याला, बहुमोल संविधान

नित्य आपल्या ध्यानी असावे संविधान

नित्य नेमाने स्मरावेआपले संविधान


प्रत्येकाच्या रक्तात दिसतो भारतीय अभिमान

नसानसात प्रत्येकाच्या भिनावा राष्ट्रप्रेमाचा प्राण

जाती, धर्म वादाला इथे नसावे कधी स्थान

मानवाने, मानवाचा राखावा बहुमान


Rate this content
Log in