राजकारण
राजकारण
1 min
328
सुधारणांच्या ह्या हातांना
राजकारणाचा कंप सुटतो
मग कुठे जाळपोळ कुठे निदर्शनं
तर कधी कुठे संप होतो
विकासाच्या ह्या हिंदोळ्यावर
भ्रष्टाचाराचे झटके बसतात
मग कुठे समित्या कुठे सभात्याग
तर कुठे परिसंवादात खटके उडतात
निवडणुकींच्या ह्या दिवाळीत
आश्वासनांचे बार फुटतात
मग कुठे युती कुठे नीती
तर कुठे पक्षांतराची दारे खुलतात
मतदानाच्या ह्या गाण्याला
सहलींच्या चाली सर्रास लागतात
मग कुठे उपोषणं कुठे धरणं
तर कुठे विडंबनं हमखास छपतात
