STORYMIRROR

Sonali Parit

Others

3  

Sonali Parit

Others

नात्यांचे मोल

नात्यांचे मोल

1 min
190

पाहिले होते भलेमोठे स्वप्न

खडतर प्रवासाने अखेर सत्यात उतरले

मागे वळून पाहताना सारे अंधुक दिसत होते


पैशा मागे धावता धावता 

सारे काही मागे पडले होते

म्हणूनच की काय भल्या मोठ्या घरात

मी एकटीच राहत होते


तेच घर आता 

मला खायला उठतं होत 

सारे काही भयान होऊन बसले


स्वप्नपूर्तीचा आनंद करावा की

एकटेपणाचे दुःख कहीच

कळेनासे झाले 


पैशांची गरज आणि नात्यांचे मोल 

आता मला कळून चुकले होते

म्हणूनच पुन्हा नाती जोडायचे ठरवले 


कधी डोळ्यात पाणी तर ओठांवर हसू 

घेऊन नाती आनंद आणि सोबत देतात 

जीवन जगण्यासाठी पुरेसा आधार देतात


आयुष्याच्या मुळाशी नाती 

घट्ट धरून ठेवायचे आहेत आता

आनंदाने जगायचं आहे आता


Rate this content
Log in