Rahul Mohite

Others

3.5  

Rahul Mohite

Others

योगा डे

योगा डे

2 mins
99


योग हे आपल्याला आपल्या पूर्वज्यांच्या कडून मिळालेली एक अदभूत शक्ती आहे. आणि ही शक्ती भारतीय लोकांनमध्ये च प्राप्त आहे. योग ही आपल्या संस्कृती मध्ये मिसळून त्याचा उपयोग चांगल्या परिणामा साठी केला गेला आहे. जसे उदाहरण पाहिले तर नमस्कार ही संकल्पना योगा मधूनच आलेली आहे. जेवताना मांडी घालून बसने, प्रार्थनेला बसताना योग्य प्रकारे बसने, नजमा साठी योग्य प्रकारे बसून प्रार्थना करणे अश्या अनेक गोष्टी योगा मधून संस्कृती मध्ये सामावून समाज्या मध्ये त्याचा योग्य तो चांगला परिणाम होण्यासाठी वापर केला आहे.


योगा मुळे कित्येक प्रकारच्या व्याधी या कधी निघून जातील समजत नाही. योग केल्याने मन शांती मिळते, शारीरिक क्षमता वाढते, मानसिक संतुलन नीट राहण्यास मदत होते, वय हा फक्त नंबर राहतो पण शरीर हे पीळदार बनते, रोग प्रतिकार शक्ती वाढते. असे बरेचशे फायदे या योगा मुळे आपल्याला होत आहेत. ही योगाची पद्धत भारता मध्ये हजारो वर्षांपासून अवगत आहे याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे.


सध्याची परिस्थिती पाहता आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवण्यासाठी याचा फायदा घेऊ शकतो. श्वसनाचे खूप सारे योग प्रकार आहेत ज्या मुळे आपल्या शरीरातील विषारी वायू बाहेर फेकले जातात आणि लागणारे योग्य वायू आतमध्ये घेतले जातात या प्रकारांना प्राणायाम, भसरीका, सुदर्शन क्रिया इ सारखे अनेक प्रकार अवगत आहेत.


अत्ता योग्य वेळ आली आहे जी की या कोरोनाच्या काळात योग्य ते औषध तर उपलब्ध नाही तर मग आपण या योगा ची साथ धरून कमीतकमी आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि या हलकीच्या दिवसात आपले मानसिक संतुलन तरी नीट ठेऊ शकतो.

या काळात आपल्याला समजले असेल की आपले पूर्वज नेहमी सांगत असे की रोज न चुकता योगा केला की कोणतेच रोग जवळ येत नाहीत हे साध्य सिध्द होत आहे. आपल्या


याच योगा साठी बाहेरील देश्या मध्ये खूप मागणी आहे त्यांना याचे महत्त्व पटले आहे. आपली लुप्त होत चाललेली संस्कृती, कला ही आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी कशी ना कशी फायद्याची आहे तर तिला विसरून चालणार नाही. चला तर आपणही आपली संस्कृती जपू आणि वेळ काढून रोज थोडा वेळ का होईना योगा करू.


Rate this content
Log in