Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Ujwala Rahane

Others


1  

Ujwala Rahane

Others


याला जीवन ऐसे नाव

याला जीवन ऐसे नाव

1 min 119 1 min 119

किती सुंदर ते वनराईचे सौंदर्य,

निसर्गाने सहजपणे वसुंधरेला बहाल केले.

नक्की काय कमी आहे याचे कोडं मनाला पडले?

  

सगळे तर आहे मग कशाची नकारघंटा मनात खणखणते?


मन थोडं खट्टू होते आणि विचाराच्या धुंदीत विस्मरणात जातं.


खरंच निसर्गाला जे जमले ते आपल्याला का जमत नाही. मनाची संकुचित वृत्ती जागोजागी उद्रेक का पावते.


मुक्तहस्ते उधळण केलेले पण आपण जतन करू शकत नाही. विधात्याने चोच दिली आहे, चारा पण तोच देईल ही विचारधारा का?


अरे मुबलक दिले आहे जतन कर. जीवन सुंदर वनराईने नटवले आहे.


फक्त निसर्गाचा हा ठेवा जतन करायला परमेश्वराने बुद्धीचातुर्यता हे फार मोठी देणगी तुला बहाल केली.


आपल्या कोषातून बाहेर ये जग खूप सुंदर आहे. फक्त चष्मा बदल. जीवन तरण्याची पायवाट पण किती सुखकर बनवली आहे.


वाटेत परिस्थितीच्या अनुषंगाने खाचखळगे येतील, पण तो वातावरणातील बदल समज. फक्त जतन करायला शिक परत सांगते जग खूप सुंदर आहे आस्वाद घ्यायला शिक.


शेवटी काय-

किती सुंदर परिसर हा विधात्याने तुज बहाल केला. वाट जरी काट्याकुट्याची पण हा नजरेचा खेळ सारा.


आपण पाहावे तसे जग दिसते, हा नियतीचा नियम रे, मी पाहिले निसर्गाकडे तर आयुष्य खरंच एक सुंदर स्वप्न आहे रे!..


काय वेचायचे ते तूच ठरव, वाट उभी तुझ्या स्वागता, आपल्या कोषातून बाहेर ये तुला निसर्गाची आहे साथ,चल पादक्रमन घर खुणावते आहे ही मोकळी वाट!.


शोध घे सुखाचा गवसेल नक्कीच जीवनाचे सार,

खरे सांगू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! तुझ्या जीवनाचा शिल्पकार!


Rate this content
Log in