व्यसनाधीनता
व्यसनाधीनता
मी काही कामानिमित्त लातूरहून नांदेडला बसने प्रवास करत होतो. बसमध्ये एक व्यसनाधीन माणूस आला होता. तो बसमध्ये गोंधळ घालत होता. त्याची अवस्था विचित्रच दिसत होती, त्याला व्यवस्थित थांबता सुद्धा येत नव्हते. तेवढयात बसचा वाहक आला आणि त्याला बसमधून बाहेर काढला.
नंतर माझ्या मनात त्या माणसांविषयी अनेक विचार येऊ लागले ,हे अशी का अवस्था त्या माणसांची?
"मजा म्हणून"
कोणत्याही व्यसनाची सुरुवात ही व्यसन म्हणून होत नाही. तर मजा म्हणून तो केव्हा केव्हा दारु घेत असे. सुरुवातीला पार्टीत मित्राच्या शब्दाला किंमत देणे, आग्रह म्हणून अशाच कोणत्याही आनंदाच्या क्षणी दारु घेण्यास काही हरकत नाही. या समजुतीने व्यसनाची सुरुवात होते. त्यावेळी फक्त आनंद मिळविणे हाच त्यामागचा हेतू असावा. हाच आनंद आपणास व्यसनी होण्यास प्रवृत्त करीत असतो.
"नियमित मजा"
पुढे जाऊन ही मजा नियमित मजा होत जाते. व्यसनी व्यक्तीची मित्र मंडळी अशीच असते. एखादा मित्र बाहेरगावाहून भेटायला आला तर तो आला म्हणून त्याचे पाहूनचार सुद्धा दारुनेच साजरा होतो. म्हणजेच कधीतरी म्हणत नियमित मजा म्हणून सुरुवात करतात.
"व्यसन म्हणजे सुख"
हळूहळू या मजेची जागा सुख हा शब्द घेतो आणि तो दारुकडे पाहतो. दारु पिल्यावर झोप चांगली लागते, मनावरील ताण कमी होतो म्हणून, सतत घेत असतो. यात त्याला सुख वाटते.
"व्यसनाशिवाय राहू शकत नाही"
हळूहळू पूर्णतः व्यसनाधीन होतो.याच्यामुळे त्याचे शरीर, मन व्यसनाधीन होते.यामुळे घरदार,शेतीबाडी व संसार याची राखरांगोळी होऊन जाते.आत्मविश्वास नाहीसा होतो, निरनिराळ्या मानसिक विकृती निर्माण होतात सारासार बुद्धीपासून तो अतिशय दूर जातो. यामुळे त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात तो पूर्णपणे बुडून जातो. अशा मध्ये तरुण व्यक्ती फार मोठ्या प्रमाणात आहेत वरचेवर हे व्यसनाचे प्रमाण वाढतच चालले आहे.
अशा व्यक्तींना सुधारण्यासाठी चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. समाजप्रबोधनाची गरज असते, व्यसनाचे दुष्परीणाम किती वाईट असतात हे त्यांना समजावून सांगितले पाहीजे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाने संपूर्ण दारुबंदीचा निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर उद्याचे नागरिक असेच व्यसनी होतील.
असे वेगवेगळे विचार माझ्या मनात येत होते. वाईटही वाटत होते, चिंताही वाटत आहे.
