Deepali Thete-Rao

Others

3.4  

Deepali Thete-Rao

Others

वय

वय

2 mins
301


नवरा, दीर, सासू आणि त्यांना सपोर्ट करायला सहकुटुंब आलेली नणंद सगळेजण काही ना काही मुद्दा मांडत होते...बोलत होते.

...."आई किचनमध्ये येणार नाही. तिला आता जबाबदारीतून मोकळे करायचं"

......... 

  ती उभी होती..खुर्चीला टेकून ....कोपऱ्यात...एखाद्या गुन्हेगारासारखी. तिची लेक बाजूला खुर्चीत बसून तिच्या ओढणीशी खेळत होती. 

   तिघांचंही म्हणणं होतं..आई आता म्हातारी झाली आहे. तिला या वयात त्रास होता कामा नये. तिला आता कुठलेही काम सांगायला नाही पाहिजे....आणि बरंच काही असच... हिच्या चुका...हिचं वागणं..खूप काही...


    ती समोर उभी राहून सगळं ऐकत होती. खरंतर जे बोललं जातंय ते फक्त कानावर पडत होतं. तिच्या मनात द्वंद्व चालू होतं. नोकरी, घर आणि मुलगी सांभाळून ती शक्य होईल ते सगळं करत होती. कधीतरी..कुठेतरी एखादी गोष्ट राहून जायची अन् मग तिला अशा चौकशीला सामोरं जावं लागायचं. 


   आज नाही आणि आता पुन्हा कधीच नाही. हे कुठेतरी थांबवायला हवं. तिच्या मनातल्या धुगधुगीने पेट घेतला. किती दिवस चालणार हे असं. थोडे दिवस लांब राहिल्यावर कदाचित आपणही काही चुकत असू तर कळेल... आणि ती माहेरी जायला निघाली. 

............. 

   "जाऊ दे! किती दिवस राहते तिकडे ते तरी पाहू. आई तू जेवायचं बघ." नवरा म्हणाला.

"हो ना! नाहीतर काय! मी मुलांना थोडे दिवस तुझ्याकडे सोडते. तेवढीच तुला सोबत आणि आई खरंच मुलं भुकेलीही झाली आहेत. तुझी ती स्पेशल आमटीही बनव. किती दिवस झाले खाल्ली नाही." नणंदेनही तिची फर्माईश दिली. 

   कौतुकानं तिच्याकडे बघत सासुबाई लगबगीने त्यांच्या लेकरांसाठी स्वयंपाकघराकडे वळल्या. 

............. 

   लेकीला सोबत घेऊन घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडताना 'तिला' जाणवलं... सासुबाई खरंच म्हाताऱ्या झाल्यात... वय झालंय त्यांचं...

..पण फक्त तिच्यापुरतंच... कदाचित केवळ तिच्यासाठीच...


(अर्थातच नाण्याची दुसरी बाजूही नक्कीच असेल. ) 


Rate this content
Log in