कू.शुभम संतोष केसरकर

Others

4.6  

कू.शुभम संतोष केसरकर

Others

वृद्धाश्रम-गरज की अपरिहार्यता

वृद्धाश्रम-गरज की अपरिहार्यता

4 mins
712


जन्म देणारी आपली आई , घडविणारे आपले वडील व ह्या दोन्ही एकनिष्ठ शब्दांचे स्वरूप म्हणजेच आपले आई - वडील. खरोखर आई-वडील ह्या विषयी लिहिणं म्हणजेच कधी कधी खूप अवघड होऊन जाते , कधी कुठून सुरवात करावी ह्याचे अक्षरशः भानही राहत नाही. स्वतःचे सर्व सुख-सोयी एका बाजूक ठेऊन ज्यांनी आपल्याला शिकवलं , ज्यांनी आपल्याला घडविलं , स्वतःच्या पायावर ज्यांनी उभं केलं असे हे परमेश्वराचे रूप म्हणजेच आपले आई - वडील . शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते महाविद्यालयीन शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या सर्व सुख-सोयी वेळेवर व त्वरित पुरविणारे ते आपले आई-वडील, बाळा सर्व घेतलंस का, डबा वेळेवर खाऊन घे हा , सावकाश जा आणि सांभाळून ये , शाळा/ महाविद्यालय व्यवस्तीत चालू आहे ना?? , पाठ बरोबर अभ्यासतो आहेस ना?? असे व बरेच काही बाबतीत आपली सदैव विचारपूस करणारे ते आपले आई- वडील , कधीही कोणत्याही गोष्टीत कसलीही उणी न भासू देणारे ते आपले आई - वडील . माया , प्रेम , काळजी, भीती , आपुलकी व अभिमान ह्या सर्व विशेषणात्मक बाबी पारदर्शकतेप्रमाणे आपल्यात पाहणारे , व वरील सर्व गोष्टी स्वतः सुद्धा तितक्याच आपुलकीने अनुभवणारे ते आपले आई- वडील , मग ह्या सर्व गोष्टी अवगत असतानाही आई-वडील हे दोघंही मुलांसाठी एके काळी भार कसे वाटू शकतात??


ज्यांनी जीवाचे रान केलं , दिवसरात्र ज्यांनी रक्ताचं पाणी होई पर्यंत कष्ट केले ते एके दिवशी एका भारप्रमाणे वागविले का जातात ?? ह्याचे उत्तर मिळणे हे जणु दिवसेंदिवस अशक्यच वाटू लागले आहे. एकेकाळी सर्व काही ऐकणारा माझा मुलगा आज साधी माझी एक गोष्ट सुद्धा ऐकत नाही किंवा माझ्या बोलण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो ह्या सर्व गोष्टी आम्हाला खरोखर वेदनादायक आहेत , त्यांच्यामते (आई-वडिलांच्या) की ज्या काळात आम्हाला आमच्या मुलांची अतिशय गरज भासते त्या काळात आमची मूलं आमच्यावर लक्ष देण तर दूर आम्हाला बघत सुद्धा नाहीत . वरील वर्णिलेल्या सर्व गोष्टी वर्तमानकाळात तेवढयाच तत्परतेने व आशयपूर्वक आपणास बघावयास मिळतात. ह्या सर्व गोष्टींचे मुख्य वास्तववादी कारण म्हणजेच आई- वडिलांनी आपल्या पाल्यास शिकवून मोठे करणे , व स्वतःच्या पायावर उभे करणे. खरोखर आई- वाडीलांसाठी ह्या सर्व गोष्टी पुढे जाऊन खूप वेदनादायक ठरतात व विपरीत परिणामसुद्धा उद्भवतात. कधीकधी आपणांस असेही पाहावयास मिळते की त्यांच्याच घरात त्यांना स्वखुशीने कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्याची सुद्धा मुभा उरत नाही प्रत्येक गोष्टीत त्यांना "नाही" हा शब्द त्यांच्या कानावर नेहमी पडतो , मुलं विसरतात की ज्या आई-वडिलांची ऐपत नसतानासुद्धा कधीही आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीत "नाही" म्हणाले नाहीत ती मुलं त्यांना त्वरित बोलून मोकळे होतात , खरोखर ह्या सर्व गोष्टी नैराश्यस्पद होऊन राहिल्या आहेत. जेव्हाही त्यांच्या मुलांना कळत की आपण आपल्या आई-वडिलांना सांभाळू शकत नाही त्याच क्षणी ते त्यांना " वृद्धाश्रम" ह्या ठिकाणी नेऊन सोडतात , का म्हणून तर आम्हाला आता आमचे आई-वडील एका भारप्रमाणे वाटू लागले आहेत , ह्या सर्व घराच्या खर्चात आम्ही आमच्या आई- वडिलांचा सांभाळ करू शकत नाही , ते आम्हास न पटणारे सर्व गोष्टी आमच्यावर लागू करू पाहतात , व मुख्य म्हणजेच की आम्हाला आता एक स्वतंत्र जीवन जगू द्या , नको त्या कोणत्या अटी , नको त्या कोणत्या जवाबदाऱ्या असे सर्व बोलून ती मुलं आपले हात वर करून आपल्या सर्वस्व आई-वडिलांना परकीय "वृद्धाश्रमात" पाठवून देतात व स्वतःच्या जवाबदरीतून स्वतःला मोकळं करतात . " वृद्धाश्रम " ही एक गरज अथवा अपरिहार्यता सुद्धा तितक्याच प्रमाणे असू शकते, मुख्यतः ही स्थिती त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून असते की ते कोणत्या विचाराने आपल्या भावी आयुष्याकडे बघू इच्छिता, पण ह्या सर्व गोष्टी अत्यंत क्लेशदायक व अत्यंत वेदनादायक ठरतात , ज्यांच्या कर्तृत्वाचे ऋण आपण लहानपणी फेडण्याचे ठरवितो त्यांनाच त्यांच्या घरातून आपण निघून जाण्यास प्रवृत्त करतो व एका अपरिचित व्यक्तीकडे सोपवून त्यांना आपण मोकळे करतो. व त्यात एक चांगली गोष्ट अशी होते की त्या आई-वडिलांना हक्काने त्याठिकाणी जगता येते व आपल्या समान वयाच्या व्यक्ती सोबत विचारविनिमय करता येते व ह्यासर्व गोष्टीत कोणाचे टोकने अथवा अडथळा येत नाही.

"वृद्धाश्रम" ही गरजे पेक्षा अधिक व संतुष्टपणे जगण्यात आनंद देते, की त्या चार भिंतीत ते त्यांना हवे तसे राहू शकतात व त्यांना जे पाहिजे ते काम शकतात . सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास असे समजून येते की "वृद्धाश्रम" हे वृद्धांसाठीचे दुसरे घरच म्हणावे लागेल पण ते त्यातल्या त्यात एक वेदनात्मक विषय म्हणावा लागेल , असे म्हणतात की वार्धक्य ही स्थिती आपल्या बाल्यावस्थेतील दुसरा टप्पा म्हणावे तर त्यात काही खोटं ठरणार नाही . जीवनात बाल्यावस्था, तारुण्य , वार्धक्य असे तीन टप्पे असतात व त्यातील बाल्यावस्था,वार्धक्य हे महत्त्वपूर्ण टप्पे मानले जातात ते असे की बाल्यावस्था ह्यात आपण काही जीवनातील विशेष गोष्टी शिकण्यास प्रारंभ करतो व वार्धक्यात आपण त्या गोष्टी शिकून परिपक्व होऊन जातो , व जीवनात प्रत्येक कठीण परिस्तितीस कसे सामोरे जाऊ ह्यातही आपण निपुण होऊन जातो. मुख्यतः बोलावे तर वृद्धाश्रमाची गरज ही सध्यातरी खूप महत्त्वाची व गरजेपुर्ण झालेली आहे. जागोजागी बघावे तर जिथे तिथे वृद्धाश्रम हे महत्वपूर्ण झालेले आहेत , ही एकतर गर्वाची बात असावी किंवा आपल्या समाजाचा हा एक नाजूक कणा म्हणावा. वृद्धाश्रमात जाणे म्हणजे कुटुंब तोडणे नव्हे तर आपले कुटुंब वाढविणे , आपल्या बाबतीत घडलेल्या प्रत्येक सुख-सोयी आपल्या परिजनांसोबत चर्चा करणे , आपल्या प्रत्येक दिवस परिक्रमेत त्यांना स्वखुशीने सहभागी करून घेणे व असेच बरेच काही गोष्टी आपणास ह्या "वृद्धाश्रमात" पाहावयास मिळतात व त्याचप्रमाणे पुढच्या पिढीस ते अनुभवयास सुद्धा मिळतात. कठीण प्रसंग , अपरिचित घटना व अचानक उद्भवलेल्या कारणास्तव " वृद्धाश्रम" हे अपरिहार्य म्हणजेच न टाळता येणारे ठरते, वृद्धांची सेवा करणे , त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करणे व त्यांना होणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगाचे निवारण करणे हे प्रत्येक " वृद्धाश्रमाचे" एक महत्वपूर्ण कार्य ठरते. ह्या सर्व बाबींना एक प्रकारे लक्षात घेऊन आपणांस समजते की "वृद्धाश्रम" ही बदलणाऱ्या काळाची गरज व काही अपरिहार्य कारण सुद्धा ठरू शकते.Rate this content
Log in