Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

विस्मरण

विस्मरण

2 mins
217


अजय जागा झाला आणि उठल्या बरोबर तो कावराबावरा होऊन घरात अनोळखी माणसा सारखा फिरू लागला त्याला समजेना तो कुठे आहे.

         समोरून सायली गुडमाॅर्निग म्हणत आली पण अजय ला काही ती कोण आहे ते कळेना. "अजय तू चहा घेणार आहेस का?"किचन कडे जाता जाता सायलीने विचारले पण अजय अवाक होऊन फक्त तिला पहातच होता तिला न्यहाळत होता. सायलीला वाटल आज अजय चा मुड तिची चेष्टा करण्याचा दिसतोय. अजय मात्र सैरभैर झाला होता वयानं चाळीशी गाठलेला अजय स्वतःला काॅलेज मध्ये असल्याच समजू लागला होता. राहत घर ही त्याला ओळखत नव्हते कारण तो विस वर्षापूर्वीच आयुष्य जगू पहात होता.


त्याच विचित्र वागणं सायलीला काही कळेना झालं. होते. अजय तिला जवळ येऊ देत नव्हता तो तिला परकी स्त्रीच समजत होता.सायलीचा आता बांध फुटला होता तिने अजयला डाॅक्टरला दाखवायचा निर्णय घेतला आणि त्याला काॅलेज ला जाऊया सागंत ती डाॅक्टराकडे घेऊन गेली. 

डाॅक्टर हा असा का वागतोय?

अहो तो मला स्वतःच्या बायकोला ओळखत नाही. काॅलेजला जायचं म्हणतो. काय होतय याला डाॅक्टर? किती तरी प्रश्न सायलीला सतावत होते. 

डाॅक्टर थोडा वेळ अजय शी बोलले आणि त्यांनी सायलीला बोलावलं. 

'सायली मला वाटतं आपण चोवीस तास वाट पाहूयात याला शाॅर्ट टर्म मेमरी लाॅस म्हणतात'

याला कसला तान ,टेन्शन आले आहे का किंवा तो खूप शांत शांत असतो का? 'डाॅक्टर सायलीला म्हणाले. 

डाॅक्टर घरात तर खूप खेळकर असतो तो ऑफिस मध्ये एवढा तान असेल असं नाही वाटत की तो इतपत वागेल.

डाॅक्टर शांतपणे हसले. 


अहो काही लोकं आपल्याला झालेला त्रास असा कुणाला सागंत नाहीत किंवा दाखवत ही नाही. म्हणून त्यांना त्रास होत नाही असे नाही मग ते आपल्या जुन्या दिवसातील आवडीचे दिवस जगण्याचा प्रयत्न करतात काही वेळा ते चालू गोष्टी पूर्ण विसरतात ही. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली आता अजयला काही आठवले नाही तर काय होणार या विचाराने ती कावरीबावरी झाली. सायलीची तगमग डॉक्टरांनी हेरली. त्यांनी सायलीला शांत व्हायला सांगितले आणि थोडे दिवस अजयच्या गावी जायला सांगितले. अजयला कोणताही ताण,त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली. 


सायलीने लगेचच गावाकडे जायचा निर्णय घेतला आठवडाभर अजय चागंलाच रमला काॅलेजात जाणं येणं तो करत होता सायलीही त्याची सावली बनून त्याच्यासोबत जात होती. आठवडा झाला तरी हा असाच वागत आहे हे पाहून सायलीला काळजी वाटू लागली होती तिने पुन्हा डॉक्टरांना फोन करून विचारले. डाॅक्टरानी तिला थोडे थांबायचाच सल्ला दिला. अजय ही आता निवांत वाटत होता. आई बाबा ही आता त्याची काळजी करू लागले होते पण अशातच एक दिवस सकाळी सकाळी अजय सायलीला नेहमी बोलवायचा तशी हाक मारत बाहेर आला आणि तो पूर्वीसारखा बोलू ही लागला. सायलीला तर आनंदाचा पारावार उरला नव्हता तिने घडलेले डाॅक्टराना कळवले. तिला आता हायसे वाटू लागले होते. अजयची काळजी घे असा सल्ला डाॅक्टरानी तिला दिला.


Rate this content
Log in