Pradnya Tambe-Borhade

Others

2  

Pradnya Tambe-Borhade

Others

विश्व लेखणीचे!!

विश्व लेखणीचे!!

2 mins
140


 लेखणीच्या साहाय्याने लेखक मनात असणाऱ्या विशाल सागरातून शब्दांची योग्य ती सांगड घालत सुचलेल्या विषयांवर लेखन करुन आपल्या सुंदर भावना व्यक्त करत असतो.      लेखकाच्या लेखनीत इतकी विविधता असते. कधी तो पोटभरुन हसवतो, तर...., कधी त्याच्या लेखनाने भावनिक होऊन अश्रूंचा बांध देखील फुटत असतो.

       लेखनीचे विश्व इतके अद्भुत आहे. एकदा का लेखन प्रवासाला सुरवात केली की मग आपल्या भोवताली,भूतकाळात,भविष्यकाळात ज्या घटना किंवा वास्तवात जे दिसते ते सर्व लेखनीच्या रुपात लेखक त्याच्या उत्तम भाषाशैलीत लिहित असतो.

       लेखनीच्या विश्वात लिहित असताना कथेमध्ये इतके गुंतून जातो कि तर आता पुढे काय होणार???? याची उत्सुकता लागते. तर काही वेळा या लेखकाला माझ्या बद्दल कसे काय एवढे माहित हुबेहुबे कथेत वर्णन केले आहे. असे जाणवते.

      लेखनीचे विश्व मोठे असले तरी ती लेखकाला या विशाल सागरातून अचूक शब्दरुपी माणिक- मोती कसे वेचावे हे अचूक समजते.

      एकदा का मनापासून लेखन केले कि त्यात इतके गुंतून जातो. कोणताही विषय नसताना मनातल्या भावनांवर चक्क एक कथा लिहली जाते. रहस्यमय, विनोदी, भावनिक कथांवर लेखन करता येते.

      एखाद्या व्यक्तीला आपण समोरा-समोर बोलण्यास थोडे घाबरत असतो. अश्यावेळी लेखनीच्या सुंदर माध्यमातून आपले मन मोकळे करत त्याच्या जवळ व्यक्त होत असतो. 

      वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा देखील या लेखनीच्या विश्वातून देत असतो. वाढदिवसादिवशी आपल्या सोबत जोडला गेलेला व्यक्तिचा प्रवास, त्याच्यासोबत घालवलेले अनमोल क्षण, एकमेकांची केलेली मदत सगळे, प्रत्येक वेळी आभार मानता न आल्याने लेखनीच्या रुपात त्या व्यक्तीबद्दलच्या भावना मांडू शकतो.


    अथांग अश्या विश्व लेखनीत इतके रमून जातो की लेखन करताना वास्तवाचाही विसर पडतो की काय???? असे वाटते. आणि आपण निर्माण केलेले हे आभासी जग हवेहवेसे वाटू लागते. 

       काल्पनिक कथा लेखन करताना प्रत्यक्ष ती घटना समोर घडत आहे असेच जाणवते. उदाहरणार्थ : डाकू एका गुफेत खजिना चोरायला आले आहेत. त्या गुफेत हिरे, माणिक, मोती, यांच्या पेटीच , पेटी इतरत्र दिसून येतात. तर त्या गुफेला टांगलेल्या कपड्यातही पैसे, हिरे असतात. ते डाकू ते चोरणार तितक्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. सर्व डाकू खजिना भरून ठेवतात. गुफेत लपून बसतात. पोलिसांच्या हाती न लागता तिथून निघून जातात. अश्यावेळी गुफा, पैसे, माणिक, मोती सगळे नजरेसमोर दिसू लागतात.

      लेखणीच्या विश्वातला खजिना ज्याला कळला तो या विश्वाचा राजाच म्हणावा लागेल. एवढे ज्ञानामृत समजून घेऊन आपल्या कथेच्या रुपाने वाचकांसमोर जाहिर करणे म्हणजे कलेचा अविष्कार घडवून आणण्यासारखे आहे.


Rate this content
Log in