Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

"विद्यार्थी शिक्षणपद्धती"

"विद्यार्थी शिक्षणपद्धती"

3 mins
653


   शिक्षणपद्धती अन विद्यार्थी विकास हा अती महत्वपूर्ण जडनघडनाचा प्रकार आहे.भारतीय शिक्षणपद्धती ही प्राचीन संस्कृतीची धरोहर असायला पाहिजे. आपली भारतीय संस्कृतीची महान ख्याती आहे. साऱ्या विश्वात एक वेगळीच ओळख आहे.  

कारण या संस्कृतीने भारत देशाला अाजही एकतेमध्ये गुंफुन ठेवलेले अाहे. म्हणुन शिक्षणपद्धती ही प्रगत देशासारखी अष्टपैलूसारखी चमकणारी पाहिजे.आज इंग्रजी भाषेला महत्व आलेले आहे.म्हणुन विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने सर्व शाळेत इंग्रजी शिकवायला पाहिजे. पण आपली संस्कृती ही जपली पाहिजे. संर्वांगाने विचार करायचा झाल्यास भारतिय श्रेष्ठ संस्कृती आहे.व प्रत्येक विद्यार्थ्यावर ती छाप स्पष्ट दिसायला हवी. 

     भारत देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जातीचे,धर्माचे एक वेगळेपण आहे. या संस्कृतीमधे पारदर्शकता दिसून आली पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे खान,पान वैभव व वेशभूषा,परंपरा अाणि बोली भाषा आहेत.

 या गोष्टीचे प्रामुख्याने प्रदर्शन व्हायला पाहिजे. आणि अप्रतिम अशी ऐतिहासीक कार्याची ओळख शिक्षण प्रणालीत सामावून आपली संस्कृती जपली पाहिजे. नैसर्गीक वातावरणाचा मुलांना अभाव असतो. तो विद्यार्थ्यावर व्हावा म्हणुन वारंवांर सहल, पिकनिकला न्यायला पाहिजे,मानसिक दृष्ट्या या संर्वाचा मनावर परिनाम होवून त्यांचा तान कमी करायला पाहिजे. 

       प्रशस्त प्रगतिशील खेळाचे मैदान असायला पाहिजे. अनेक प्रकारे विद्यार्थ्यावर खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण दिले असता हमखास विद्यार्थ्यांना आनंद मिळून ती प्रगती साधू शकेल.आज विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे भरगच्च ओझे आहे. अभ्यासानेच विकास होतो असे नाही, आज पालक आपल्या मुलांना बंदिस्त केल्यासारखी वागणुक देत आहे. आपल्या मुलांना डॉक्टर,इंजिनिअर,क्लास वन ऑफिसरच्या रूपात पाहु इच्छीतात,त्यावर मोठ्या महागड्या शाळेची फीस भरतात व मुलांवर बंधने लादण्याचा प्रयत्न करतात, विद्यार्थ्यांवर लादले गेलेले बंधने कमी करण्याकरीता प्रथमत: शाळेने मदत करायला पाहिजे.मार्क कमी पडलेत म्हणुन शाळेत पाल्यांना बोलवतात विद्यार्थ्यांची कंप्लेंट करतात. पाल्य घरी आल्यानंतर पुर्ण राग आपल्या मुलांवर काढतात.मुलांशी कठोर बोलतात.किंवा त्यांना अपमान झेलावा लागत असतोय.

    मुलांना समजून त्यांच्या आवडीनिवडीचा विषय देवून ताठ मान करण्याची संधी देवून त्यांच्या कलात्मक प्रवृत्तीला पंख देण्याचे धाडस केल्याने पालक व बालक दोघेही सुखी होवू शकतात. 

        विद्यार्थ्यांचा विकास घडवायचा म्हणजे काय,तर त्यांना प्रताडित करून मनाविरूद्ध डीग्रींसाठी हट्ट धरून मुलांचा आनंद हिरावतांना दिसतात. मनाविरूद्ध पालकांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचा खटाटोप मोठ्या प्रमानात दिसून येतो. आणि विकास घडवण्याच्या नादात कधी निराशा पदरात येवून पडत असते. आणि अभिमानाची पायमल्ली होतांना दिसून येत असते. आमचा मुलगा विदेशात डॉक्टर आहे ,किंवा इंजिनिअर आहे.आईवडीलांना सांगतांना डोळ्यात वेदनाच दिसत असतात .पालकांच्या इच्छेखातर किंवा आंनदासाठी मुलेही प्रयत्न करतांना दिसतात.

      म्हणुन विद्यार्थ्याची आवड समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना सक्षम करायचे म्हणजे पालकांना व शिक्षकांना चतूर्विद नजर ठेवून वागावे ,व मुले काय करतात अर्धवट ज्ञान घेवून फेसबुक वॉल, व्हॉट्स अप, ट्विटर किंवा काही ब्लॉग्ज यांमधून चूकीचा मार्गाने माहिती मिळवतांना बघायला मिळते. विद्यार्थ्याच्या संर्वांगिन सक्षमी करणाकडे पुर्णतया शाळेचे व पालकाचे लक्ष पाहिजे. तेंव्हाच विद्यार्थी सक्षम होईल आहे.

     कोठून तरी काही तरी ऐकलेली वा वाचलेली माहिती, मनघंडत गोष्टी यांवर विश्वास ठेवण्याचा प्रकार वाढण्याचे कारणही हेच आहे. या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. अर्धवट ज्ञानातून त्यांना झालेले आकलन दूर करून विषय सुस्पष्ट करण्याची,आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या चौकटीच्या प्रक्षेपनातून मांडण्याची आणि मानवतापुर्ण संस्कार करण्याची जबाबदारीही शिक्षकांची आहे. पारंपरिक शिक्षणाच्या चाकोरीबाहेर जाऊन हे संस्कार करावे लागणार आहेत. अन्यथा अर्धवट माहिती आणि ज्ञानाच्या आधारे दिशाभूल झालेल्या तरुणांची मोठी फौज तयार होण्याचा धोका आहे.

      मागील पिढीत विद्यार्थ्यांमध्ये जेवढे गुन होते, तेवढेच गुन आजच्या विद्यार्थ्यांत आहे. तंत्रज्ञानामुळे आजचा विद्यार्थी सुदैवाने पुढे आहे. व तो माहितीसंपन्न होऊ शकतो. आजच्या आणि कालच्या विद्यार्थ्यांतील महत्त्वाचा फरक आहे तो हा ,माहितीची साधने जशी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, तशीच ती शिक्षकांनीही त्यांचा वापर करणे गरजेचे ठरते. आजच्या विद्यार्थ्याची चर्चा करताना आजच्या शिक्षकाचीही चर्चा म्हणूनच आवश्यक ठरते. माहिती आणि ज्ञान यांतील फरक उलगडून दाखवून विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्याचे आव्हान आजच्या शिक्षकांसमोर उपस्थित आहे. तेंव्हा अश्या शिक्षणपद्धतीने विद्यार्थी सक्षमतेची जीत होवू शकते.व  माणसाला माणूस बनवितो.

"शिक्षणाची अमुल्य समृद्धी

जीवन जगायला शिकवितो

शिक्षण हे प्रगतीचे द्योतक 

माणसाला माणूस बनवितो"


Rate this content
Log in