विचारांची ताकद
विचारांची ताकद
या सुंदर जगात अनेक प्रकाराची लोक राहतात. काही चांगल्या विचारसरणीचे तर काही अविचारी लोक राहतात. या सुंदर जगात उपहास व निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या विचारांचा आपल्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
एका शास्त्रज्ञानें त्याच्या अथक प्रयत्नाने ओबडधोबड पहीले स्वयं चलीत वाहन आणले. त्याच्यावर खुप टीका झाली, तुच्छतेने लोक त्याला काहीही नावे ठेवले गेले. लोक त्याला पाहिले की हसायचे.त्या शास्त्रज्ञाने यांच्या कडे लक्ष न देता आपल्या बनविलेल्या वाहनात सुधारणा केले . आणि ते वाहन सर्व लोकांना फार आवडू लागले. लोकांची आकर्षण वाढू लागले. ते वाहन अगदी सर्वांनाच आवडू लागले आणि त्याने असे भरपूर वाहने निर्माण केले आणि पाहतो तर तो वाहनांची बॅक्ट्रीच उभा केला. आणि सर्वत्र याच्याच वाहनांची विक्री होऊ लागली. तो थोडयाच दिवसात फार पैसा कमाई लागला. अगोदर त्याला नावे ठेवणाऱ्या लोकांच्या विचाराकडे तो लक्ष दिले नव्हते.
तो सतत सकारात्मक विचार करायचा, प्रत्येक वेळी चांगलेच विचार करायचा. वाईट विचाराकडे तो लक्ष देत नसे. म्हणून तो आज चर्चेचा विषय बनला आहे. तो कसा होता आज काय केला तो मोठा श्रीमंत माणूस बनला आहे. जन्मभर एकच ग्रंथ वाचून चांगलेच विचार करून यशस्वी बनले पाहिजे. प्रगती केली पाहिजे याला जगात तोड नाही. असे म्हणत त्यातील वचनांना प्राधान्य देणे या गोष्टी विचारशिलतेला सोडून असतात.
एखादी विभूती आदर्श मानून तिच्या समानच होण्याचा प्रयत्न करणे हा आपल्या विचारांचा पराभव करण्यासारखा आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तीमत्व अडथळा येऊन मनुष्य गुलामगिरीत लोटला जातो. विविध विषयांवरचे ग्रंथ वाचणे, चाळणे, पाहणे यावर सारासार विचार करणे ही सवय लावून घेतली पाहिजे. जगात चांगला किंवा वाईट असं काहीच नाही आपले विचारच चांगला किंवा वाईट ठरवत असतो.
गौतम बुद्धांनी सांगितले होते, की ,"मी सांगतो म्हणून माझे ऐकू नका. एखादी गोष्ट तुमच्या विचारांच्या अनुभूतीच्या आधारावर घासून पहा. तेच तुमच्या साठी सत्य होय".म्हणून ऐकताना, वाचताना आपण आपला स्वतंत्रपणे विचार करावा. घटनेने नागरिकांना विचार स्वातंत्र्य दिले ते स्वतंत्र विचार करण्यासाठीच. खरोखरच जीवन ही एक विचार यात्रा आहे.
