Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pallavi Udhoji

Others


2  

Pallavi Udhoji

Others


व्हॅलेंटाईन डेच का

व्हॅलेंटाईन डेच का

3 mins 413 3 mins 413

प्रेमाचा दिवस साजरा करायला व्हॅलेंटाईन का?

प्रेमाची व्याख्या करणे खूप मोठी गोष्ट आहे. प्रेमाविषयी अनेक दिग्गज लेखकांनी लिहिलेले आहे. प्रेमाबद्दल वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर त्याला कोणी एकमेकांमधली संवेदना म्हटले आहे, तर त्याला कोणी आव्हान म्हटले आहे तर कोणी त्याला प्रेरणापण म्हटले आहे तर कोणी त्याला भावनिक गुंतवणूक आहे. मंगेश पाडगावकर यांनी अगदी सोप्या भाषेत प्रेमाची परिभाषा सांगितली आहे. ‘तुमचं आमचं सेम असतं ते प्रेम असतं.’ तरीपण आतापर्यंत कुणीही प्रेमाबद्दल कोणाला काहीच सांगता आलं नाही.

       

प्रेम म्हणजे नक्की काय असतं हो? तर प्रेम म्हणजे एकमेकांमधला सहवास, एकमेकांची काळजी करणं, एकमेकांची भावनिक जपणूक, एकमेकांना प्रेमात झोकून देणं, प्रेमासाठी वाट्टेल ते, जबाबदारी यालाच प्रेम म्हणत असावं.

       

आज काहीजण म्हणतात की आईचं प्रेम हे सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे. मला इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो हा की, आईचं प्रेम हे श्रेष्ठ असं म्हणतात मग तीच आई आपल्या होणाऱ्या बाळाला कचऱ्याच्या डब्ब्यात का फेकून देते? हीच आई आपल करीयर व आपली शरीररचना बिघडू नये म्हणून ती आपल्या बाळाला पोटातच मरू देते. जगण्यासाठी पैसे हवे, घरात पैसे हवे तर हीच आई तारुण्यात प्रवेश करणाऱ्या आपल्या मुलीला विकून कुंटणखान्यात सोडणारी ती आईच ना. एवढंच नाही तर लग्न झाल्यानंतर मुलावर हक्क दाखवून सुनेचा छळ करणारी तीपण आईच ना? सगळ्यांमध्ये आईच प्रेम कुठे आहे. तिचं प्रेम आटलं का? हा प्रश्न मला भेडसावत राहतो. पाडगावकर म्हणतात, तुमचं आमचं सेम असतं, मग हे प्रेम कुठल्याच नात्यात का दिसत नाही. हेवे दावे, दुष्टपणा, भांडण, हत्या, द्वेष हे सगळं का दिसतं, प्रेम का राहत नाही?

      

खरं प्रेम करणारे कधीही द्वेष करत नाही. फेसबुकच्या माध्यमातून विचार केला तर फोटोला आपल्यापेक्षा तिला किती लाईक्स मिळाले, एवढंच नाही तर घरातल्या वाटण्यामध्ये माझ्यापेक्षा हिला का हिस्सा जास्त तर मिळाला नाही ना? आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती गर्लफ्रेण्ड रात्री कुणाशी चॅट तर करत नसेल ना? किंवा माझा नवरा बाहेर कुण्या दुसऱ्या स्त्रीला भेटत तर नसेल ना? हे सगळे असताना तरीही आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो.

        

माझ्या मते खरा व्हॅलेंटाईन डे असा असावा की, दिवसात आपण एखाद्याला दुखावलं तर त्यांची मनापासून क्षमा मागून त्याच्याविषयी प्रेमाची भावना दाखवणं. आपल्या दैनंदिन जीवनात फसवणाऱ्या समोरच्या माणसाला बाबा रे तुझं नेहमी भलं होवो. तुझी माझ्यासारखी फसगत नको व्हायला. मनातल्या मनात त्याला आशीर्वाद देत. माझ्या मते खरं व्हॅलेंटाईन हा असा व्हायला हवा.

        

प्रेमाचा दिवस आपण त्याच दिवशी साजरा करतो. आजच्या दिवशी सगळ्यांशी चांगले वागायचे ठरवतो. राग, अपमान, नुकसान, फसवणूक झाल्याची भावना, विश्वासघात, या एक दिवसासाठी विसरायला हवं. तेव्हाच खरा व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकू

      

आपल्याकडे या दिवशी गुलाबाची फुलं, हार्ट शेपचे फुगे, चॉकलेट्स, वस्तू, गिफ्ट देऊन साजरा करतात. काही जण अगदी या दिवसाची वाट बघतात की मी या दिवशी माझ्या पार्टनरलां प्रपोज करून आपल्या प्रेमाची कबुली देतात. या दिवशी शब्द देतात, गिफ्ट देतात, यालाच आजची पिढी खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करते.

      

खरं प्रेम काय असतं ते व्यक्त करण्यासाठी कोणताही दिवस लागत नाही. वेळ किंवा जागा लागत नाही. त्याला कोणत्याही म्युझिकची गरज भासत नाही. ते कसंही व्यक्त करता येतं. ते व्यक्त करण्यासाठी ते नजरेतून, काहीही शब्द न बोलता अनुभवलेल्या मनाच्या कोपऱ्यात, पाण्याने भरलेल्या डोळ्यातून व्यक्त करता येतं. ते प्रेम फक्त समजायला हवं, ते आपल्या आजूबाजूला वावरत असतं, जवळचं असतं, फक्त ते दिसत नाही. त्याची एक स्वतःची भाषा असते. त्याची स्वतःची एक लिपी असते, संवाद असतो, त्याला समजायला अंतर्मनाची शक्ती लागते. हलकेच असे तरंग उमटू लागतात. ते तरंग खूप काही तुम्हाला सांगून जातात. ते फक्त तुम्हाला एकता आला पाहिजे.

      

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं अंतर्मन आपल्याला स्वच्छ दिसायला हवं. स्वतःकडे बघण्याची दृष्टी ही तुम्हाला स्वतःला असायला हवी. स्वतःवर जीव तोडून प्रेम करा मग तुम्हाला आपोआप प्रेम करण्याची अनुभूती मिळेल. आणि त्याच दिवशी खरा तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा होईल.


Rate this content
Log in