Bhagyashri Chavan Patil

Others

2.0  

Bhagyashri Chavan Patil

Others

व्हायरस म्हणजे नक्की काय??

व्हायरस म्हणजे नक्की काय??

4 mins
519


           व्हायरस म्हणजे आपण अजाणतेपणे केलेल्या निसर्गाचा नाश नाहीतर तर मग असा हाहाकार माजतोस कसा?? पण आपल्याला त्याचं काय असा म्हणुन माणूस जगतो आहे.. पण आपलं काहीतरी चुकत आहे असं कधीचं कोणाच्या लक्षात येत नाही बरं काहीच दिवस झाले या व्हायरस ने आपली जागा सगळीकडेच काबीज केली आहे पसरत आहे सगळीकडे अंधकार पसरला आहे बरं ही बातमी ऐकून हृदयाचा ठोकाच चुकला कारण जस जसं त्याच नाव कळाल तसच काही माणसे मृत्युमुखी पडले असही समजलं सगळी डॉक्टर मंडळी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत की काहीतरी याच्यावर उपाय मिळू देत आणि आपण सगळेच यातून सही सलमात बाहेर येऊ पण खंत एकाच गोष्टीची वाटते की माणसे अजूनही याला हसण्यावारी नेत आहेत कसं कळत नसेल या लोकांना की काहीतरी भयंकर घडत आहे त्यासाठी आपण निदान जागरूक तरी असल पाहिजेत तरीही माणसे ऐकेणात म्हणून एक दिवसाचा कर्फु जाहीर केला तर काही जागरूक अशी लोकं घरताच बसून राहिली काहींनी सरकार द्वारे आलेल्या नियमाचे कठोर असे पालन केले तर काहींनी सरळ रस्त्यावर येऊन मोर्चा काढला थोड चमत्कारिक आहे पण असु देत..

           

तरीही हा व्हायरस काही पसरायच थांबेना म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी यावर तोडगा म्हणून आपण घरातच थांबुन या व्हायरस शी दोन हात करूया देशासाठी काहीतरी एकत्र करण्याची संधी मिळाली आहे त्याचा पूर्णतः आपण विचार करून त्याला सहकार्य करूया त्यासाठी २१ दिवस सुट्टी देण्यात आली आणि घरातच रहा अशी विनंती ही केली त्यावर ही नेटकर मंडळी आपली त्यावर हसण्यावारी भाष्य करत आहेत काही लोक तर अजुन ही या बाबतीत तितकीशी जागरूक नाही आहेत म्हणूनच तर पोलीस कर्मचारी यांना ही जबाबदारी दिली आहे काही भागात तर लोक घाबरून पळून ही जात आहेत तर कोणी काहीतरी मला झालं आहे असं सांगत ही नाही आहे त्यामुळे सर्वसामान्य जनते मध्ये खळबर माजली आहे त्यामुळे त्यांचे काम अजूनच कठीण होतं चाललं आहे त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं ठरल आहे..

          

 खुप वाईट वाटतं जेव्हा शिकली सावरलेली माणसे ही अश्या गोष्टी करताना दिसत आहेत बरं ज्यांच रोजच पोट कामावर आहे त्यांचं एक कळू शकत त्यांना काही पर्याय नाही बरं ती ही लोकं सहा फूट अंतर ठेवून भाजीपाला फळे विकत आहेत काही जण तर तोंडाला मास्क लावून जागरूक राहिले पाहिजेत असा संदेश देत आहेत  पण दुसरीकडे मात्र कधी कधी नवल च वाटतं आतापर्यंत सुट्टीच का नाही म्हणून सगळे लोक कांगावा करत होते जस की काम करणारा प्रत्येक माणूस हा कोणीतरी मोठा पदाधिकारी आहे आणि थोड दिवस नाहीच निघालो बाहेर तर सगळ बरखास्त होऊन जाईल मग तस बघायला गेलं तर पण भारताच्या अर्थ व्यवस्थेचं रोजच नुकसान होतं आहे मग त्यांनी पण हाच विचार केला तर मग आपल्याला फरक पडेल असा स्वतःचा स्वार्थ साधतो आहे म्हणूनच अशी वेळ सगळ्यां वरती आली आहे..

        

   पण अशी सुट्टी आपण लहान असताना ही बघितली आहेच की काहीच न करता वेळ जात होता तेव्हा फक्त आपल्या डोक्यात मजा मस्ती मौज सगळ्या प्रकारच्या पार्ट्या एकत्र येऊन केलेलं जेवणं रात्र रात्र बाहेर राहणं बाहेरच खाणं पिणं आणि मग काय म्हणतात त्याला weekend साजरा करायला मिळत नाही आहे कारण आता गरजा खुप वाढल्या आहेत म्हणूनच तर सगळ्यांची गोची होत आहे म्हणुच घरी पाय थांबत नाही आहे आणि मला नाही वाटत दुसरे काही कारण असावे पण या २१ दिवसात आपण सगळा वेळ घरातल्यांच्य बरोबर घालवूच शकतो त्यांची विचारपूस त्यांची काळजी घेऊ काही जणांना वर्क फ्रॉम होम अशी ही काम आहेत ती करा इतरनेट आहे त्याचा उपयोग जन जागृती साठी करूया आपण असा बेफान वागवून पोलिस कर्मचाऱ्यांना खुप ञास सहन करावे लागत आहे फक्त आपल्यासाठी म्हणून ते आज रस्त्यावर आपली काळजी घेत उभे राहिले आहेत त्यांचे ही कुटुंब आहेत त्यांचा ही विचार आपण करूयात आणि या व्हायरस ला लवकरात लवकर पळवून लाऊयात.. 

           

पण विचार केला तर चांगली गोष्ट घडली आहे कधी ना दिसणारी चिमणी पाखरं आज दारासमोर बागडताना दिसली गोष्टी तरी चिमणी आज दारापाशी आली नवलच आहे ना काय करणार माणूस जस पेरवत आहे तसच ते उगवत आहे कारण या मुळे का होईना पशू पक्षी प्राणी बाहेर तरी आले म्हणाल तर खुप मोठं अस संकट आल आहे किवा निसर्गाने दिलेली शिक्षा आहे म्हणून तर आता तर आपण नीट डोळे विस्फारून बघुया आणि शहाणे होऊया नाहीतर तर कोणी तरी म्हटलं आहे सिर सलामत तो पगडी पचास हे धोरण पाळूयात आपल्या मुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची आपणच काळजी घेऊयात ज्यांना अजुन ही गोष्ट साधी वाटतं असेल त्यांना समजावून सांगायचे काम आपण करत राहूया देशातील प्रत्येक शहराचे नाव कोरोना यादीत येणार नाही याची दक्षता घेऊया आता थोडे शहाणे होऊन आपल्या देशाला वाचवूया. आणि याबरोबरच देवाच्या रुपात अवतरल्या त्या लोकांना जरूर आठवून एकदा तरी त्यांना नतमस्तक होऊया जेणेकरून त्यांना ही थोडतरी बळ मिळेल संकटाशी सामना करायला आणि मग एकदा का कोरोणा मुक्त आपण झालो की सगळेच कंबर कसून कामाला लागू या कारण नंतर अशी सुट्टी मिळेल का आणि आपल्या घरातच राहायला मिळेल का याची दिवसा ढवळ्या स्वप्न रंगवू या म्हणूनच त्यामुळे या सुट्टीचा सदुपायेग करा घरातच राहून स्वतला आणि इतर लोकांनाही तसे पशू पक्षांनीही निरोगी ठेऊ या...


Rate this content
Log in