Sangieta Devkar

Others

3  

Sangieta Devkar

Others

वेलकम 2021

वेलकम 2021

3 mins
210


डिसेबर महीना सुरु झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते नवीन वर्षा च्या आगमनाचे,येणाऱ्या वर्षात काय काय करता येईल याचा विचार सगळे जण करत असतात. नवा उत्साह, नवा जोश,नवे स्वप्न,यांची शिदोरी सोबत घेवून आपण नव वर्षाचे स्वागत करतो.

आजच्या आधुनिक युगा मध्ये नात्याची वीण ढिली होत आहे, इतरां सोबत आनंद वाटून घेण्याची वृती दुर्मिळ होत चालली आहे. एकीकडे दोन वेळ च्या जेवंणाची भ्रांत पडलेली असताना दुसऱ्या बाजूला 31 डिसेबर कसा साजरा करायचा या नियोजनात महिना भर आधीच गुंतलेली तरुणाई दिसत आहे. तसेच आपलेपणा,आपुलकी,प्रेम याने ओतप्रोत भरलेली काही माणसे आज अंधारातील उजेड बनून दाहिदिशा उजळवून टाकत आहेत. सकारात्मक विचार घेऊन नव्याने जगण्याची सुरवात करणारी काही तरुणाई पहिली की त्यांना सलाम करावासा वाटतो.आजकाल अपयशा ची कारणे सांगनारे बरेच जन असतात्,परिस्थिती,पैसा,शिक्षण अशी कारणे देवून अपयश आले असे सांगतात,पण धेययवादी माणसे संघर्ष करत जिद्दिने विजय ही मिळवतात.सकारात्मक विचार आणि मनाची तयारी असेल तर कोणती च गोष्ट अशक्य नसते,नववर्षात नव निश्चय,आणि संकल्प हवा.धावत्या जगासोबत धावत असताना अनेक प्रकारचे लोक भेटतात ,विविध प्रवृति चे,स्वभावाचे ,त्यांमुळे काहीवेळेला मनस्ताप ही होतो,यासाठी आपल्या मनावर ताबा असणे गरजे चे आहे.,यासाठी काही गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात.

स्वता :साठी वेळ काढा- घरातील काम आणि नोकरीतील ताण,यामुळे स्वहता कड़े म्हणावे तितके लक्ष देता येत नाही, दिवसभरातील 10 ते 15 मिनिटे स्वतः साठी राखुन् ठेवावीत,या वेळेत आपल्याला आवडेल ते काम जसे संगीत ऎकने,व्यायाम करने,आपल्या आवडत्या कलेला वेळ देणे,जेणे करुन् आपले मन प्रफुल्लित होईल,उत्साही होईल.

सकारात्मक विचार करा- एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा विचार करने ही मानवी मनाची वृत्ती च आहे. मग विनाकारण त्या गोष्टी चा विचार करने, त्याचा बाऊ करने आणि मनस्ताप करुन् घेणे हा आपला स्वभाव बनून जातो,अशा परिस्थितीत सकारात्मक विचार करने,आपला आत्मविश्वास ढळू न् देणे आपल्याच हातात असते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा.

स्वता ची कामे स्वता करा- दुसऱ्या वर अवलंबून राहायची आपल्याला खुप सवय असते,त्यामुळे आपली कामे होत नाहीत् उलट मनस्ताप होतो,म्हणून कामाचे नियोजन करुन् आपले काम आपणच करण्या कड़े कल असावा,यामुळे कामा ची शिस्त आपोआप लागते.

नवीन वर्षाचे स्वागत चांगल्या गोष्टिनी केले तर म्हणजे आपल्या प्रियजनांना,नातेवाईकाना मेजवानी देण,सहलीचे आयोजन करण,आपल्या क्षेत्रातील व्यक्ति सोबत काहि चर्चा सवांद साधने,चांगल्या विचारांचे आदान प्रदान करन,चर्चासत्र आयोजित करने,मित्र मैत्रिणीना घरी बोलावून गोड़ धोड खाउ घालने,,उगाचच नवीन वर्ष सेलिब्रेशन म्हणून ड्रिंक्स करण्या पेक्षा गोड धोड़ खाणे केव्हा ही चांगलेच!

आयुष्यातील एक वर्ष सरलं म्ह्णून जरी आयुष्य एक वर्षाने सरलेलं असल तरी जगण सरलेलं नसतं आणि जगताना तारतम्य बाळ्गावेच लागते हे विसरून ही चालत नसतं.रोज दैनंदिनी लिहायची सवय करावी,एखाद्या ब्लॉग लिहावा,,मग वर्ष संपता संपता ती रोजनिशी उलगडून पहावी त्या लिहिलेल्या कविता,कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात यात एक वेगळाच् आनंद मिळेल.

सरलेलं वर्ष आपल्याला बरंच काही शिकवून गेलेल असत जे आपल्याला पूढ्च वर्ष जगण्यासाठी उपयोगी पडणार असतं. त्यामुळे आपण सरलेल्या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे आपण मनाशी ठाम ठरवायला हंव. मागील वर्षीच्या शेवट्च्या मध्यरात्री प्रत्येकाने काही मिनिटे एकान्तात स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं आपण कोण आहोत ,आपण काय आहोत, आपल्याकडे काय आहे, हे सारं विसरून, आपला अहंकार बाजूला सारून जीवन क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर जीवनात आपण असं काही केल आहे का ज्यामुळे आपण जग सोडल्यानंतरही लोक आपल नाव आदराने घेतील ? या प्रश्नाच उत्तर सापडताच जर प्रत्येकाने स्वतःच्या नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्प केला तर येणार प्रत्येक नवीन वर्ष सर्वांनाच सुखा समाधानाच आणि समृध्दीचच जाईल .


Rate this content
Log in