Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

वेळेचे महत्त्व

वेळेचे महत्त्व

1 min
79


आयुष्यात पाहीजे ते मिळविण्यासाठी आवश्यक आहे ती आपली मेहनत कारण जगात काहीही अशक्य नाही आहे. आपण फक्त एखादी गोष्ट ठरवावी लागते. आणि त्यानंतर त्या गोष्टींचा पाठलाग करावा लागतो.आणि एक दिवस ती गोष्ट आपल्याजवळ आलेली असते. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर तसेच काहीतरी.

     आज अगदी सर्वत्र माणसांची वर्तणूक, समज झाली आहे की मला कष्ट, मेहनत न करता मिळावे. तेही चांगल्याप्रकारे मिळावे. आणि काहीही मेहनत करायला लावू नये. मेहनत दुसऱ्यांनी करावे. दुसऱ्यांनी कामधंदा, काबाडकष्ट करावा आणि आपण मात्र आरामात बसून रहावे. अशी नीती आज सर्वत्र पहायला मिळत आहे. आज मेहनत करणारे फार थोडे लोक समाजात दिसतात. आणि तीच लोक भविष्यात यशस्वी होतात. मग पुन्हा म्हणायची वेळ येते की याच्या जवळ काहीही नव्हते. पण कशी कमाई केली असेल देव जाणे? कशी मिळकती केली. पण त्यामागची मेहनत दिसत नसते. तेव्हा फक्त त्याच्याकडील पैसा दिसतो. .     आणि अशी मेहनती करणारे लोक भविष्यात काहीतरी करणारे असतात. आणि तेच यशस्वी होतात. जे मेहनत करणारे नसतात ते आपले आहे त्यातले थोडे थोडे मोडून खात बसतात. आणि शेवटी शिल्लक काहीही उरत नसते. तेव्हा कळते "काय होतास तू काय झालास तू". 

     मग वेळ गेलेली असते. वेळ कोणासाठी थांबत नसते. तेव्हा कळते वेळेचे महत्त्व. वेळ ही फार मौल्यवान आहे त्या वेळेचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. 


Rate this content
Log in