वेळ (अलक)
वेळ (अलक)
एक चोर होता, तो दररोज चोरी करून लोकांची घरं फोडून त्यांची संपत्ती मिळवायचा, अर्थात चोरच तो! त्याच्याकडे मिळवलेली खूप संपत्ती होती, त्याची बायको त्याला नेहमी सांगायची की असं वागू नका पण तो काही जुमानत नव्हता तिला.. ईश्वराच्या कृपेने त्याला एक गोंडस मुलगी झाली, त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, अहो आता तर घरात एक सुंदर परी आलीय तिच्यासाठी तरी आता हे असं चोरी करणं थांबवा.. उद्या मुलगी माझे बाबा चोरी करतात हे तिला कळल्यावर काय वाटेल? आता मात्र चर्रकन त्याचं काळीज सरकल, लेकीच्या निमित्ताने का होईना त्याने आता चोरी करणं सोडून दिलंय.. उद्या लेक गर्वाने सांगू शकेल की माझा बाप राबराब राबतो आणि कष्टाने, आनंदाने आम्हाला पोसतो... खरच वाल्याचा वाल्मिकी होण्यास वेळ लागत नाही,फक्त त्याची योग्य वेळ यावी लागते...
