Rahul Mohite

Others

3.5  

Rahul Mohite

Others

वैद्यकीय प्रतिनिधी

वैद्यकीय प्रतिनिधी

5 mins
659


जेव्हा जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिक मध्ये डॉक्टर ना भेटण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा आपल्याला तिथे सूट बूट टाय घालून खूप लोक दिसतात. आपण तिथे पेशंट म्हणून बसलो असतो आपल्या मनात एकच सुरू असते आपला नंबर कधी येईल आणि कधी एकदा त्या डॉक्टर ना भेटेल तेवढ्यात च हे सूट बूट वाले मध्ये येतात आणि डॉक्टर कडे जातात खूप वेळ गप्पा मारतात पेशंट चा वेळ वाया घालवतात असे तुम्हाला कायम वाटत असेन ना? किंवा अशी भावना खूप वेळा पाहायला भेटते. पेशंट म्हणून तुमची भावना बरोबर आहे पण हेच सूट बूट वाले डॉक्टर कडे गप्पा मारतात याचे कारण ही तसेच आहे आणि ते तुम्ही नक्की जाणून घ्या.


ते नेमके काय करतात हो?? वैधकीय प्रतिनिधी म्हणजे काय हो??

साध्या उदाहरणा पासून सुरू करू- सध्याच्या काळात अमेरिकेने भारता कडून कोरोना रोखण्यासाठी साठी मागविलेले औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन याचा उच्चार करणे इतके अवघड पण त्याचे रासायनिक गुणसूत्रे, योग्य उच्चार इ गोष्टी हे सहज पारंगत असतात आणि अर्ध्या रात्रीत त्यांना विचारले तरी ते नीट उच्चार करून सांगू शकतात तो आहे वैद्यकीय प्रतिनिधी.

* वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजे कोणी ऐरा गैरा व्यक्ती नसून तो एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे.

* शिक्षणामुळे त्यांना औषधांचे चांगली माहिती असते जसे की औषधाचे प्रमाण, औषधाचे गुणसूत्रे, फायदे, ते औषध कसे काम करते, त्याचे दुरुपयोग इ.

* सूट बूट टाय घालून असतो म्हणजे तो रोज तश्याच सोसायटी मधील सगळ्यात उच्च शिक्षित लोकांना भेटत असतो त्यांच्या सोबत गप्पा मारत असतो.

*कष्ट काय याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी पहाटे पासून ते रात्री उशिरा पर्यंत डॉ ना भेटून कुठे ऑर्डर असेल तर ती नीट पोहचली का याची खात्री करूनच यांचे काम संपते.

*त्याच्या कडे प्रबळ ईच्या शक्ती असते कारण तो कोणत्याही ऋतू मध्ये आपले काम थांबवत नाही. कितीही ऊन असो, कितीही पाऊस असो, कितीही थंडी असो तो आपले नित्यक्रम सोडत नाही.

*गाडी हे त्याचे मूलभूत वाहन आहे. ती कशी व्यवस्थित ठेवायची सोबतच ती नीट कशी चालवायची याचे धडे ही त्यांनी घेतलेले असतात त्याला वैद्यकीय प्रतिनिधी म्हणतात.

*नियोजन काय असते हे त्यांच्या कडून शिकण्या सारखे आहे. उदा- आदल्या दिवशी रात्री पुढच्या दिवसाचे नियोजन करून म्हणजे आपली कामाची बॅग, उद्या कोणाकोणाला भेटायचे आहे, कोणाला कोणत्या वेळी भेटायचे आहे इ सगळे प्लॅन तयार करूनच तो आदल्या दिवशी झोपी जातो.

*पर्यायी मार्ग निवडून आपले काम पूर्ण कसे करावे हे यांच्या कडून शिकले पाहिजे. उदा- एक डॉ आज नाही भेटले तर त्यांच्या कडे प्लॅन १ प्लॅन २ प्लॅन ३ सगळे तयार असते आणि तो ते पूर्ण करतोच.

*मल्टि टास्किंग म्हणजे काय याचे हे एक उत्तम उदाहरण आहे जसे की यांना आपल्या दैनंदिन कामात आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या प्रत्येक प्रॉडक्टचे नाव, टार्गेट कस्टमर कोण आहेत, ते कश्या पद्धतीने काम करत आहेत इ. सगळ्या गोष्टीवर कटाक्षाने नजर असतेच, डॉक्टर ना भेटने सोबतच केमिष्ट आणि घाऊक व्यापारी यांच्या सोबत चांगले संबंध जोडणे इ.

*प्रेडिक्शन मार्केट मध्ये नवीन कोणता मॉलेकुल/औषध येत आहे का याचा परिणाम भविष्यात आपल्या प्रॉडक्ट वर काही होऊ शकतो का, महिना सुरू होण्या आधीच या महिन्यात किती बिझनेस होऊ शकतो इ गोष्टीत पारंगत असा वैद्यकीय प्रतिनिधी.

*तंत्रज्ञानात पारंगत कोणतीही नवीन तंत्रज्ञान बाजारात आले की त्याचा वापर करून आपल्या साठी कसा फायदा करून घेता येईल याचे उदा. डिजिटल इंडिया सोबत सारी फिल्ड आयपॅड वर शिफ्ट झाली. याचा फायदा घेऊन नवीन नवीन व्हिडिओ आणि आकडेवारी ही मांडणे सोपे करून घेतले.

*एकाच वेळी आपल्या प्रॉडक्ट चे हजारो प्रतिस्पर्धी प्रॉडक्ट ची नावे लक्ष्यात ठेवणे.

*भौगोलिक परिस्थिती चे ज्ञान घेणे सोबतच भौगोलिक दृष्ट्या सगळ्या भागातील रस्ते आणि रस्ते माहिती करून घेणे.

*ओळखी- कुठेही गेलात तर यांच्या ओळखीचे भेटतेच किंवा एकाद्या अनोळखी व्यक्तीची बोलून ओळख काशी काढता येईल याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी.

*सगळ्यात वेगळा विचार करणारा व्यक्ती उदाहरण एकदा प्रॉडक्ट बाजारात विकायचा म्हणजे काही ना काही वेगळे पणा पाहिजेच तसेच हाही आपण सगळ्यात वेगळा कसे याचे कायम उत्तम उदाहरण बनू शकतो.

*स्काय इज द लिमिट या तत्वावर कायमस्वरूपी काम करणारा.

*कधीच हार न मानणारा आज ना उद्या डॉ आपले प्रॉडक्ट चा वापर करून पेशंटला फायदा होईल असा विचार करून त्यांना वारंवार न चुकता भेटत असतात. ही एक खुप छान गोष्ट यांच्या कडून शकण्या सारखी आहे.

* जितके काम करतात तितकेच ते आपल्या काम सोबत बाकी सगळ्या गोष्टी चा आनंद लुटत असतात.

* कोणत्या भागात काय चांगले खायला भेटते किंवा त्या भागाची खासीयत काय याचे उत्तम उदाहरण.

* विश्वास कसा असावा याचे सगळ्यात अतिउत्तम उदा म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी कारण हे रोज कोणत्या ऑफिस मध्ये जात नाहीत किंवा कोणत्या बॉस ला रोज भेटत नाहीत यांचे संपूर्ण काम हे याच विश्वासावर सुरू असते.

*प्रामाणिक पणा ही रोजच्या रोज काय काम केले हे आपल्या कंपनी ला नचूकता प्रामाणिक पणे कळवतो.

* आत्महनिर्भर तो कोणावर अवलंबून नसतो शक्यता या वळणावर येणारे हे सामान्य कुटुंबातून आलेले असतात आणि ते नेहमी स्वतः चे काम स्वतः करतात. आर्थिक दृष्टीने पाहिले तर ते या नोकरी मध्ये येऊनच खूप काही मिळवतात.

वैद्यकीय प्रतिनिधी एक आत्मनिर्भर व्यक्ती.

*छोट्या खोलीत राहून चांगला पगार घेऊन प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती.

*फाटलेल्या बुटा पासून ते अगदी ब्रॅण्डेड वस्तू वापरणारा.

*एखाद्या गरीब पेशंट ला आपल्या ओळखीच्या लोकांन कडून फ्री सॅम्पल मिळवून सामाजिक बांधिलकी जपणारा.

* नाविन प्रॉडक्ट बाजारात आल्या नंतर डॉक्टर पासून ते सगळ्या मेडिकल वाल्याना समजावून सांगणारा दुवा.

*कधी काळी अपमान सहन करून पण हसून बोलणारा व्यक्ती.

*शिकलेला असून सुद्दा हॉस्पिटल मधील सर्व कामगारांना मनाने वागवनारा माणूस, थोडक्यात माणुस्की व दुसऱ्यांची मानसिकता जपणारा.

*जेवणाचे ठिकाण जेथे वेळभेटेल तिथे आपली दुचाकी मधल्या स्टँड वर लावून नैसर्गिक एअर कंडिशनर चा आस्वाद घेत डब्बा खाणे, किंवा कोणत्याही हॉस्पिटल कॅन्टीन मध्ये खाणे तेही सगळं कामावर अवलंबुन असते. वेळ भेटला तर ठीक नाही तर जसा आहे तसा डब्बा परत घरी.

*बॅग ही त्याची ओळख. जसा जादूगार बॅग मधून साहित्य घेऊन फिरतो जणू तसेच हाही आपल्या बॅग मधून अगदी महत्वाचे साहित्य घेऊन रोज फिरत असतो आणि त्याचे वेळेनुसार उपयोग करतो.

*तो डॉक्टर सोबत गप्पा मारतो म्हणजे त्याच्या कडे इतके ज्ञान असेल म्हणूनच असेल ना??


हो त्याच्या कडे मार्केट मधील नवीन येणाऱ्या औषधा विषयी माहिती असते. भारतात किंवा भारता बाहेरील देशात होणारे नवीन संशोधना विषयी त्यांना ज्ञान असते. बऱ्याचदा डॉक्टरांना आपल्या व्यस्त नियोजनात वेळ भेटत नाही आणि असे संशोधन त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही तर ते त्यांच्या पर्यंत कसे पोहचता येईल याचे प्रयत्न नेहमी करत असतो. आणि याचा फायदा हा नक्कीच पेसेन्ट लोकांना होत असतो कारण त्या अनुषंगाने डॉक्टर वेगवेगळी औषधे पेसेन्ट ला देऊन पेसेन्ट चा पैश्याचा भार, गोळ्या कमी करण्याचा भार, कमी साईड इफेक्ट होण्यासाठी मदत करतात असतात.


आधीच्या काळी तर डॉ याच वैद्यकीय प्रतिनिधी ना भेटण्यासाठी खूपच आतुर असायचे आणि येणार आहे असे समजल्यास आपल्याला बस किंवा रेल्वे स्थानकात जाऊन त्यांची भेट घेत असतात याचे कारण आपण वर वाचलाच असाल.


असे सगळे गुण हे एका व्यक्ती मध्ये असतात आणि तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून वैद्यकीय प्रतिनिधी हा आहे.

तो डॉ कडे वेळ घेतो म्हणून त्याला कसे पाहिजे तसे वागऊ नाका तो ही एक माणूसच आहे. तोही एक उच्च शिक्षित माणूस आहे त्याला हॉस्पिटल किंवा क्लीनक मध्ये थोडातरी आदर दिला पाहिजे. असा हा व्यक्ती डॉक्टर, केमिष्ट, घाऊक व्यापारी आणि कंपनी मधील दुवा वैद्यकीय प्रतिनिधी.


Rate this content
Log in