वाटणी
वाटणी
3 mins
206
- व्यक्ती आणि समाज यांच्यात आंतरक्रिया घडवून व व्यक्तीच्या सामाजिकरणाला प्रारंभ करणारी पहिली आणि महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंब. कुटुंब हा एक प्राथमिक समूह आहे. कुटुंब संस्था निर्माण झाल्यापासून खऱ्या अर्थाने माणसाच्या प्रगतीला व त्यांच्या सामाजिक विकासाला गती मिळते. अशा एकत्रित कुटुंब पद्धतीत घरातील सर्व माणसे आपलीसी वाटतात. प्रत्येक काम सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने करायचे. प्रत्येक काम वाटले जायचे. एकमेकांशी आपुलकीचे नाते घट्ट चिकटून असायचे. कुटुंबातील एखादी व्यक्ती चुकत असेल तर सर्वांनी मिळून त्यास मायेने समजावून सांगत. एकत्रित असताना एखादा भाऊ दुबळा असेल तर त्याचे काम सर्वांनी मिळून पार पाडत असतात. घरात कोणलाही एकट्य भासत नव्हता. गावात व इतरत्रही अशा एकत्रित कुटुबाचा आदरयुक्त दरारा होता. आपल्या घराकडे पाहणाऱ्या इतर लोकांची एक वेगळीच आदरार्थी दृष्टी असायची.
- अशा घराकडे सर्व लोक एक आदर्श नजरेने पाहत असतात. एकमेकांची मुले-- बाळे केव्हा मोठी झाली हे जन्म देणाऱ्या आईबाबांना पण माहिती नसते. प्रत्येकांनी सर्वांच्या मुलाबाळांचा सांभाळ करित असत. कोणतेही कार्य सर्वांनी मिळून आनंदाने पार पाडत. घरात व आनंदी व उत्साही वातावरण असत. घरातील प्रत्येक माणूस एकमेकांचे ' सांभाळत असतात. घरातील सर्व मुलांकडे सर्वांनी समान नजरेने पाहत असतात. अशा घरातील "संस्कार" इतर मुलांना व सर्वांना घेण्या योग्य असतात. घरात एकमेकांशी आदराने वागत. घरातील सर्व भावंडे आणि स्त्रीया आपलेच आहेत असे आदराने, सामंजस्य पणाने वागतात.कोणीही एकमेकांन हेवा करीत नसतात.कोणतेही काम, गोष्टी आपापसांत चर्चा करुनच निर्णय घेतला जातो. अशा घरात एकमेकांचे सुख-दु:ख वाटले जातात. जसे एक तीळ सात भाऊ वाटून खालले जातात. अगदी त्याचप्रमाणे या घरात वातावरण व चालीरीती होत्या. पण अशा घराला कोणाची नजर लागते माहिती नाही दुधात विरजण कोणीतरी टाकते.
- चांगले चालणाऱ्या घराला कोणीतरी आडवे येते.चांगले चालणारे घर काहीना पहावे नसत. काहीही करुन घर फोडायचे प्रयत्न करतात. आणि होत्याचे नव्हते एका क्षणात होते, घरातील मंडळी भांबावून जातात, चलबिचल होतात.एकमेकांत असलेला आपलेपणा दूर होतो, आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून दूर:ख सरळ दिसते. घरातील सर्वांना जेवण जात नाही. सर्वांचे मान, पान याकडे दुर्लक्ष होत होते. हे सर्व कशामुळे तर केवळ "वाटणी" मुळे. घरातील नाते मध्ये दुरावा निर्माण होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या चुली कराव्या लागत. वाटणी ही गनीमांची टोळी, दोन्ही हातात दुधारी तलवार घेऊन घरात , मनं छापणारे, भावना कापणारी, नाते चिरडणारी, मस्तकं जोडणारा ती, पोटच्या आणि पाटच्याला पाण्यात पहायला लावणारी गोष्ट म्हणजे "वाटणी" होय. हसतं-खेळतं घर क्षणात मोडून पडतेपडते या वाटणी मुळे.
- ज्या क्षणी ही वाटणी घरात येते ना त्या क्षणी घरातील आपलेपणा, एकोपा घराबाहेर जातो. म्हणूनच अशा वाटणार आमचा विरोधच आहे. वाटणी हा विषय आला तर चार भिंतीच्या घरात अनेक भिंती तयार होतात. तिरस्काराच्या, मत्सराच्या, रागाच्या, स्वार्थाच्या, लोकांच्या, द्वेषाच्या आणि या भिंती घरातल्या माणसांचे जीवन मुश्किल करतात. कालपर्यंत असलेला सभ्यपणा आज परकेपणा होऊन जातो. आपण वाटणी मागतो आणि तो मिळतो ही. पण सुखाच्या वाटा मात्र बंद होतात. घरातलं हसणं रुसून जातं, आणि रुपांतर खदा-खदा हसू लागतं. क्षणभर आपल्याला वाटते आपण स्वतंत्र झालोझालो, मोकळे झालो, आता अधिकार पण दुसऱ्या क्षणी त्यातली क्षणभंगुर जाणवू लागते.सख्या भावाने मायेने फोडलेला हंबरडा लाख . त्याची तुलना नाही. असे म्हणतात की, जाळाशिवाय "कड" नाही आणि मायेशिवाय "रड" नाही.म्हणून माया महत्त्वाची. एकोप्यासाठी वाटणी ही चुकीची. अशा वाटणी मुळे एकमेकांचे मनं दुखावतात.
- क्षणात नाते तुटतात.म्हणून वाटणी ही मुळात वाईटच असते. आपल्या आईवडिलांनी आयुष्यात कमावलेली धनदौलत क्षणात तिची वाटणी होते. असे स्वार्थी मुले आईवडिलांची पण वाटणी करायला मागेपुढे पहात नाहीत. आई एकाकडे आणि वडील दुसऱ्याकडे. आईवडील एकमेकांकडे पाहून म्हणतात, काय वेळ आली देवा असला दिवस दावण्याआधी आम्हालाच का नेला नाहीस. त्यावेळी आईवडील एकमेकांकडे पाहत पाण्याने डोळे भरून येतात. दोघांच्याही आंतकरणातून दु:ख दाटून आलेले असते.
- निदान आईवडीलांची मेहनत, काबाडकष्ट, श्रद्धा, घाम गाळून कमावलेला याचा थोडीसुद्धा विचार केला जात नाही.काय वाटले असेल त्या आईवडील यांच्या मनाला. मुळात वाटणीचा विषय नकोच. आईवडील असेपर्यंत सर्वांनी हसत-खेळत जीवन जगले पाहिजेत. सुखी समाधानाने राहीलेले कितीही चांगले. ही अशी वाटणी होय.
