वाटेवर चालताना
वाटेवर चालताना
1 min
710
वाटेवर चालताना
वाटेवरी चालताना मनी असा विचार आला
खरंच कसं असत, खूप माणसाची ओळख होते
प्रत्येक माणसं असतात वेगळी
तसेच प्रत्येकाचा विचारही वेगळा असतो
ह्या वाटेवरी चालताना समजून त्यांना घ्यावं लागते
आणि खरंच त्यांचा पासून शिकायचं पण असतं
मग ह्याच वाटेवरती
ह्याच माणसाची एक प्रकारची सवय होते
आणि हीच माणसं हृदयात आपल्या
एका छोट्याशा कोपऱ्यात घर करतात
आपोआप त्याचविषयी एक ओढ लागते
आणि दुसरीकडे काही माणसं
नको तितकी जीवनात ढवळाढवळ करतात
हीच माणसं आपल्या आयुष्यात
उगीच नको तिथे नक खुपसतात