वागणूक
वागणूक
माणूस त्याच्या चलत्या घडीत तो खुप मेहनत करतो, लंडी-लबाडी करतो, वामन मार्ग अवलंबून पैसे कमावतो. काहीही झाले तरी पैशाशिवाय राहत नसे. या पैशाच्या नादात त्याला आई-वडील, भाऊ-बांधव, दोस्त-मित्र अगदी कोणीही दिसत नाही.
तो फक्त आपली पत्नी आणि आपले मुले यांचाच विचार करित. तो इतरांच्या कधी मदतीला धावून गेला नाही. ना कधी स्वत:ला नीटनेटके राहीला नाही. तो फक्त पैसा कमवायच्या नादात होता. पोटाला चिमटा देऊन, उपास-तापास राहून पै-पै जमा केला होता. याची मुले मोठी झाली वयात आली, त्यांचे लग्न केला. दोन हाताचे चार हात केला. आणि तो जेव्हा उतार वयात आला. तेव्हा त्याच्याने काही काम धंदा करायला ताकद नव्हती. कारण तो म्हातारा झाला होता.
तेव्हा तो फक्त तीन वेळेस जेवण करुन आराम करत होता. जो कोणी त्याच्या कडे आला असेल तर तो त्याला विचारीत की काय! बरं आहे का? एवढेच विचारीत. अगोदर काय ,कोठे, चालला आहात? किती जमीन कमावली? किती पैसे कमावले? सगळे पैशाशिवाय बोलत नव्हते. आता फक्त तब्बेत कशी आहे. एवढेच विचारीत. हे काळा-काळाचा योग आहे.
