वाद...
वाद...
1 min
396
आज सकाळी ती दोघे मजेत टीव्ही बघत बसली होती. एवढ्यात तो तिच्या माहेरच्या मंडळींवरून हसत हसत काहीतरी बोलला. ती खूप चिडली आणि जुन्या गोष्टी काढून सासरच्या मंडळींबद्दल बोलू लागली. वाद एवढा विकोपाला पोहोचला की त्याचे रूपांतर भांडणात कधी झाले ते कळलेच नाही आणि दोघेही उपाशीपोटी तसेच झोपी गेले.
ज्यांचा विषय काढून ही दोघे इकडे भांडत होती तेव्हा ती मंडळी मात्र आपल्या स्वतःच्या घरी टीव्ही पाहत हसतखेळत मजेत जेवत होती.
