वाचन
वाचन
आज जागतिक पुस्तक दिन. पुस्तकं वाचायालाच हवी. कारण पुस्तकं ही वाचण्यासाठीच असतात; मात्र पुस्तक वाचण्याचं तेव्हाच सार्थक होईल, जेव्हा तुम्हची एकतरी पुस्तक प्रकाशित होईल. पुस्तकं वाचतांना मनाची प्रगल्भता वाढवा, शब्दांची श्रीमंती वाढवा आणि आपल्या हातून अविष्कार घडविण्याचा प्रयत्न करा. नुसतंच वाचायचं म्हणून वाचू नका. वाचन असे करा की वाचन करण्यानी काहीतरी लिहिण्याची क्षमता विकसित व्हायला हवी. तेव्हाच खऱ्या अर्थानी आपणास वाचनसंस्कृती जोपासता येईल, लेखकांनी पेरलेल्या शब्दांना तुमच्या मनांगणात अंकुरता येईल. आणि मग वाचनातून लिखाणाची परंपरा वृद्धिंगत होत जाईल. म्हणूनच वाचा आणि लिहा.
व्यक्त व्हा...! मुक्त व्हा....!
आज जागतिक पुस्तकदिनी समस्त वाचक आणि लेखक मंडळींना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
