STORYMIRROR

Sattu Bhandekar

Others

2  

Sattu Bhandekar

Others

हुडहुड थंडीची

हुडहुड थंडीची

2 mins
106

शरदाच्या चांदण्यांत आलीस तू...मिरवत पुन्हा नव्याने...जुन्याच पाउलखुणांना नव्या दवबिंदूंनी सजवत...गारव्यालाही घेऊन सोबत...जणू पांढऱ्याशुभ्र वस्त्राची मऊशार झुल अंगावर लपेटून...मी मात्र आठवांच्या हुडहुडीत पुरता डुबलेला...चाहूल लागताच तुझी जुन्याच शेकोटीला नव्याने पेटवत...भडकलेल्या ज्वालाही उबच देत होत्या गतकालीन आठवांना...हृदयाच्या काळोखात घट्ट साठलेल्या...आणि जाणवू लागला स्पर्श अलवार तुझ्या येण्याचा...तुझ्या सहवासात चिंब चिंब होण्याचा...सहवास जरी जुनाच पण नव्याने अनुभवण्यात मन पूर्णतः रममाण झालेला...तुझी चाहूल लागताच...काळोखाला गिळंकृत करून सुवर्णवस्त्र परिधान केलेला चांदवा जणू रातक्रीडेसाठीच सज्ज झाला असावा...तसतशी माझ्याही मनात धडकीच भरू लागलेली...कारण मीही सज्जच बरं का तुझ्या अधरातुनी स्त्रवणाऱ्या शितपेयाला प्राशन करण्या.....


खरतर तुझं येणं म्हणजे पावसात चिंब भिजून कोरड्या पडल्या मनावर अलवार दवबिंदूच शिंपणच करणं...ओसरत्या पावसात काहूर माजवलेल्या उकाड्यावर तुझं येणं हाच एक रामबाण उपाय...चिंब भिजल्या सृष्टीलाही तुझा मोह झाला नाही तर नवलंच...तुझ्या येण्याची चाहूल म्हणजे साऱ्या आसमंताला पडलेला एक नवं स्वप्नच...धुक्याची चादर अंगावर ओढून बघितलेलं...आणि तीच चादर मीही अंगावर ओढून एकरूप होऊ पाहतोय तुझ्याशी...आणि निजू पाहतोय त्या मोतीयांनी सजलेल्या तुझ्या थंडगार कुशीत...पण तो काळोखाला गिळंकृत केलेला शशी गप्प बसेल का...? मी तुझ्याशी हितगुज साधतांना बघून....


तुला येतांना बघून या आठवांच्या शेकोटीत विचारांच्या ज्वाला अजूनच भडकू पाहत होत्या...मी मात्र त्या शरदाच्या चांदण्यांकडे मान वळवून विचारांच्या ज्वालांना शांत करू पाहत होतो...तो मात्र अंगभर सुवर्णभूषणे लपेटून तुझ्यासाठी पूर्णतः सज्ज झालेला...डोळे फाकवूनच बघत असावा माजकडे...मला तू स्पर्श करतांना बघून...मी मात्र तुझा एकेक स्पर्श हृदयाच्या कप्यात साठवू लागलेला...अगदी कायमचाच...त्या चांदणभरल्या राती...चांदण प्रकाशाच्या सोबतीने... नयनात साठवून चांदण्यांना. तुझं नकळत येणं...अलवार अंगाला स्पर्श होणं...काळोख्या राती तुझं माझं एक होणं...हे सारं म्हणजे जुन्या आठवांना नव्यानेच सजवल्यासारखं बरं का...! आठवणी जरी जुन्याच तरीही पुन्हा नव्याने अनुभवतांना मनात दरवळणारा आठवगंध कधीही न विसरण्याजोगाच...कायम असावी हीच हुडहूड तुझ्या येण्याची...आठवांत तुझ्या चिंब होण्याची..!


Rate this content
Log in