STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Children Stories Drama Inspirational

2  

ANJALI Bhalshankar

Children Stories Drama Inspirational

उत्सव गोडव्याचा...

उत्सव गोडव्याचा...

1 min
74

मकर संक्रांत सूर्य मकरराशीत प्रवेश करतो त्या कालावधीत येणारा, वर्षातील पहिला गोड सन.जगणयाची अनुभती घेताना माणसाच्या अनेक भावभावनापैकी राग कटुता किंतू पंरतु मत्सर हेवेदावे इत्यादी संवेदनांचा निचरा करणारा हा उत्सव.गुलाबी थंडी, वातावरणातील गारवा सुगीचे दिवस निसर्गाने मानवजातीवर मुकतपणाने केलेली रानमेवयाची ऊधळण.ताजा कोवळा हुरडा,हरबारा, वटाना गाजर ,इ.निरनिराळ्या प्रकारचे शरीराला पोषक असे घटकांचा आस्वाद बोचरया गारव्याला सुखद करतो.त्या आंनदावर कळस चढवितो तो म्हणजे तीळगुळ .जीभेवर विरघळनारा गोडवा आपल्याला किती शिकवून जातो गोड चवीचा स्वर्गीय अनुभव कदाचित सांगत असेल गोड वाणीने स्वर्ग ही जिंकू शकतो.आरोग्याचा दृष्टीने गुळ सर्वोत्तमच सोबत तीळाची ऊर्जा शरीरीक आरोग्यासाठी थंडीत मोलाचिच.नियतीने निसर्गाने आपल्या आरोग्याचा, जगण्याचा, सहनशक्ती,चा रहाणीमान आणि पोषणाचा विचार किती नियोजन बद्ध रीतीने आखुन ठेवलाय हे आपल्या खास करून आपलया भारतीयांच्या प्रत्येक सन रीतीरीवाज,त्या त्या ऋतुत ऊगविणारा अन्न धान्य यावरून खुप काही शिकण्यासारखे, सखोल विचार करायला लावणारे आहे असो.असा संक्रांती चा गोड सन प्रत्येकच्या आयुष्यातील ,विचार आचारातील नातेसंबधातील कटुता दूर करून तीळगुळाचा गोडवा टिकवून ठेवेल अशी प्रार्थना करूया हॅपी संक्रांती.


Rate this content
Log in