" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

उपाशी मरणाऱ्या जनतेसाठी..

उपाशी मरणाऱ्या जनतेसाठी..

1 min
264


खरंच काळ वाईट आहे.. घरात बसून काय खायचे कसं जगायचं?  मोठा भेडसावणाऱा प्रश्र्न निर्माण झाला आहे.. घरात खायला दाना नाही.. कोणी उधारउसणे देत नाही.. मुलंबाळं लहानाची मोठी कशी करावी, काय खाऊ घालावे, भयानक प्रश्र्न निर्माण झाला आहे... तेव्हा बंद चुली पेटवण्याचा, पोटाचा प्रश्र्न सोडविण्यासाठी मी सर्व समाजाला सांगतोय..

दुष्काळ,नी प्लेगच्या काळात. फकिरा ने बेडसगावच्या रघुनाथच्या वाड्यावर संवगड्यासह रात्रीला चाल करून इंग्रजांचा खजीना , धान्य लुटून समाजाला मुठमुठ वाटून त्यांच्या चुली पेटवल्या नी सांगितले काही करा पण जगा,मरू नका..

बंधुंनो आजही तुमच्या वर वाईट वेळ आली आहे.. पोटाचा प्रश्न निर्माण होतो मार्ग काढा..वेळ वाईट आहे... मतांची भीक मागत ,चपला झिजवत हातजोडणारे,पाया पडणारे नी तुमचे मतं घेऊन निवडूण येऊन तुम्हाला अजिबात न विचारणारे राजकारणी, तुम्हाला पुर्ण विसरुन गेलेले राजकारणी मरण नको म्हणून घर धरून बसलेत .आज तुम्ही खुशाल त्यांच्या घराजा दरवाजा गाठा. एकीणे जाआणि सांगा तुम्हाला जी खुर्ची,पद मिळाले आहे ते आमच्या मतांमुळे..आज आमच्या वर वाईट वेळ आली आहे, चुली पेटल्या नाहीत, लेकरं उपाशी मरत आहेत.. जगायसाठी मार्ग, सांग मतांसाठी लोकांना दारू, मटण, पैसा वाटला..हीच खरी वेळ आहे .. आम्हाला वाचव नाही तर...पुढचा काळ तुझ्यासाठी वाईट आहे.. लोक तुला विसरणार नाहीत..तुझी जागा तुला दाखवून देतील.. हे ऐकवण्याची .. त्यांना शोधण्याची नी त्यांची घरं गाठण्याची वेळ आहे...उठा..जगा..ही तुम्हाला काळाची हाक आहे,. लोकप्रतिनिधी चं काम काय असतं ते त्यांना विचारा, दाखवून द्या..


Rate this content
Log in