Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Prashant Shinde

Others


1.5  

Prashant Shinde

Others


उंदीर....!

उंदीर....!

2 mins 15.5K 2 mins 15.5K

टेरासवर नुकताच बायकोला बसस्टॉप वर जाऊन बस मध्ये बसून आलो होतो.नुकताच पाऊस पडून सारा टेरास ओला झाला होता.थोडे काहीतरी लिहावे असे वाटत होते.टेरासवर झुकलेले हिरवेगार लहानलहान पानांचे झाड वाऱ्याने डोलत होते.खाली रस्ता वाहनांना घेऊन वहात होता.आकाशात चिट पाखरू नव्हते.मन ही तसे थंडच होते नाही म्हणायला गारवा जरा बरा वाटत होता.तितक्यात मुलाचा फोन आला.

बाबा,लवकर या..!

काय झाले?

लवकर या,घरात उंदीर आलाय,फार मोठ्ठा आहे..!

डोळ्या समोर मोठा म्हंटल्यावर घुसच आली आणि मनात पुढचे मनसुबे पिंगा घालू लागले .कारण घुस पुराण फार वेगळे आहे .ती एक मोठी आठवणच आहे.दुसऱ्या कथेतून मी ती सांगणार आहे .असो.

मी सध्या संभाजी सेरिअल टीव्ही वर पहात आसल्यामुळे आवेशात जिन्यावरून पाय उतार झालो आणि घरी आलो.तोवर चिरंजीव शिकारीची पूर्व तयारी करून आपल्या सेफ झोन मध्ये सुरक्षित पणे दार लावून, हातात काठीचे शस्त्र घेऊन उभे होते. जणू काही घरात वाघ किंव्हा सिंह शिरल्याच्या भावना साऱ्या चेहऱ्यावर विलसत होत्या.

कथा घेऊन स्वयंपाक घरात दार उघडून शिरलो आणि शोध मोहीम सुरू झाली.मुलगा पिछाडीला फक्त नजरेचा कव्हर पुरवीत लांब उभा होता.फ्रीज खालून सुरुवात झालेली मोहीम उंदराच्या मानेवर संपुष्टात आली.शत्रू निपचित शेपूट हलवीत पडला होता व भय कायमच होते.सूचनांचा भडिमार मुला कडून होत होता.अजून मेळा नाही,शेपूट हलते,बाबा नीट कागदात शेपूट धरा,पहिला बाहेर टाका इत्याडी अगदी जवळून म्हणजे दहा बारा फुटावरून चालू होता.शेवटी काठीनेच ढकलत ढकलत प्रेत यात्रा घरा बाहेर पडली आणि मग शेपटीला धरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचरा कोंडाळ्यात विलीन झाली.

सुटलो एकदाच म्हणायला लगेच हुकूम कानावर पडला

बाबा काठी धुवा झाले,सम्पले एकदाचे मिशन.आणि उंदीर शेजाऱ्याने कसा आपल्या घरात ढकलला याचे रसाळ वर्णन मनसोक्त श्रवण केले.उंदराचा अथ पासून इतिपर्यंतचा प्रवास इतका रोमांचित होता की उंदीर शोधून मारण्याची ते शेवट पर्यंत मारून टाकण्याची सारी किळसवाणी प्रक्रिया उबळ आणणारी असते हे अनुभवले आणि मनासी ठरवले उंदीर आला की आपणच घराबाहेर जायचे पण घरात मीच काय तो शूर जाणून छाती छप्पन्न इंच झाली आणि इतका सुळसुळाट उंदरांचा पाहून इतर छपन्न इंच छातीचे पुरुष काय करत असतील हे जाणवले आणि सर्व छपन्न इंच छातीच्या नरवीरांचे कौतुक वाटले...!


Rate this content
Log in