Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

त्या शब्दांच्या छायेत

त्या शब्दांच्या छायेत

2 mins
131

*आई* हा दोन अक्षरी शब्द पण त्याची महती केवढी! अनेक जीव या शब्दाच्या छायेखाली विसावा घेतात. नव्या आयुष्याला सुरुवातच या शब्दाच्या विसाव्याने होते .

या शब्दातून आपण खूप काही शिकतो .

आई नावाचं ते विसावा देणार झाड ,तुम्हाला बोटाला धरून जगातल्या नव्या नव्या गोष्टी शिकवत असते. जसे झाडाला तुम्ही दगड मारले तरी ते गोड फळ देते, तसेच आई बद्दल तुम्ही कितीही भल्या बुऱ्या गोष्टी मनात आणल्यात ,राग राग केलात, तरी ती मात्र तुम्हाला छाया देत राहते. आशीर्वाद देत राहते. 

संकटे धोके सांगत असते. 

लहान बाळ जेव्हा विस्तवाकडे जातं तेव्हा आई सांगते हा sss आहे बरं! हात लावू नको भाजल. 

इथं खड्डा आहे बरं! पडशील आणि मग ती आयुष्यभर तुम्हाला खाचखळग्या पासून सावध करते. 

संकटात पाठीशी उभी राहते, आणि तुम्ही आनंदात असता तेव्हा मात्र ती अलिप्तपणे तुम्हाला न्याहाळत असते .

तुमच्या सुखात आपलं सुख मानते ,तुमच्या दुःखात आपलं दुःख मानते. 

म्हणून माणसाला शेवटपर्यंत या दोन शब्दांची छाया हवीशी वाटते. 

माणूस कितीही मोठा झाला तरी, त्याला आई या दोन अक्षरांची छाया हवीच असते.

Rate this content
Log in