krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

तुम्ही आयुष्यात केलेलीएक महत्त

तुम्ही आयुष्यात केलेलीएक महत्त

9 mins
823


प्रत्येक माणसाला त्यांनी केलेली निवड महत्वाची असेल तर तो निवड विचारपूर्वक करेल, प्रत्येकाला आपापली निवड करण्याची व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून तर प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार आणि निवड महत्त्वाची आहे म्हणून डोळसपणे प्रयत्न करीत असतो. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती  every person every tendency.

या तत्वाने प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्या आयुष्यात आपापल्या निवडी असतात. पण मला मेल्यानंतर आपलं अस्तित्व लगेज नष्ट होतं,माणसाचं सर्वसाधारण वय तरी किती वर्षाचं असतं एक ते ऐंशी ,नव्वदी पर्यंत.पण माणुस मेला का त्याची राखरांगोळी व्हायला तीन चार तास पण लागत नाही,अरे आता होता, लगेज गेला,पण तो कायमचा गेलेला असतो परत न येण्यासाठी ,हाच विचार करुन माझं मन फार दु:ख होई.मग आपलं अस्तित्वासाठी लेखक होणे ,कलाकांर होणे हेच माध्यम ठिक म्हणून मी आयुष्यात कलामाध्यमांची महत्वाची निवड केली.

मी बारावीनंतर आयुर्वेदिक पंचकर्म आणि अल्टरनेटिव मेडिसिन सिस्टीममधून अभ्यासक्रम पूर्ण करून इंटरंशिप सुद्धा केली  होती, आणि आता फक्त महानगरपालिका कडून वैद्यकीय व्यवसाय करतो म्हणून परमिशन घ्यायचे बाकी होते, पण नंतर विचार केला की मला नाटकात सिरीयल मध्ये काम करायची आवड आहे मग जर का मी दवाखाना खोलून बसलो आणि उद्या पेशंट डायबेटिस, ब्लड प्रेशरचे आले तर, "तर कुठे गेले तर डॉक्टर? कुठे गेले? आणि म्हणाले "नाटकाचे शो करायला गेले, शूटिंग करायला गेले" म्हणजे मग माझे दोन्ही व्यवसाय बदनाम होईल ना म्हणून मी ठरवलं दवाखाना माझा वेळ प्रसंगा बाका आल्यावरच, कठीण परिस्थिती आल्यावरच दवाखाना खोलून पेशंटची सेवा करायची पण तूर्तास मी अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवलं हे माझ्याकरता फार महत्वाची निवड होती.

 

  मला आठवतंय मी त्यावेळी बालनाट्यात काम करायचो "डमरु राक्षस जिंदाबाद "मध्ये "डमरू राक्षस "भूमिका मी करायचो,सूत्रधार पावसकर सर होते. त्याच वेळी "माझं अंगण, माझं क्षितिज" या मराठी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी कॉल आला होता. मी ऑडिशन दिल नंतर तिथल्या डायरेक्टर ने सांगितलं "तुम्ही आमच्या पिक्चरला, कॉन्ट्रीब्युशन कराल का?" मी म्हटलं "मी छोठे मोठे रोल करतो. सिरीयल मध्ये बालनाट्यात काम करतो, मला मानधन मिळतं पण तुम्ही कॉन्ट्रीब्युशन सांगून माझ्याकडून पैशाची मागणी करीत असाल तर मी देऊ शकणार नाही" "कारण मला काम केल्यावर संध्याकाळी पैसा मिळतो तुम्हाला पाहिजे तर शूटिंगसाठी अंगमेहनतीची काम करेन पण मला कॉन्ट्रीब्युशन जमणार नाही" हे मी ह्या डायरेक्टरला विनवून सांगत होतो लांबूनच तिथले निर्माते,आर्टिस्ट डॉक्टर जितेंद्र पाटील  बघत होते त्याने मला जवळ बोलावले म्हणाले "खरे साहेब, मी तुम्हाला तीन महिन्यांनी फोन करेन, आजचं हे काम होईल ना होईल ही पुढची गोष्ट पण तुम्हाला मी नक्की बोलावेन" मी विचार केला ज्या ज्यावेळी मी ऑडिशन देतो त्यावेळी हे असे सगळेच बोलतात आणि मी निघालो आणि माझ्या नेहमीच्या बालनाट्याच्या कामाला लागलो. बरोबर तीन महिन्यांनी मला कॉल आला होता पण समजेना हा कॉल कोणाचा असावा एकदा तर मी त्या कॉलवर बोललो देखील, त्यांना माझा घरचा नंबर दिला देखील आणि बघतो तर काय दुसऱ्या दिवशी प्रोडक्शनचा माणूस माझ्या घरी, म्हणाला "चला मला पण त्या प्रॉडक्शनच्या ऑफिस मध्ये यायचं आहे" तुम्हालापण मी घेऊन जातो" मग आम्ही दोघे ह्या प्रोडक्शन ऑफिसला गेलो निर्माते लांबूनच डॉक्टर जितेंद्र पाटील म्हणाले "या खरे साहेब बसा, आम्ही दोघे खुर्चीवर बसल्यावर एकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आणि नंतर आपल्या मूळ गोष्टीकडे आलो त्यांनी आपल्या हातात "शनि साडेसाती" या चित्रपटाची स्क्रिप्ट माझ्या हातात देऊन म्हंणाले "खरे साहेब, तुम्हाला यामध्ये मुख्य पंडिताची भूमिका करायची आहे" पण मला वाटलं होतं यामध्ये मी शनिमहाराजांची भूमिका करावी कारण या आधी प्रसिद्ध लेखक जयवंत दळवींचं नाटक "सह्याद्रीचा सिंह"ह्यात उंचपुरा, दणदणीत आवाज असलेल्या कामबक्षखानाची भुमिका केली होती, तसं मी डॉक्टर पाटलांना सांगितलंही पण ते म्हणाले "तुम्ही ऑडिशनमध्ये जी कलाकृती सादर केली त्यानुसार आम्ही तुम्हाला मुख्य पंडित मध्ये बघत आहोत, ठीक आहे तुम्ही शनिमहाराजांची भूमिका करा ,पण आधी ही स्क्रिप्ट वाचून काढा,मग निश्चित करा कि तुम्हाला कोणती भूमिका करायची आहे आम्हाला तुम्ही मुख्य पंडित मध्ये अगदी फिट वाटता" मी म्हटलं "ठीक आहे मी दोन दिवसात स्क्रिप्ट वाचून काढतो आणि तुमच्याकडे येतो" झालं मी दोन दिवसात स्क्रिप्ट वाचून काढली पण मला असं दिसून आलं की डॉक्टर जितेंद्र पाटलांनी बरोबर माझी कास्टिंग केलेली आहे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मुख्य पंडिताची भूमिका करायला तयार झालो मी म्हणलो "सर,तुम्ही जो विचार केला, तो अगदी बरोबर आहे," मी त्यांच्या मतांशी सहमत झाल्यामुळे डॉक्टर जितेंद्र पाटलांना देखील बरे वाटले ,आम्ही सलग पंधरा-वीस दिवस त्या स्क्रीप्ट मधून आम्ही कलाकार तालमी घेत होतो.डॉ.जितेंद्र पाटील जरी या फिल्डमध्ये नविन होते तरी त्यांचं प्रेझेंट माईंड जबरदस्त होते,शुटिंग मध्ये कुणाचं सारखे रिटेक व्हायला नको व त्यातले वाक्यनवाक्य पाठ झाल्यावर मुद्राभिनय पण बरोबर यावे ह्यासाठी तालमी घेणे जरुरीचे होते त्यामध्ये नऊ पंडित मी दहावा पंडित मुख्य पंडित असं आमचं राज दरबार मधलं सिन पूर्ण पाठांतर नंतर अभिनय सहित तालमी झाल्या. याच दरम्यान या प्रॉडक्शन हाउस मध्ये बरेच फिल्म तंत्रज्ञ , फिल्मी वर्कर येत होते आणि आपापला कामाबद्दल प्रोड्युसर बरोबर डिसाईड करत होते. माझ्याकडे "शनि साडेसाती" चित्रपटाचे स्क्रिप्ट मी त्यात मुख्य पंडिताचे संवाद डॉक्टर जितेंद्र पाटलांच्या सहमतीने करेक्शन करीत होतो त्यांनाही माझ्या मुख्य पंडिताच्या भूमिकेचा संवादाचे करेक्शन केलेले आवडले मी माझे जेवढे सीन डायलॉग होते तेवढ्याचे करेक्शन केले होते. नऊ पंडिता मधून एका पंडिताला दयानंद पाटलाला माझ्या भूमिकेबद्दल इर्षा झाली होती तो विचार करत होता कि ती भूमिका मुख्य पंडिताची त्याला मिळावी आणि ह्या गोष्टी साठी डायरेक्टर कैलास माळी बरोबर संगनमताने माझी भुमिका दयानंद पाटलाला मिळावी हा हेतू होता ते सर्वे डॉक्टरांकडे आले, डॉक्टर जितेंद्र पाटलांना हि लालुचपणाची गोष्ट कळाल्यावर त्यांचा पारा सातव्याअस्मानाला गेला ते भडकून डायरेक्टरला, ज्या पंडितांनी चमचेगिरी केली त्या सगळ्यांना ऑफिसमध्ये म्हणाले "आम्ही पंधरा वीस दिवस तालमी घेतो, आम्ही काय तुम्हाला वेडे वाटलो काय? तुम्ही तुमच्या मताने निर्णय घ्यायला तुम्ही कोण? येथे मला सांगा प्रोड्युसर कोण आहे? मग झक मारायला आपले निर्णय आपणच घेता, मुख्य पंडित कोण पाहिजे हे तुम्ही मला सांगणार? याचा अर्थ माझं काहीतरी चुकतंय म्हणून मी आता शूटिंग करत नाही, आपलं काम मी बंद करतो ,मी ऑडिशनला मुख्य पंडितासाठी खरेना निवडला आहे त्यात माझी मोठी चूक झाली आहे तुम्हाला अशी तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल तर मी हे काम बंदच करतो, मला माहिती आहे या पंधरा दिवसात कोणी किती मेहनत घेतली ती, मला खरे साहेब या पंधरा दिवसात त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली हे मला त्यांच्या कामावरून वाटते. लोकेशनवर शुटिंगला त्यांचे रिटेक येणार नाहीत तुमच्यात कोणात एवढे गट असतील तर पुढे या" सगळे डॉक्टर पाटलांच्या या भडकलेल्या स्वभावाचा अनुभव आला आणि या सगळ्यांना डॉक्टर पाटलांचं म्हणनं पटलं होतं,डायरेक्टर व त्या पंडित कलाकारांनी डॉक्टरांची माफी मागितली नाहीतर पिक्चर बनायचं राहिलं असतं,त्यांना डॉक्टरांची माफी मागावीच लागली आणि मला डॉक्टर पाटलांचं बद्दल आता एक मोठा आदर वाटू लागला. आता शूटिंगच्या वेळी प्रत्येकाला म्हणजेच नऊ पंडित आणि मुख्य पंडित आम्हा दाही जणांना डोक्यावरचे केस कापायचे होते आम्हाला ऑफिसमध्येच आमचे सगळ्यांचे टक्कल केलेले होते आम्हाला शूटिंगच्या एक दिवस आधीच ऑफिस मध्ये बोलावले होते आता शूटिंग कुठे आहे हे आम्हाला कोणालाच सांगितले नव्हते म्हणून जास्त लोकेशनचा आम्हाला त्रास नको म्हणून व सगळे पंडित एकत्र असल्याने शूटिंगला वेळेवर यायला पंडित यामुळे मागेपुढे काही होणार नाही म्हणून सगळे कलाकार आधीच ऑफिसमध्ये बोलावले होते आम्ही सकाळच्या ट्रेन ने एस्सेल स्टुडिओत आलो आणि मी मात्र साधा सरळ कोणत्याही बाबतीत एटीट्यूड न करणारा होतो कारण माझा स्वभावच साधा सरळ होता आमच्या युनिटमध्ये काही कलाकार अगदी प्रोड्युसर वर हवी होऊन त्यांच्या मर्जीत भूमिका आपली भूमिका साठी धडपडत होते त्यात काहीकांचा स्वार्थपणा 100% समोर दिसून येत होता. मंत्री महोदय चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते "शनी साडेसाती"चित्रपटाचा मुहूर्त शुट झाला .

आम्ही सगळे राजदरबारातले दहाही पंडित, पंडिताच्या वेशभूषेत आले होतं व माझं नऊ पंडितांबरोबर संवाद होते 

प्रत्येक पंडिताने आपापले संवाद पाठ केले होते पण मुख्य पंडिता साठी ज्याने माझ्याबरोबर इर्षा केली होती तोच पंडित शूटिंगच्या वेळी गोंधळला.

 त्याचे संवाद कॅमेरासमोर बरोबर येत नव्हते कधी संवाद बरोबर यायचे तर कधी त्याच्या चेहऱ्यावरची संवाद येत नव्हते मग डायरेक्टर कैलास पाटील त्याच्या अशा रिटेकनी वैतागले होते.शुटींग चालु असल्याने लंचब्रेक उशिरा झाले होते,आणि मी मुख्य पंडित असल्याने माझं सीन सगळे उतरून घेतले,माझे रिटेक व्हावे म्हणून तिथले दोघेतिघे माझी वाटच बघत होते पण डॉक्टरांनी चांगली आमची रिहर्सल घेतल्याने  माझ्या सीनला रिटेक झालाच नाही फक्त एडिटिंग साठी सजेशन म्हणून काही परत सीन घेतले होते,माझं आजच्या पुरतं मी काम पुर्ण केले होते.आता दुपारच्या ४.30 च्या दरम्यान लंच ब्रेक म्हणून जेवतच होतो. बस तितक्यात कैलास सरांनी मुख्य पंडित म्हणून मला समोर बोलवून घेतले आणि मग शूटिंगला सुरुवात केली आणि मग पंडिताने ,त्याने परफॉर्मन्स बरोबर दिला येथे डायरेक्टरची बुद्धिमत्ता दिसते आमची शूटिंग पार पडली त्यात सगळ्यांना मी केलेली मुख्य पंडिताची भूमिका सगळ्यांना आवडली. कारण इतर वेळी मी साधा सरळ दिसणारा पण शूटिंग मध्ये व्यवस्थित भूमिका करणारा कलाकार म्हणून दिसलो प्रत्येकाने माझी कामाबद्दल वाह वाह केली मलाही बरा वाटले होते. त्यात जुनेआर्टडायरेक्टर मनोहर आचरेकर यांनी सुद्धा मला शाबासकी दिली म्हणाले "तुम्ही थियटरचे आर्टिस्ट का ?"  मी म्हणालो "हो नाटकात मी काम करतो". मग त्यांनी मला जवळ येऊन शुटिंग बद्दल अभिनयाबद्दल चांगली माहिती दिले होती. मी त्यांना फार जुन्याकाळापासून ओळखतो त्यांचे चित्रपटात त्यांचे नाव आर्ट डायरेक्टर मनोहर आचरेकर म्हणून जुन्या पिक्चरमध्ये बघितलेला आहे त्यांनी मला चांगले मार्गदर्शन केले. पूर्ण दहा पंधरा दिवसात शूटिंग आटपली होती. डॉक्टर जितेंद्र पाटील म्हणत होते एवढ्या कमी दिवसात शुटिंग आपण पूर्ण केली हा आपला पिक्चर चा रेकॉर्ड आहे. आता मी सुद्धा काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचे आभार मानले आणि डॉक्टर जितेंद्र पाटलांचे सुद्धा आभार मानले. म्हणालो आपले सहकार्य माझ्याकरता फार महत्त्वाचे होते. आपला मी आभारी आहे काही दिवसांनी मला डबिंग साठी बोलावलं डॉक्टर जितेंद्र पाटील म्हणाले होते "तुमचा आवाज परफेक्ट आहे पण येथे डबिंग करताना एकदुसर्याची आवाजाची मात्रा कमी जास्त झालेली आहे त्यासाठी सगळ्यांचे पद्धतशीर प्रसंगाअनुरुप आवाज लेवल येण्यासाठी तुमचा पण आवाज डबिंग करणे गरजेचा आहे "मी डबिंग रूममध्ये माझा आवाज शूटिंग मधला पाहिला तर माझा आवाज बरोबर वाटत होता पण आता सगळ्यांचं डबिंग होत असताना माझ्या आवाजामध्ये कमी आवाज नको यायला म्हणून माझ्या आवाजाची डबिंग करणे आवश्यक वाटत होते. डॉक्टर जितेंद्र पाटील राजा विक्रमादित्यांची भूमिका करत होते त्यांची डबिंग डबर गिरीराज सर यांनी केले होते आणि माझी डबिंग संकेत सरांनी केली होती.  काही दिवसांनी डॉक्टर जितेंद्र पाटलांनी त्यांच्या नागपूर साईडला "शनि साडेसाती' पिक्चर रिलीज केला होता इथले राजकारणी लोक आपल्या आपल्या पद्धतीने रिलीज साठी प्रयत्न करत होते मी पण मुंबईत रिलीज साठी एक मदत म्हणून प्रयत्न करत होतं डिस्ट्रीब्यूटर मित्तल साहेब यांच्याबरोबर डॉक्टर जितेंद्र पाटलांचे ओळख करून दिली होती . काही दिवसांनी "शनि साडेसाती" हि फिल्म युट्युब वर पण आली . ती फिल्म तीन भाषात आली आहे. मराठी, हिंदी, गुजराती या तिने भाषेत" शनि साडेसाती" हा पिक्चर निघाला. ज्याने हा पिक्चर बघितला त्यांना माझं काम आवडलं होतं.

संगीत, गायकी मध्ये रागदारीला फार महत्त्व आपल्याला माहीतच आहे, संगीतात सात राग असतात, त्याप्रमाणे अभिनयात सुद्धा अभिनयाचे नवरस असतात, त्याच नवरसांचा "शनी साडेसाती" या मराठी, गुजराती, हिंदी सिनेमात 

राजदरबारातल्या सीन मध्ये मुख्य पंडितानी अभिनयाचा आपसूकच उपयोग केलेला आहे,पण ज्यां कलाकारांना आपल्या अभिनयात विशेष कौशल्य पाहिजे असं वाटत असेल त्यांनी दोन तीन वेळा तरी "शनी साडे साती" हा सिनेमा बघायला कसलीच हरकत नाही. आणि वाचकांमध्ये कलाकार मंडळी असतील त्यांना नक्कीच "शनि साडेसाती"चित्रपटात दरबारातील सीनमधल्या मुख्य पंडितातल्या मुद्राभिनयातील नवरसांचाआपसूकच उपयोग झालेला आहे, असे आढळेल.

आणि अशा कलाअभिनयातून आवड जोपासत, लेखनकार्यही चालू ठेवलं,

"अजूनही वेळ आहे" लघुनाटिका एकाकिंका स्पर्धेसाठी लिहिले होती. दिवाळी अंकांनी सुद्धा आपल्या दिवाळी अंक वाचकांसाठी घेतली ही एकांकिका स्पर्धेत उतरवली होती

 चांगली कथा, कलाकारांचा चांगला परफॉर्मन्स 

 चांगले दिग्दर्शन म्हणून उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला होता.

"थोडीसी सावधानी जिंदगीवर आसानी" लेखन डॉ कृष्णकांत खरे ही लघुनाटिका एकच प्याला शेवटचा प्यायला पर्यंत दारूची नशा हे काही सुटत नाही ती सुट्टी आपली जीवन यात्रा संपल्यावरच म्हणून आपण वेळीच सावध राहिलं पाहिजे म्हणजे तुमचे आयुष्य सावरला जाईल या विषयावरचा हा नाट्यविषय.

"शिवसंग्राम "या संघटनेच्या वतीने 

लोकजागृती या उद्देशाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत उल्लेखनीय लेखन केल्याबद्दल गौरव पत्र मिळाले.

 "तुमची आमची सर्वांची मुंबई" या मासिका मार्फत भारतातील मराठी साहित्यिकांसाठी साहित्य स्पर्धा आयोजित केली होती, त्या भारतातील खेड्यापाड्यातील साहित्यासह सर्व राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या साहित्य मंथनात नाट्यलेखन विभागातून माझ्या लघुनाट्यला 

 "उत्कृष्ट नाट्यलेखन" म्हणून "ज्ञानरत्न पुरस्काराने "सन्मानित केले.

अखिल भारतीय लोक सेवा समिती मुंबई राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार 2005 सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक क्षेत्रात माझ्याकडून काही कार्य घडलं म्हणून 

"जीवन रक्षक पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला.  

26 जुलै 2005 नागरिकाने जे धाडस दाखवून 

काहिकांना

 वाचवले त्या वाचवण्यारात माझा सुद्धा सहभाग होता म्हणून मला "वीर नागरिक पुरस्कार "देऊन माजी मुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेबांनी श्रीफळ शाल देऊन माझा सन्मान केला. 

 कलामाध्यम गोष्टीचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करून गाडी लोहार सामाजिक संघटनेने 2019 या सालात "नेशनल अवार्ड", श्रीफळ, शाल देऊन माझा सन्मान करण्यात आलं म्हणजेच मी माझ्या जीवनात योग्य तो महत्त्वाचा निर्णय घेतला होता आणि महत्त्वाची निवड करून आपलं भविष्य उज्वल ठेवण्याचा प्रयत्न याचा मला समाधान वाटतं , सामाजिक हितासाठी माझ्यकडुन कला माध्यमातणं सामाजिक कार्य घडावे ह्यासाठीच आयुष्यात केलेली कलामाध्यमाची महत्त्वाचा निवड होती . 


हे लेखनकार्य करताना आपल्या प्रिय वाचकांना फार आवडेल मनोरंजन होईल,संगीतात सात राग असतात तसेच प्रत्येक क्षेत्रात रागदारी सारखे प्रकार असतात पण आपलं बारीक लक्ष नसल्याने ते आपल्याला सापडत नाही आपले आयुष्य सरले तरी .

पण ह्या कथेत संगीत रागदारीतले सात राग सारखे कलामाध्यमातणं अभिनयातलं काय असतं ते या कथेत कुठे शोधलं तर व आपल्या ज्ञानात काही जास्त मिळाले तर का ते पहा.पण आपल्याला जीवनात नक्कीच काहीतरी करायला पाहिजे असं काही लिहण्याचा छोटासा प्रयत्न.


Rate this content
Log in