Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

तुमच्या मित्रांसोबतचा एक दिवस

तुमच्या मित्रांसोबतचा एक दिवस

5 mins
1.0K


कुंभार वस्तु घडवताना आकार देतो ते चिखल मऊ असेपर्यंत आणि पूर्ण आकार देऊन झाल्यावर मग तो त्या चिखलाच्या भांड्यांना चांगला आकार आलेला आहे,याचा अंदाज घेऊन कुंभार त्या भांड्याना ठणक बनवायचा कामाला लागतो तसंच पालकांचाही असतं आपला पाल्य लहान असेल तोपर्यंत त्याच्यावर घरातल्या जाणवायचं जबाबदारीचा , दुसऱ्याला सहकार्याचं त्याच्याकडून असे काम करून घेतले पाहिजेत जेणेकरून त्याला जीवनात वावरताना कुठल्याही गोष्टीची अडचण पडू नये म्हणजेच तो एक जबाबदार नागरिक , गृहस्थ बनू शकतो. पण ज्या पालकांचे आपल्या मुलांकडे वीस-पंचवीस वयापर्यंत लक्षच नसेल तर पुढे भविष्यात पालकांवर मोठ्या वाईट प्रसंग आला, त्याला संकटाला सामोरे जावे लागेल ह्यात संशय नाही. आपल्या भारतातल्या संस्कृतित काही शास्त्रात मुल आणि पालक यांच्यातील नातेसंबंध आणि संस्कार कसे असावेत याची बरीच माहिती असते म्हणून सुज्ञ पालक अशी काही पुस्तके वाचतात जेणेकरून त्या ज्ञानात भर पडून आपण आपल्या कुटुंबाबरोबर व्यवस्थित रीता सुखी राहू शकतो, पुस्तकाचे वाचन झाल्यामुळे आपल्याला बरं काय वाईट काय याचे फरक कळायला सोपं जातं आणि आपल्या कुटुंबाबरोबर हे आपलं नातं चांगलं पक्कं होतं. मी लहान असताना पालकांनी माझ्या राहणीमान, दिनचर्या यावर त्यांचे लक्ष असे, त्यात मी मोठ्यांबरोबर आदबीने, आदराने चाललो बोललो पाहिजे,छोट्यांबरोबर मायेने व्यवहार केला पाहिजे ,घरात कुणीकुणाला शिव्या देऊ नयेत त्यात आईबाबांचा माझ्याबरोबर हा कटाक्ष जरुर असे म्हणून की काय मला बाहेर कोणी घाणेरडे शब्दांनी बोललेलं आवडत नव्हतं.

 काही बाहेरची उडानटप्पु मुलं वेगवेगळ्या तऱ्हेचे मित्रांबरोबर राहून एक दुसऱ्याबद्दल घाणेरडे शिव्या वगैरे देऊन गप्पा मारत पण मला प्रश्न पडायचा की  हे असं कसं काय?

 दुसरा मुलगा खुशाल त्याच्या बरोबर असलेल्या दोस्ताला खुशाल आई बहिणीवर शिव्या घालून गप्पागोष्टी करतो आणि घाणेरडे शब्द बोलतो तरी तो दुसरा ऐकणारा त्याचा मित्र हे कसं काय सहन करतो. आणि ते सगळे व्यवहार मला अवघडल्यासारखं वाटायचं.

 एकदा काय झालं आम्ही सर्व मुलं सुट्टी होती म्हणून रविवारी पुर्ण दिवस महिंद्रा गार्डनच्या जंगलात मोठ्या धबधब्यावर अंघोळीला गेलो,ह्या धबधब्यावर लांबूनलांबून लोकं यायची,आम्ही आंघोळ करत होतो,पोहत होतो, पण तेथे उडाणटप्पू पोरांचा एक गट होता तो ग्रुप एक दुसऱ्याला आई बहिणीच्यानावाने शिव्या देऊन गप्पागोष्टी करत होते पण त्या ग्रुपला बघून माझ्याकडेचे मित्र पण वाईटसंगतचा असर कि काय दोन तीन मित्र आपापसात शिव्या देऊन गप्पा मारायला सूरुवात केली होती,त्यात बाब्या तिकोने माझा चांगला लहानपणीतला मित्र आम्ही दोघेही समवयस्क,शाळेत जे मित्र कुस्तीला मला भारी पडत त्याच मित्राना कुस्ती मध्ये बाब्या तिकोने सहजच हरवत असे,एक डाव धोबीपछाड करीत असे,पण गंमत अशी ह्याच बाब्या तिकोनेला मी सहजच भारी पडायचो मी कुस्तीत बाब्या तिकोनेला सहजच हरवायचो. 26 जानेवारी ला  "गुरु दादोजीचे मावळे" या संवाद नाटकात एका छोटा प्रसंग होता, सिन होता, गावातला बाजारतला न्हाव्याच्या दुकानातला. बाब्या तिकोनेचा छोटा भाऊ रंजित तिकोने हा पण हुशार तितकाच समजदार  बाब्या तिकोनेनी दुकानातला न्हाव्याची भूमिका केली होती.मी गावातला पोलिस पाटलाची भुमिका केली होती,त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टिचे थोर कलावंत निळुजी फुले सारखी मला भुमिका करायची असते,मी अंगाने बारीक सडसडीत असल्याने मीच ती भुमिका केली,नाटकात हा विषय होता,"पोलिस पाटलाची हजामकी" मी येतो,दाढी करायला बसतो,आणि आर्डर करतो "नागपुरला हिवाळी अधिवेशन हाय नव्ह,दाढी करा बरं,"बाब्या तिकोने न्हावी म्हणून येतो,तो रंजितला दाढी करायची हत्यारे घेऊन यायला सांगतो,रंजित डुगडुग चालत हत्यारे घेऊन येतो, सगळे वर्गातील हसत असतात .मी ती हत्यारे बघून घाबरतो व बोलतो 'अरे माझी मान कापायच नाही रे मला दाढी करायचआहे रे "हे सारे माझे ऐकून खोखो हासतात तेव्हा मला बरं वाटलं कि माझा बोलणं बरोबर पंच घेतय.तितक्यात बाब्या तिकोने न्हावी म्हणतो

"साहब,ती दाढी करायचीच हत्यारे आहेत.साहेब ती तलावार सारखी असली तरी वस्ताराचं काम करतं "अजून पब्लिक कडुन परत खोखो हशा, तसं बाब्यान्हावी एक एक पोत्यातून ती दाढी करायची हत्यारे बाहेर काढताना प्रत्येक हत्याराला बघून मी रियक्शन द्यायचो तशतशी पब्लिक खो खो हसायची ,मी घाबरून पळु लागतो तेंव्हा मी बसलेल्या लाकडी खुर्चीत मी नेसलेल्या धोतराचं टोक अडकलं,धोतरही खुर्चीला अडकलं,आणि माझातनं धोतर सुटलं होतं आणि माझं धोतर सुटलं नसीब त्यावेळी माझी शाळेची युनीफार्मची चड्डी घातलेली होती म्हणुन बरं वर्गातल्या सारे जण माझ्या फजितीतला प्रकार बघून पोटभर हासतच राहिलं होतं. पण अशा वेळी कलाकारानी आपला प्रसंगावधान साधायचं असतं मी सगळ्याचा हसु थांबल्यावर एक शेवटचं वाक्य तेथच इंप्रोवाईज करुन बोललो"बघितलं संगतीचा परिणाम !माझा धोतरसुदधा खुर्ची सोडत नाही ते "

मी मिशीला हात लावुन बोल़़लो आणि दुकानवाल्या बाब्या तिकोनेला पण चार्लिन चैप्लीन सारखी मिशीने शाळेतल्या ह्या प्रोग्रामाने अख्ख परिसर खो खो हासत होतं. अशा तर्हेने "पोलिसपाटलाची हजामकी " हा विनोदी कार्यक्रम पार पडला नंतर  सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यानी भाग घेतला त्यांचे सुद्धा कार्यक्रम सुपर झाले होते.मग सगळ्यांचे कार्यक्रम झाल्यानंतर बक्षिसे वितरणाचा कार्यक्रम झाला.ज्यांची कामे चांगली झाली त्यांना बक्षिसे मिळत होती,आता बक्षिसे घेण्याचा आमचा नंबर आला तेंव्हा बक्षीस देणार्यात कुणी प्रसिद्ध लेखकही आले होते, त्यांनी प्रश्न केला,संकल्पना कोणी लिहली मी म्हणालो" मी लिहली "त्याबरोबर मला अभिनयाबरोबर चांगली संकल्पना लिहली म्हणून दोन बक्षिसे मिळाली,बाब्याला एक बक्षीस मिळाल होतं,पण रंजित तिकोनेला बक्षिस नव्हतं हे बघुन मला वाईट वाटलं ,रंज्याला पण बक्षीस मिळलं असतंं तर तो देखील खुश झाला असता,मग मी सगळ्या समोर उठून माझा जवळच्या दोन बक्षीसा पैकी एक बक्षिस रंजित तिकोनेला देताना सगळ्यासमोर हात जोडुन बोललो" "माफी असावी भलेही, मी संकल्पना लिहली पण कल्पना रंजित तिकोनेचीही होती म्हणून माझाजवळच्या दोन बक्षिसे पैकी एक बक्षिस रंजित तिकोनेला सन्मान म्हणून देत आहे, सगळ्यानी भारावून जोरदार टाळ्यांचा गजरात आमचं तिघांचं मनापासून हार्दिक अभिनंदन केले होतं,रंजित भारावलेला मला गच्च मिठी मारुन रडवेला झाला होता,मी त्याला बोललो"अरे एवढे मनाला लावून काय घ्यायचं, ह्या छोट्या नाटकाची तुझी पण कल्पना होती ना, ते मला माहिती आहे,आता कसं सगळ्यांना बक्षिसे मिळल्याबरोबर सगळीकडे आनंदीआनंदी आहे,म्हणून तर आनंद वाटण्यातच आत्मिक समाधान असतं.आम्ही आमच्या मित्रांसोबतचा असा ही एकदिवस येईल असं वाटलं नव्हतं तिथल्या सगळ्या वरीष्ठ मंडळींनी आम्हा तिघां मित्रांचं चांगलं कोडकौतुक केलं होतं.ते प्रसिध्द लेखक परत म्हणाले "कृष्णामध्ये चांगली समज आहे त्यांनी आपल्या मित्राचा पण विचार केला,यातून मिळणारा आनंद देखील वेगळाच आनंद देऊन जातो.हिच समज आपल्या प्रत्येकात होणे जरुरी आहे,"

मी पण ह्या कार्यक्रमाने भारावून गेलो, आपल्या मित्रांसोबतचा एक दिवस असं संस्मरणीय येईल असं वाटलं नव्हतं......

 

आमच्या मित्रांसोबतचा एक दिवस असे बरेच छान छान आठवणी आहेत पण आमच्या मित्रातला रंजित तिकोने आता आमच्यात नसल्याने त्याची आठवण म्हणून व कथा वाचताना त्याचंही नाव येत राहिल व झालेला विशेष कार्यक्रम प्रसंग ह्या लेखण माध्यमाने लिहण्याचा एक छोटासा प्रयत्न.


Rate this content
Log in