तुमच्या आजीकडची आवडलेली कहानी
तुमच्या आजीकडची आवडलेली कहानी


मराठीत आईची आई म्हणजेच आजी आणि बाबांची आई म्हणजेच आजी मात्र तेच हिंदी मध्ये आईची आईला नानी म्हणतात आणि बाबांच्या आईला दादी म्हणतात हे ओळखायला सोपं जातं, कारण हिंदीत आईच्या आईला नानी म्हणतात आणि बाबांच्या आईला दादी म्हणतात. आजीला आपल्या नातवांचा जीवापलीकडे लळा असतो. पण जास्तीत जास्त मुलीकडची आई म्हणजेच आजी आपल्या नातवाला जास्तीत लळा लावते कारण असं पाहण्यात आलं आहे की मुलाच्या मुलाला मुलाची आई मुलीच्या मुलांना जास्त लळा लावते कारण मानस शास्त्रानुसार मुलगी सासरी नांदत असते आणि माहेरी आल्यावर मुलीला आपल्या माहेरच्या कुटुंबाचा लळा जास्त असतो.
कधीकाळी सासरकडून येणारी बहीण, मुलगी तिचा लळा माहेरचाना जास्तच असतो त्यामुळे सहाजिकच मुलींच्या मुलांना तिच्यामाहेरची माणसं जास्तच लळा लावतात. ज्यावेळी मुलगी माहेरी येते व तिचे मुले असतात तेव्हा त्या मुलांचे मामा मावशी सगळे त्या भाच्याला लळा लावतात अशा तऱ्हेने जास्त करून नातू मामा कडच्या आईच्या आईकडच्या माणसांना मान देत असतो कारण इतक्या सगळा मामांकडून मावशीकडून भाच्याला आणि आजीकडून म्हणजेच आईच्या आईकडून नातवाला प्रेम, माया मिळाली असते म्हणजे इथे तो सगळ्यांचा लाडका झालेला असतो आईच्या आईला देखील आपल्या नातवांना रात्रीचे जेवण झाल्यावर झोपण्याच्या वेळी गोष्ट सांगण्याची लहान मुलांना गोष्ट सांगण्याची फार हौस असते आणि मुलंही म्हणजे नातवेही चांगली मन देऊन, लक्ष देऊन त्या आजीबाईंच्या गोष्टी ऐकत असतात आणि खरच या लहानपणीच्या नातवाला गोष्ट ऐकण्याची फार हौस असते. मी पण आमच्या आजीबद्दल आईच्या आईबद्दल तिने सांगितल्या गोष्टीमधून एक गोष्ट आपल्यासमोर शेअर करणार आहे.
होतं काय आम्ही भावंड त्यापैकी माझा मोठा भाऊ नारायण खरे म्हणजेच आम्हा छोट्यांचा दादा हा आईच्या आई कडेच लहानपणापासून शिकायला होता. मामाचं गाव किंवा आईच्या आईचं गाव एकच गाव मामाचं गाव. जर काही मोठे सण वगैरे आले जत्रा आली लग्नकार्य आली तर मामाच्या गावाला जायाला हौस वाटायची आता आम्ही छोटी भावंडे म्हणजे मी कृष्णकांत खरे आणि माझी बहिण मीनाक्षी खरे त्यावेळी पाच सात वर्षाची आम्ही छोटी भावंडे असु, ह्याच वयात आपल्याला मोठ्यांकडून गोष्ट ऐकण्याची फार आवड झालेले असते मग ती गोष्ट भुताची असो परीची असो की मग जादूची असो बिरबल बादशहा ची असो कि गुलबकावली ची असो इसापनीती ची असं सार्या गोष्टी ऐकायला फार आवड वाटायचे, कारण आजी आम्हा नातवांना मन लावून गोष्टीच्या विश्वात घेऊन काल्पनिक फॅंटेसी करायची म्हणून आम्हाला कल्पना पलिकडच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या. घरात आमची आई मामाच्या घरी सगळ्यात मोठी बहीण सुनंदा खरे मग ती सगळ्यांची ते तिच्या आई-बाबांची लाडकी ते तिला निरु म्हणुनच बोलत. मग कधी सगळे तिला बाय म्हणजे मोठी बहिण म्हणजे ताई बोलून तिचा मान राखत ,आम्ही तिचे मुले मग आम्ही सुद्धा तिच्या आई कडच्या सगळ्यांचे लाडके नातू पण ज्यावेळी आजीच्या गावाला म्हणजेच मामाच्या गावाला गेल्यावर आम्हाला फार बरं वाटायचं आणि घरी येताना मामाचं घर सोडताना मामाच्या घरी येताना बाबांच्या घरी येताना मन थांबायचं.
घरी असलो की म्हणजे बाबांच्या घरी असलो की असं व्हायचं की कधी मामाच्या गावाला जातो आणि सुट्टी मजेत घालवून येतो असं व्हायचं पण मामाच्या कडे मोठा भाऊ नारायण खरे म्हणजे आमचा दादा मात्र दादाला मामाकडे राहून कधी कंटाळून जायाचा कारण रोज दिवाळी रोजच दसरा मग त्याला काय महत्व असा प्रकार दादाचा होता म्हणून त्याला बाबांच्या घरी यायला मन उत्सुक होई आणि आमच्या घरी बाबांच्या घरी गणपतीला मजा असायची गणपतीला एक महिना अगोदर गणपतीचे डेकोरेशन करायला मोठा सहित छोटे सुद्धा मदत करायचे आणि गणपतीच्या दहा दिवसा अगोदर आजी पूजेचं काही सामान घेऊन यायची मुलीसाठी. त्याबरोबर दादा नारायण खरे तोही आजीबरोबर यायचा.
मग आम्हाला सगळ्यांना गणपतीच्या सणामध्ये आनंद व्हायचा
आम्ही फक्त मामाच्या कडे उन्हाळ्याच्या आणि जत्रेच्या दिवशी जायचं पण भारी मजा यायची. आमचा दादा आजीकडे असायचा पण आजी त्याचं आम्हाला कौतुक करून सांगायची "तुम्हाला काय खाया प्यायची काय कमी पण माझा मोठा नातू बिचारा असेल ती मीठ भाकरी काही तक्रार न करता खात असतो आणि तो घरात सुद्धा आम्हाला छोट्या मोठ्या कामात मदत करत असतो पण छोटा मामा ऐकत नाही ना
मग तो आजोबांचा मार खात असतो पण माझा मोठा नातू चांगला काम ऐकतो कधी चक्कीवर धान्ये दळून आणायला मदत करतो, छोटा मामा ऐकत नाही तो गावातल्या मुलांबरोबर टवाळक्या करतो म्हणून तर छोटा मामा घरात आजोबांना आवडत नाही कधीकधी आजोबा छडीने त्या छोट्या मामाचा काम काढतात आणि घरची जबाबदारी काय असते ते त्याला सांगत असतात आजी बिचारी दादाचा कौतुक करून सांगायची मग आम्ही भावंडे घरी सुद्धा काय कोणत्या गोष्टीला हट्ट करत नव्हतो पण मीना मात्र एखादी खाऊसाठी हट्ट करायची आणि आईचा मार पण खायाची मी मार खाण्यापेक्षा हट्ट न केलेला बरा म्हणून मी माझ्याकडून घरात कोणाला त्रास झाला नाही पण गणपती आले का मला ताप येऊन चक्कर यायचे त्यामुळे कधी मला दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागे तर कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ही व्हावे लागे मी लहानपणी सडसडीत बांध्याचा, नाजूक तब्येतीच्या त्यामुळे मी माझ्याकडून काही त्रास व्हायचा नाही ....
अरे हे काय एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली आमची आजी आम्हा नातवांना चांगल्या गोष्टी सांगायची आणि आम्ही नातवंड काही गडबड न करता शांतपणे तिच्या त्या गोष्टी मन लावून ऐकत असो त्यातलीच एक गोष्ट तिने सांगितलेले पण आता पुसटशी आठवण म्हणून तिने सांगितलेल्या तशीच्यातशी गोष्ट मला सांगता येणार नाही तरीपण आजीने सांगितलेली गोष्ट मला समजली तशी मला आठवण होतेय त्या पद्धतीने मी सांगतोय एका गावात शिवा रामोशी नावाचा एक खतरनाक लुटारु माणूस होता तो रात्री लोकांना लुटून आपली उपजीविका करायचा एकदा काय झालं एक साधू महाराज त्याच रस्त्यात येत असतो मग काय शिवा रामोशी त्याला पकडून दरडावून बोलू लागला " ये गोसाव्या बर्या बोलानं तुझ्याकडे जे काही आहे, ते देऊन टाक नाहीतर तुझं काही खरं नाही" पण हा साधू कोणी ढोंगी साधू नव्हता हा साधू हा योगी साधू होता त्याला काही गोष्ट जादूच्या अवगत होत्या जर त्याने विचार केला असता तर शिवारामोश्याला त्याने आपल्या जादूचा सामर्थ्याने कुत्रा, मांजर पोपट,माकड बनवून टाकलं असतं.. पण तितक्यात लांबून दोन लग्न झालेले भावंड रस्त्यात भांडताना दिसतात. शिवारामोश्याला वाटते बरं झालं... दुसरा शिकार पण आता मिळेल आपल्याला ,पण ते दोघे भावंडे फार मोठ्याने भांडताना बघून नक्की भांडण काय ?हे तो साधू आणि शिवा रामोशी लांबून बघतो. साधूला त्यांचे वागणे बघून वाटतं एक वेगळं वाटतं आणि शिवारामोशाला त्यांचं वागणं बघून एक वेगळं वाटतं होतं. शिवा रामोशी त्या दोघांना रस्त्यात गाठून आपल्या फरशीकुर्हाडीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो "तुमच्याकडे जे काही असेल ते बऱ्या बोलाने मला द्या नाहीतर तुमची इथेच जिवंत खांडोळी करीन" तसे ते दोघे भाऊ घाबरून शांत होतात एवढे कडाक्याचे भांडण करणारे भाऊ आता शांत झाले, रामोशी भडकून त्यांना बोलतो "अरे गप्प का झाले? ,शांत का झाले? तुमची बोलती का बंद झाली ?"चला जे आहे तुमच्याकडे ते चूपचाप देऊन टाका" ते दोघे भाऊ बोलतात "आम्हाला आमच्याजवळ आई शिवाय कोणीच नाही तेव्हा तुम्ही पाहिजे तर आमची आई घेऊन टाका ती कपडे धुणे घरचं काम करून देईल,आमच्या बायक्या आमच्या आईशी कंटाळून माहेरी जाईन अशी धमकी देते त्यात मी माझा भावाला सांगतो तु थोडे दिवस आईला तुझा घरी ठेव तर हा माझा भाऊ माझ्याशीच भांडायला लागला,तो म्हणतो तुच सांभाळ आईला,यावरून आमची भांडणं चाललीत,आईला सांगितले कि तूला मामाकडे सोडतो म्हणून ती आमच्याबरोबर आहे पण तिला त्यादुरच्या झाडाजवळ थांबायला सांगितले आहे,तिला घेऊन येतो तुम्ही तिला घेऊन जा, तुमच्या बायकामुलांना कामात मदत करेल" शिवारामोशेला या दोघा भावांच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं "अरे ह्या दोघांना जन्म कोणी दिला तर त्या बिचार्या आईने, माऊलीने जन्म दिला", आणि त्याचे पांग असे फेडता" असं शिवा रामोशी त्या दोघांना समजावून बोलत होता. शिवा रामोशी आईच महत्व दोघांना सांगत होता तसे ते दोघे म्हणाले "आम्हाला माफ करा आम्ही आता आमच्या आईचे सेवा नियमित करू तिला कोणत्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही" हे ऐकून सीमा शिवा रामोशाला बरे वाटले ते दोघे गेल्यानंतर साधू त्या झाडाच्या बाजूला झाडाखाली बसला होता,तो साधू शिवारामोश्याला बोलला "अरे वेड्या तू तर त्या दोघांना असं सोडलास तर तुला उपाशी मरायची पाळी येईल" शिवा रामोशी त्याला म्हणाला "त्या दोघांना सोडलं, पण तुला नाही ना सोडलं, आता ऐक त्या दोघाना का सोडलं? , अरे गोसाव्या मी लहान होतो माझी आई वडील माझ्या लहानपणीच गेले मग मी अनाथ कुठे कुठे भटकत होतो पण मला कोणी जवळ कोणी घेतलंच नाही आणि शेवटी हा मला लुटीचा प्रकार आवडला ज्यानी ज्यांनी मला सतावलं,मला त्रास दिला होता त्यांना मी एकेक करून या जंगलात याच रस्त्यात लुबाडले आहे आणि माझा प्रतिशोध मी पूर्ण केला आहे पण माझी आई बाबा असते तर मला हा मार्ग करता नसता आला मी चांगला कामधंदा करून संसाराला लागलो असतो आता माझी पण बायको मुलं आहेत ती सगळी माझ्या लुटीच्या प्रकारावर अवलंबून आहेत" हे ऐकून साधु महाराज प्रसन्न झाला म्हणाला "तुझ्यात थोडा माणुसकीचा प्रकार आहे, तू विचार केला तर तू चांगल्या मार्गाला लागून लुटीचा धंदा सोडून मेहनतीने आपला संसार सांभाळू शकतो ,म्हणून तुला मी ही जादूची चक्की देतो" पण तितक्यात साधू म्हणतो "तुझ्या घरी किती माणसं?" तो म्हणाला" माझ्या दोन बायका आणि मुलं असा परिवार आहे" साधू आश्चर्य करून बोल़ला" चांगल्या गृहस्थाला एकच बायको असायला पाहिजे, कारे मग तुला रे दोन बायका का लागल्या ?"साधू शिवा रामोशी म्हणाला "माझी बायको एक लग्नाची दुसरी बायको ठेवली. तीच नाव शांता. तीला अशीच ठेवली. ती मला या रस्त्यातच भेटली होती ती कोणाच्या हाती लागली तर ती वाईट मार्गाला लागेल आणि आता तिच्याबरोबर कोण लग्न पण करणार नाही त्यापेक्षा माझ्याच घरात हिला माझी बायको करून ठेवतो म्हणजे माझा बायकोला घरातल्या कामाला मदत होईल "आणि हो मी शिवा रामोशी असल्याने माझा तसा दबदबा असल्याने तीला वाईट नजरेने कोण बघणार नाही", ही जीवन कहाणी शिवा रामोशाची ऐकून साधू प्रसन्न झाला म्हणाला "तुला आता ड्युटी चे काम करून उदरनिर्वाह करायचं काही काम नाही तूला जादूचे अन्नपुर्णा धान्य दळायचं जातं देतो. ते तू ज्यावेळी तुला गरज पडेल त्यावेळी तू नदीच्या कमी पाण्याच्या पात्रात बसून जात्याला विनंती करायची तसं तुला घरच्या गरजा साठी जेवणासाठी तुला गरजेच्या वस्तु मिळतील पण ही अन्नपूर्णा जात आहे दुरुपयोग झाला तर हे जादूचा जातं कोणत्या गोष्टीला ऐकणार नाही आणि मग साधू शिवा रामोशाला तो जादूचा अन्नपुर्ण जातं देतो, साधू पुढे चालता चालता अचानक अदृश्य होतो, शिवा रामोशी ते जादूचा अन्नपूर्णा जातं ती जादुची चक्की घरी घेऊन येतं आणि आपल्या लग्नाच्या बायकोला चांगल्या गोष्टी जादूचा जात याबद्दल सांगतो. ती दुसरी बायको आळशी ढोंग घेऊन झोपलेली असते, तिचा वाईट स्वभाव गेलेला नसतो पण शिवारामोशी लग्नाच्या बायकोला काय गपचूप सांगतो ते झोपलेली सोंग घेऊन ही दुसरी बायको डोळे मिटून ऐकत असते पण तिला या अन्नपुर्ण जात्याबद्दल अर्धवट माहिती मिळाली असते. आता रामोशीचा प्रकार लुटीचा प्रकार संपलेला असतो. तो एक घरंदाज गृहस्था सारखा घरच्या घरी छोटे-मोठे काम करतो आणि गरज पडली तर चूपचाप त्या अन्नपूर्णा जादुई चक्की मधून घरात लागणाऱ्या वस्तूंचा मागणी करतो त्यासरशी ते जात आपोआप एका जागी फिरतं आणि त्याला जे पाहिजे असते वस्तू त्या वस्तू त्याला मिळत असतात पण ही दुसरी बायको दुष्ट बुद्धीच्या असल्याने तिला अजुन पाहिजे अशी लालूच लागली असते ती विचार करते, मी या जादूच्या अन्नपूर्ण जात्याला सकाळी घेऊन ओढ्याच्या नदीच्या छोट्या पात्रात घेऊन जाईन आणि मी राजमहाल मागेन आणि मी मला गरजेच्या वस्तू मागेन ,हा विचार करून त्या शिवारामोशाची दुसरी बायको भल्या पहाटे अंधार असताना शिवा रामोशाचा ते जादूचा अन्नपूर्णा जातं चोरून घेऊन नदीच्या किनारी कमी असलेला पात्रात बसते त्या जात्याला घेऊन जाता फिरवते आणि बोलते म्हणजेच तिने जाता चोरल्याने आता तिला वाटतं आता मी जगातील पाहिजे ती वस्तू मागू शकते, तिची लालूच वाढुन जाते, जाता फिरवते तशी तिला कल्पना येते ती आधी आवडीच्या जेवणाचा मागणी करते तसं आवडीचं जेवण येतं जेवण खात असताना तिला चवीला खारटपणा कमी लागतं म्हणून ती थोडं मीठ पाहिजे म्हणून जातो फिरवताना ती मिठाची मागणी करते आणि तसं ते जातं फिरू लागतं आणि मीठ समोर येतं त्यातल्या मीठ थोडे जेवणात घेऊन चवीने जेवण जेवत असते पण तिकडे जातं ते फिरत असतं आणि त्यातल्या ते मीठ वाढत असतं पण ती जेवत करीत असल्यामुळे त्याकडे तिचे लक्ष नसतं आणि जात्यातले मीठ फिरल्यामुळे वाढत असतं. होतं काय शिवारामोची दुसरी बायको जेवल्यावर तीला लक्षात येतो कि आपण जातं बंद कसा करणार आता तिला पच्छाताप होतो,आपण हे काय करून बसलो, जात्याला काय बोलणार पण जातं पूर्ण मिठात बुडून गेलं असतं आता जातो काय ऐकणार त्यामुळे आपल्यात मिठाच्या ढिगाऱ्यात जात फिरत असतं इथे नदीचं पात्र पाण्याने भरतं आणि ते जातं फिरत जातं फिरणारे जातं तसंच ते नदीत राहून जातं आणि पाणी वाढल्याने पाणी वाहु लागल्याने रामोशाची दुसरी बायको ती पाण्यात वाहून जाते पण ते जातं कायम फिरत राहीललं आहे, आणि ते जात्यातले खारट मीठ पाणी समुद्राला येऊन समुद्राचे सर्वे पाणी खारट झाले, तेव्हापासून समुद्राच्या पाण्याचा खारटपणात काही बदल झाला नाही ते आजपावेतो ते समुद्राचे पाणी खारटच असते व त्यापासुन मिठ बनवण्याची प्रक्रिया चालूच आहे. . आतापर्यंत ते समुद्राचे पाणी खारटच लागते, ,आजीची मिठाची गोष्ट संपली होती.आता आजी आम्हाला प्रश्न करते तर सांगा
" रामोशाची दुसरी बायको का वाहुन गेली?" पण मी गोष्ट लक्षपुर्वक ऐकल्याने मी आजीला तिच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचो मी म्हणालो "शिवारामोशीने दुसर्या बायकोला राहयला दिलं खाऊपिऊदिलं लोकांनी तिला वाईट बोलू नये म्हणून शिवा रामौशीने तिच्याशी लग्नही केले पण तिचा लोभी, लालची दुष्ट स्वभाव तीचा तिला नडला आणि तिच्या स्वताच्या कर्मानं नष्ट झाली" मग आजी माझं उत्तर ऐकून खुश झाली म्हणाली कृष्णा तू चांगला लेखक होशील हो, आमच्या आजीकडची
आवडलेली हि कहानी .
आमच्या आजीने सांगितलेली हि कहाणी आम्हा सगळ्यांना आवडलेली. आपल्या सगळ्यांना आवडेल हे मात्र नक्की आमची आजी आनंदीबाई गजानन सोमासे हिच आम्हाला गोष्ट सांगायची तेव्हा आजीच्या नावाप्रमाणे, आनंदीबाई प्रमाणेच आम्हाला तिच्या गोष्टी ऐकल्याने आनंद वाटायचा पण ती आजी आता या जगात नाही पण तीने सांगितली अन्नपूर्णा जादूचा जातं ही आजी कडची कहानी मला आवडलेली ती आपल्यालाही निश्चितच आवडेल.
नेहमीच कथा वाचतो ऐकतो पण त्यात कथा कशी असावी, फॅंटेसी असावी अस वाटतं आणि ती कथा वाचताना आपण कल्पनात वाहून जातो वाईट काय? चांगलं काय? त्यात आपण बघून सुधारण्याचा प्रयत्न करतो अशातली एक अन्नपूर्णा "जादूच जातं आजी कडचे" आम्हाला आवडलेली कहानी आपल्याला पण आवडो आणि वाचताना आपले देखील मनोरंजन व्हावे काही लिहायचा छोटासा प्रयत्न
धन्यवाद