The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

krishnakant khare

Others

5.0  

krishnakant khare

Others

तुमचे पालक,तुमचे कुटुंबातील

तुमचे पालक,तुमचे कुटुंबातील

4 mins
798


आम्ही आमचे कुटुंब, तुम्ही तुमचे कुटुंब हे म्हणजे कसं जिव्हाळ्याचं नातं आणि या नात्यात आपण मुलं कधी वयात येतो कधी मोठे होऊन जातो हे आपल्या आपल्यालाच कळत नाही पण आपल्याला जबाबदारी आलेली असते जस-जसे आपले आई-वडील वयस्कर होत जातात तस-तशी आपल्याला जबाबदारीची जाणीव व्हायला लागते मग आपण आपल्या पालकांची ,आईवडिलांची काळजी घ्यायला लागतो मी कसा गुणाचा?, मी कसा चांगला?, घरातल्या आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला कौतुकाने बघावे , आपल्या कर्तबगारीचा कौतुक करावे, असं सोळा ते 25, 27 वयाच्या मुलांना वाटत असतं, आणि खरं म्हणजे हाच वय चांगल्या आशेचं चांगल्या उमेदीचे, चांगलं कर्तबगारी दाखवण्याचं असतं. ज्यांचं शाळा कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं असतं ते मग नोकरी धंदा आपल्या शिक्षणानुसार करत असतात पण हे सर्व करत असताना त्यांच्या पालकांची महत्वाचे भूमिका असते. कारण मुलं हि लहान ते मोठे होईपर्यंत चिखलाच्या नरम गोळ्या प्रमाणे असतात तेव्हा चिखल नरम असेल तरच कुंभार भांडी घडवतो मुलांचं वय लहान असतानाच पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे तरच ते आपलं भविष्य स्वता घडवू शकतात व पालकांची सुद्धा जबाबदारीने पालन-पोषण करू शकतात मी . डी .ए .एस. एम. करून कॉलेजमधून बाहेर पडलो होतो.मला आयुर्वेदिक पंचकर्म दवाखाना घालून प्रॅक्टिस करायची होती. पण आधीच मी नाटकात सिरीयल मध्ये सिनेमात छोट्या-मोठ्या भूमिका करत होतो झालं काय नाटकाचा मला अनुभव चांगला आला होता, कारण जसं दिसते तसं नसते म्हणून माणूस फसते. आणि मी कॉलेज पूर्ण झालेल्या, कोर्स पूर्ण झालेल्या माझ्या ओळखीच्या मित्र-मैत्रिणींना सांगायचं आपला आपापला कॅरियर महत्त्वाचा आहे कारण आपण शिक्षण घेतो पूर्ण करतो त्याआधारे आपण नोकरीधंदा शोधतो,

काम धंदा करतो पण अभिनय क्षेत्र फारच किचकट मार्ग आहे त्यासाठी आपल्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. आपण नाटकात काम करतो त्यासाठी महिनोन्महिने तालमी घ्यावी लागतात, परत तेच नाटक किती शो करते त्यावर अवलंबून असते. सर्रास अनुभवी अभिनेता तालमीला येतो जर दहा, पंधरा शो होत असतील तर तो त्या नाटकात भाग घेतो, मी पण जयवंत दळवींच्या नाटक "सह्याद्रीचा सिंह" यामध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराजांना 2 सरसेनापती ,सेनापती असतात.

ते म्हणजे संताजी धनाजी तसेच औरंगजेबाला ही कामबक्ष खान नावाचा औरंगजेबासारखाच एक सेनापती होता तो मराठ्यांची  एकनिष्ठता राजघडीत फुट पाहण्याकरता महाराष्ट्रात येतो असाच या विषयावर हे नाटक आहे मी या नाटकात     कामबक्ष खांनाची भूमिका केली होती. मी नियमितपणे तालमीला जायचं सुरुवातीला ते "सिंह सह्याद्रीचा सिंह "हे नाटकाचे पुस्तिका बघून एवढं नाटकाचं पात्रातील आपला पात्र पाठ करावं लागतं माझं पाठ कसे होईल कुणास ठाऊक हे नुसतं वाटायला लागलं होतं पण आमच्या या नाटकाचे डायरेक्टर मास्टर डवरी मास्टर यांनी मला धीर देऊन सांगितलं "खरे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त तुमची तयारी दाखवा तुम्ही नियमितपणे तालमीला येतला चला" मी पण प्रोडूसर डायरेक्टर त्यांच्या मजेत अमरजीत राहून नियमितपणे तालमीला येत होतो आणि शेवटी रंगीत तालीम झाली नाटकाचा शो होता कालिदास होलला मुलुंड पश्चिम. डायरेक्टर डावरी मास्टर आणि सगळ्यांची बरिच तालीम करून घेतली होती. आता मी त्या ऐतिहासिक नाटकातला कामबक्ष खान उंचच  म्हणून कामबक्ष खांची माझी निवड करण्यात आली आणि मी त्या निमित्ताने तालमीला येऊन तरबेज झालो होतो सातारा सांगली कोल्हापूर मुरगुड याठिकाणी नाटकाचे शो घेतले होते पण मुहूर्ताचा पहिलं नाटक ते मुलुंड पश्चिमच्या कालिदास हॉल नाट्यगृह यामध्ये झाला. यात एक सांगायचे गम्मत म्हणजे माझे बाबा रामचंद्र बाळकु खरे हेसुद्धा सर्विसला असताना 26जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी त्या खास कार्यक्रमासाठी त्यांच्या कंपनीत तालमी घेऊन नाटक बसविले जायी , लहानपणी पाहायला मिळाले, एक ऐतिहासिक नाटक होतं फॅमिली बॅकग्राऊंडचं नाटक होतं त्यावेळी बाबा ऐतिहासिक नाटकात काम करताना ज्या नृत्यांगना नृत्य करीत त्यावेळी बाबा" शोला है, की बिजली है" असे काहीतरी डायलॉग बोलायचे,

आता मी पण नाटकात काम करताना पाहिल्यावर बाबांना सुद्धा बरे वाटायचे,माझं पण अगदी तसंच नाटक एका प्रसंगात नृत्य करणाऱ्या नृत्यांगनाला बोलायचं असते. ते त्यांच्या वयात असताना कंपनीमध्ये त्यांनी ऐतिहासिक नाटकात काम केला होते. तसंच मीसुद्धा ऐतिहासिक नाटकात काम करताना त्यांनाही बरं वाटलं होतं कारण लहानपणी कुटुंबाने ते ऐतिहासिक नाटक ज्यात बाबांनी काम केलं होतं ते नाटक आम्ही पाहिलं होतं. सेम तसंच नाटक आता कालिदास नाट्य हॉलमध्ये "सह्याद्रीचा सिंह" हे एतिहासिक नाटक लागलं होतं.त्यात कामबक्षखानाची माझी भुमिका होती. आमची पंधरा सीटरची गाडी होती. त्या गाडीत आमचं कुटुंब माझी बायको,आमचेआई बाबा, दादा वहिनी,आणि आमची मुले आम्ही सगळे मिळून 15 सीटर बसमध्ये बसून मुलूंडला कालीदास नाट्य हॉलमध्ये नाटकाला सहपरिवार आलो होतो. आमचा ड्रायव्हर मला बघून असं काही वाटत नव्हतं कि मी कोणी चांगला ऍक्टर आहे पण त्यादिवशी सगळे कुटुंब मिळून नाटक बघायला आले होते तो क्षण माझ्याकरता संस्मरणीय होता कारण घरातल्या सगळ्यांनी ते नाटक नाट्यगृहात एकत्र बसून नाटकात मला काम करताना सर्वांनी मला बघितलं होतं महिनाभर तालमी चालण्याने कामबक्षखानाची माझी भुमिका "सह्याद्रींचा सिंह"  या नाटकात होता मी उठून दिसत होतो. ड्रायव्हर माझी मस्करी करत होता तो ड्रायव्हर ते नाटक बघून सिन्सरेली झाला आणि मला" खरे, आप्पा नाटक छान आहे, पण तुम्ही काम पण चांगलं केलं आहे" असं बघताना तुम्ही साधे सरळ दिसता ,वाटत नाही तुम्ही नाटकात काम करता"किती धिप्पाड खान पठान वाटत होते तुम्ही,"पण मी ड्राइवरभाईला कसं सांगु कि आमच्या ड्रेस दादानी आमचा ड्रेस चढवताना आधी मला बीन बाहीचा जाड जैकिट घालायला दिला होते ते. ड्रायव्हरचा बोलने बघून मला बरे वाटले. त्यातल्या त्यात आमचा घरातला परिवार मी काम केलेले "सह्याद्रींचा सिंह " माझे नाटक बघायला आले होते, त्यांनाही सगळ्यांना माझं नाटकातलं काम आवडलं होतं,असा संस्मरणीय क्षण कुटुंबातला 

सर्वोत्तम क्षण माझ्याकरता होता.


आपण आपल्या पालकांबरोबर पाल्याने काय तरी क्षण द्यायला हवेत कारण आपण मोठे झाल्यावर मग आपल्याला नौकरी,कामधंदा निमित्त वेळ मिळत नाही आपल्या पालकांबरोबर वेळ मिळत नाही मग ते जर आपल्यापासून दूर असले तर आपल्याला त्यांची किंमत कळते म्हणूनच आपण पालक म्हणून आपण त्यांची मुले म्हणून पालकांचे काळजी घेऊन त्यांच्याबरोबर काही क्षण मौज मस्तीने, त्यांना काही मदत करून घालवले पाहिजे काहीतरी संस्मरणीय क्षण झाला पाहिजे असंच माझ्या लिखाणातून आलेला आहे धन्यवाद


Rate this content
Log in