तुझं माझं ब्रेकअप... एक गंभीर प्रश्न
तुझं माझं ब्रेकअप... एक गंभीर प्रश्न


असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या गाठी या स्वर्गातूनाच बांधलेल्या असतात. समाजात वावरताना येणाऱ्या संकटाशी सामना हा प्रत्येकाला करावा लागतो. मुलगा किंवा मुलगी मोठे झाल्यावर आई-वडीलांना काळजी लागते ही, आता आपली लेक उपवर झाली, मुलगा उपवर झाला त्यांना हवा तसा जोडीदार मिळायला हवा. मग त्यांना मुलीला किंवा मुलाला चांगलं स्थळ शोधायला सुरुवात करतात. मुलांच्या अपेक्षा असतात त्याला मुलगी चांगली, त्याच्या अपेक्षेप्रमाणे हवी तसेच मुलीची अपेक्षा असते की तिला तिच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा हवा.
आजकाल आपण बघतो की समाजात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत आहे.सासरी मुलीचा छळ केला जातो ती मुलगी त्रासली जाते मग ती कोणाला नको असते. मग शेवटचा मार्ग म्हणजे घटस्फोट. अरे, घटस्फोट म्हणजे पोरखेळ वाटला का? त्यावर उपाय का नाही करत. का मुलीचा खेळ केला जातो? सासू हीपण कोणाचीतरी मुलगी असते ना? पण तिला हे कसं कळत नाही. प्रत्येकाने सुनेला आपली मुलगी मानायला हवं तिला घरात हवा तसा मान द्यायला हवा. मुलगी घरात लहानाची मोठी होते. त्या घरात लहानाची मोठी झालेली लेक दुसऱ्याच्या घरात देऊन टाकावी. किती मोठा दगड ठेवावं लागत असेल त्या आई-वडीलांना. लाडात वाढलेली दुसऱ्याच्या घरात येते तेथे तिला सगळ्यांचा मान राखून सांभाळून राहावं लागतं आणि त्या मुलीला असं छळलं जातं का? मग ताण वाढतो मग होते ताटातूट. आज जर प्रत्येकानी सामंजस्य दाखवले तर ही घटस्फोटाची वेळ कोणावर येणार नाही एकमेकांना समजून वागायलं हवं.
समाजात वावरताना स्त्रीला प्रत्येक घटनांना सामोरे जावे लागते. मुलगी म्हणून तिला हिणवले जाते. मुलीचा जन्म होतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते तर मुलगा झाला ते सगळे आनंदित होतात, का? तर तो वंशाचा दिवा म्हणून. अरे हा भेदभाव का? शेवटी जन्म देणारी एक स्त्रीच असते ना? समाजात स्त्रीला असं स्थान का दिलं जातं?
आजच्या युगात स्त्री ही कशातही कमी नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन ती प्रत्येक संकटाला सामोरे जाते. भांडण कोणाच्या घरात होत नाही, कुटुंब म्हटले की रुसवे-फुगवे आले त्यावर तोडगा काढावा लागतो. उपाय करता येतो आणि दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणता येतात. समोरचा जर वाद घालत असेल तर त्याच्याशी वाद न घालता त्यावर तोडगा काढावा.
लग्न ठरतं सगळे आनंदित असतात. आज-काल लग्नाच्या अगोदर एकमेकांसोबत ही तरुण पिढी वेळ काढते सगळे आनंदी असतात. लग्न होतं. नंतर एकमेकांच्या सहवासात दोघांचा आनंदी संसार चालू होतो. या संसारवेलीवर एक फुल उमलतं, त्या फुलाचा सुगंध संपूर्ण कुटुंबावर दरवळतो. सुगंध त्याच्या संसारात एक आनंद घेऊन येतो. त्या फुलाला म्हणजे त्याच्या पिल्लाला वाढवता वाढवता ते लहानाचं मोठं कधी होतं हे त्या दोघांनाही कळत नाही.
हळूहळू संसार करता करता त्यांच्यामध्ये काही कारणांनी खटके उडायला सुरुवात होते. हे खटके शेवटी विकोपाला जातात. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना हेही कळत नाही याचा परिणाम त्या निष्पाप बालकावर होतो. ते निष्पाप बालक काय विचार करत असेल आपले आई-वडील घरात भांडतात. या भांडणाचा परिणाम त्याच्या कोमल नाजूक आयुष्यावर होतो. याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होतो. त्याची प्रगती न होता तो सगळ्यांमध्ये मागे खेचला जातो. अरे, कमीत कमी नाही कोणाचा तर आपल्या लेकराचा विचार करा. आपण घरात वाद घालतो तर तुमची समाजात काय किंमत राहील, तुमच्या समोर तुमचा मानसन्मान राहील की जाईल. समोरचा जर वाद घालत असेल तर आपण शांत राहायला हवं. समोरच्याला समजून घेणं हा तुमचा शहाणपणा ठरेल.
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला गरज असते ती म्हणजे कोणाच्यातरी सल्ल्याची. तुमच्यात दुमत होत असेल तर तुम्ही मोठ्या माणसाचा सल्ला घ्या. कदाचित त्यांच्या सल्ल्यामुळे तुम्ही एकत्र येऊ शकाल. एक उदाहरण देते, कडूलिंबाचे. तो कडू आहे ही त्याची चूक आहे का?तरीपण तो खूप रोगांवर रामबाण उपाय आहे. सगळ्यात स्वार्थी आपली जी जीभ, तिला नेहमी गोडच आवडतं. पण हीच जीभ समोरच्याला बोलून स्वतःचा गोडवा कमी करते.
आज समाजात निंदा करणाऱ्या लोकांची कमी नाही. निंदिते लोक जरी हे विसर त्यांचे बोलणे या जगाची रीत आहे. निंदने मग वंदने... त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्या. पुढचे पाऊल उचला व समजुतीने एकमेकांना समजून घ्या. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. नातं एकदम तोडू नका. एक शायरी आहे-
जिंदगी में जो हम जो चाहते है वो आसानीसे नही मिलता लेकिन जिंदगी का सच है कि बटवे थोडे भारी है और रिश्ते हलके हो गये...
हसत राहा, हसवत राहा, शांत राहा, संयम ठेवा, सगळं छान होईल हा विचार ठेवा...