तरीही ती लढा देतच आहे... - भाग 1
तरीही ती लढा देतच आहे... - भाग 1


आंबेसराई म्हणून एक छोटेसे गाव बरं का... त्या गावात लक्ष्मण म्हणून एक गृहस्थ राहत होते, त्यांची पत्नी तारा यांच्यासोबत. गावात त्यांची भाली मोठी शेती होतो, जनावरं होती. त्यांना ३ मुलं आणि ३ मुली होत्या. लक्ष्मण हे अगदी कडक शिस्तीचे होते, त्यांनी आपल्या सगळ्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या तिनही मुलांचे लग्न झाले होते, आणि दोन्ही मुलींचे सुद्धा लग्न झाले होते. मुली आपापल्या घरात सुखाने नांदत होत्या, आणि सूनाही अगदी सरळ आणि साध्या होत्या. घरात सगळे लक्ष्मण ह्यांना घाबरत असे, गावात ही चांगलाच त्यांचा दरारा होता. आता त्यांची लग्नाची फक्त लहान मुलगी राहिली होती.....,त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना अगदी बहिणीच्याच घरी दिले होते, आणि आता वेळ होती ती सुजाता म्हणजेच त्यांची लहान मुलगी हिच्या लग्नाची. सुजाताने त्यावेळी १२ वीचे शिक्षण पूर्ण केले होते. पण लक्ष्मण ह्यांनी सुजातासाठी खूप दूरचे स्थळ शोधले होते. स्थळ सुजाताला बघण्यासाठी आले, सुजाताला त्यांनी पसंत केले, थोड्या दिवसांत सु
जाताही लग्न करून तिच्या सासरी गेली. घरात फक्त त्यावेळी लक्ष्मण ह्यांचेच चालत होते, त्यांच्या शब्दापुढे कोणीही जात नसे. सुजाता ही तिच्या सासरी धाकटी सून होती. ही कहाणी होती सुजाताची.....
सुजाताच्या घरी तिचे सासू, सासरे, जेठ, जेठानी, सुजाताच्या घरचे म्हणजेच शैलेश , सुजाता आणि तिच्या जेठानीनीची ३ मुलं, एवढे सगळे गावात एकत्रित राहत होते. त्यांची भलीमोठी शेती होती. दोन्ही भावंडं शेतीच करत होते. शेतीवरच त्यांचे सगळे अवलंबून होते. काही वर्षात सुजाताला ही ३ मुलं झाली, दोन मुली एक मुलगा. सुजाताच्या घरात सासू सासरे असल्याने अगदी घरातच ती असायची, घरातली कामे , सुजाता आणि तिची मुलं बस इतकचं तीचं आयुष्य... अगदी शेतातही ती जात असे. तसे सासू सासरे चांगले होते, पण सासरे थोडे कडक होते, आठवड्याला सासरे भाजीपाला घेऊन येत असत, त्यांच्या गावात आठवडी बाजार भरायचा, त्यांना घराबाहेर जाण्याची मुभा नव्हती, बाहेरची कामं सगळी माणसेच करत...
(क्रमशः)