Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

...तर सोन्याचा धूर निघेल!

...तर सोन्याचा धूर निघेल!

1 min
186


आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळून पाऊन शतक होत आहे. पण आपले पूर्वीचे बलाढ्य भारत, नंदनवन भारत, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्यांना अनेक प्रकारचे हाल अपेष्टा, तुरूंगवास, फाशीची शिक्षा भोगून मिळालेल्या स्वातंत्र्याचे आपण काय करत आहोत याचे भानही आपल्या देशबांधवांना व राज्यकर्ते नेत्यांना राहीलेले नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्याचे ध्येय, उद्देश व स्वप्नाचे आपण जणू काही अपमानच करत आहोत. त्यांच्या स्वप्नातल्या नंदनवन भारत, बलाढ्य भारत, साक्षर भारत, भृष्टाचार मुक्त भारत हा मार्ग सोडून आपण या प्रकाशाकडे नेणारा मार्ग सोडून अंधाराच चाललो आहोत. याचा आपल्या राज्यकर्ते यांना प्रकाश पहायला हवा.. 

   

आपल्या देशातील दारिद्र्य, गरिबी, उपासमार, निरक्षर या गोष्टींना आपण जबाबदार आहोत. या पातळीवर येेेेेण्याचेे कारण म्हणजे भृष्टाचार, लोभ, हव्यास यामुळेच आपण आज कित्येक गोष्टीत स्वातंत्र्य असूूनही पारतंत्र्यात दिवस काढत आहोत. सोन्याचा धूर निघणाऱ्या आपल्या देशात अशा प्रकारची परिस्थिती आपणच ओढवून घेत आहोत. आज पहा जिकडे पहावे तिकडे भृष्टाचाराचा अंधार व्यापलेला आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. आपल्या देशावरचे देणं वाढतच जाऊ लागले, परकीयांच्या गुुलामगिरीत आपल्याला निर्णय घेणे भाग पडत आहे. परंतु आपले देेशकर्ते जर भ्रष्टाचारमुक्त केले तर आपल्या देशातूून कोटय़वधी रूपये परदेशात ठेवण्याऐवजी जर भ्रष्टाचारमुक्त राजकारण करून अंधारातून प्रकाशाकडे नेेेेण्याचेेेे राजकारण करायला सुरुवात केले तर आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायला वेेेेळ लागणार नाही. 


Rate this content
Log in