तो पाऊस
तो पाऊस
मी तर काही मुलांबरोबर शाळेच्या मधल्या सुट्टीत पावसाळ्यात नदी, ओहळ्यावर पोहायला पण जात असे,पण आम्ही कधी नदीच्या ,ओहळ्याच्या खोलवर कधी गेलो नाही,आम्हाला शाळेत प्रार्थनेच्या वेळी वर्तमान पेपर वाचुन काढायला लावत ,त्यामुळे कोण, कुठे पावसाळ्यात बुडून मेला हे वाचायला मिळे हिच बातमी घरी सांगायचो पण घरातील मोठी माणसे सांगायचे पाणीपाऊस,आगीशी आणि लाईटकरंटविजेशी आपणहुन खेळण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर माणसे ह्यात काळजी न घेतल्याने नाहक मरतात म्हणून मी पाणी पावसात नदी ओहळ्यावर पोहायला जाताना स्वताला जपायचो,मी सगळ्यांच्या सहकार्याने चांगला पोहायला शिकलो होतो.
पण सध्या धावपलीच्या व्यवहाराने माणसं बदलत चाललीत त्यानुसार हवामानाचं काही खरं राहिलं नाही पण आता या वर्षभरात पावसाने सुद्धा राग रंग दाखवायला सुरुवात केली आहे, पूर्वी पाऊस ठरलेल्या वेळात,ठरलेल्या महिन्यात चार महिने पडायचा आता पाऊस काहीच ठरवुन पडत नाही तर तो वर्षभर कुठे ना कुठे बरसात असतो.
2019 चा पाऊस पावसाचे चार महिने पालटून सुद्धा कुठे ने कुठे बरसात राहिला , देशभरात या पावसाने सगळी कडे जनमान परिस्थिती विस्कळीत केली होती.
या पावसाने त्या पावसाची आठवण करून दिली आणि तो पाऊस म्हणजे 26 जुलै 2005 चा मुसळधार पाऊस. बृहमुंबई सह ठाणे शहर सुद्धा त्या पावसाने ढग फुटी चा नावाने प्रलयंकारी पाऊस, अनेकांना शहारा यावा असाच होता. त्याच मंगळवारच्या दिवशी अनेक ठिकाणी स्थिती पुरमय झाली होती.26 जुलै चा तो पाऊस ज्याने ठाणे मुंबई शहरात थैमान घातलं होतं, थैमान घातलेल्या त्या पावसाने ठाणे मुंबई शहराला अक्षरशः पाणी पावसाने झोडपले होते. संध्याकाळपर्यंत जर आकाशातून बघितली असती तर जमिनीची झालेली बेटे ही तुरळकच दिसली असती.
अशावेळी ठाणे मुंबईतला नागरिक की ज्याने हातावर हात घडी न घालता त्या प्रलयंकारी येणाऱ्या पावसाशी चार हात करण्याची साहसी वृत्ती दाखवली,
पण तो 26 जुलै 2005 चा पाऊस खरच तो पाऊस होता, मुंबईकरां प्रमाणेच ठाणेकरांची ही पावसाने धूळधाण उडवली पण मुंबई करा प्रमाणेच ठाणेकरांनी ही अतुलनीय धाडस आणि शौर्य यांचे दर्शन घडविले होते.त्यात मी हि होतो त्याचं झालं असं माझी zdp ला तारीख होती,आणि इंक्वायरीला भिवंडीच्या माणकुलीच्या ग्रामीण रुग्णालयात यायचं होतं, मी माझ्या मेडीकल डिप्लोमा ची सर्टिफिकेट ,रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अस काही कागदपत्रे व काही पैसे खर्चासाठी बैगत घेऊन माणकुलिला आलो होतो.पण या दिवशी पाऊस कमी व्हायचा नाव घेत नव्हता,मी zdp झेडपीच्यां साहेबांची एक दिड तास वाट पाहिली आता या पाणीपावसामुळे साहेब येणं शक्य नाही हे कळल्यावर मी माणकुली हुन परतीच्या प्रवासने घरी यायला निघालो,दोघांतिघांकडनं असंही ऐकलं" आजचा पावसाचं काही खरं नाही जसं कुठे असाल तसं घराकडे यायला बघायचं" मी पण घाईने घराकडे जाण्यासाठी प्रयत्न करीत होतो,पण रस्त्याच्या नाळ्याकडच्या बाजुला पाणीपावसाने रिक्षा आडकली होती,पावसाच्या पाण्याचा लोंढ्याने ती रिक्षा वाहुन गेली असती त्या रिक्षात बाईमाणसं ,लहान मुले पण होती,लांबून रिक्षावाल्यानी हाक मारली व गाडी बाहेर काढण्यासाठी मदत मागु लागला
,मी पण मनात काही न आणता रिक्षावाल्याला मदत करू लागलो आणि रिक्षा रस्ताच्या कडेला आणली,सगळ्यानी सुटकेचा श्वास सोडला.रिक्षावाल्यानी व बाईमाणसं,सर्वांनी माझेआभार मानले,मी किंवा माझ्याठिकाणी दुसरा कोणी नसता तर या ठिकाणी आवश्य विपरित काही तरी घडलं असतं असे रिक्षावाल्यासहित रिक्षातले बाईमाणस देखील हेच बोलत होत,मला बसस्टोपच्या दिशेने जायचं होतं पण आताच कुठे मी त्यांना मदत केली होती,त्याबदली रिक्षावाल्याकडे लिफ्ट मागु हे माझ्या स्वभावाला पटणारं नव्हतं,मीच त्यांना दिलासा देत म्हणालो,तुमच्या रिक्षात जागा नाही होणार त्यापेक्षा परत गोंधळं होण्यापेक्षा मीच पायी पायी बसस्टॉपवर येतो नाहीतरी येथून पाच मिनिटांने बसस्टॉप आहे.मी समजुत काढून पुढे निघालो. हातात छत्री नी बैग घेऊन बसस्टॉपवर आलो थोड्यावेळाने कापुरवाडी पातलीपाडाला जाणारी एस्टी मिळाली, पण घोडबंदर रोडला गरवारे कंपनीच्या रस्त्याच्या मेन हायवेला ट्राफिक वाढली होती .मला बस मधून उतरूण पाई पाई पातलीपाडाच्या घरी जायचं होतं मी निघालो.
ठाण्याच्या पातलीपाडा हायवे लगतच्या जंगलातून येणारा मोठा नाळा कचऱ्यामुळे तुंबला होता. पाण्याची पातळी इतकी वाढली की अखेर रस्त्याच्या कडेला असलेली भिंत फुटली आणि रस्त्यावर पाणी पसरले रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी कसेबसे स्वतःला सावरले. पाण्याचा प्रवाह वाढतच होता मी याच रस्त्याने आपली महत्त्वाचे कागदपत्रे पैसे घेऊन घरी परत येत होतो पाण्याच्या ओघवत्या प्रवाहाचा सामना मलाही करावा लागला ,कसाबसा तोल सावरत मी पुढे पुढे चाललो होतो माझ्यापुढे दहा-बारा वर्षाचा एक मुलगा होता त्याच्या आजोबांबरोबर चालला होता दुर्देवानं पाण्याच्या प्रवाहा समोर त्या लहानग्याचा निभाव लागला नाही पाण्याच्या एका लाटेबरोबर तो तोल जाऊन पडला आणि प्रवाह बरोबर वाहून जाऊ लागला त्याला वाचवण्याच्या नादात त्याचे आजोबा ही गटांगळ्या खाऊ लागले आणि तेही पाण्याबरोबर वाहून जात आहेत हे माझ्या लक्षात आले आपल्या हातातील महत्त्वाचे कागदपत्रे व रोख रक्कम याचा विचार न करता मी त्यांना वाचायला लागलो दोघांनाही शर्टाच्या कॉलरला घट्ट धरून मी बाहेर काढले रस्त्याच्या मध्ये भागी असलेल्या उंच भागावर त्यांना दोघांना आणून बसवले धीर दिला. घरी जाण्याचा सुरक्षित मार्ग दाखवला दोघांना वाचवण्याच्या नादात माझी महत्वाचे कागदपत्रे काही रक्कम पाण्यात वाहून गेली होती पण त्यावेळी मला त्याची परवा वाटली नव्हती घरी पोहोचून आपल्या अंगणात स्वस्थ बसलो असता त्याच रस्त्यावरून काही लोक वाहून गेल्याची बातमी शेजाऱ्यांनी सांगितले त्यावेळी मात्र आपण किमान दोघांना वाचवु शकलो याचे समाधान मला वाटत होते,
खरच तो पाऊस ,ढगफुटीचा तो पाऊस
पण
भलेही तो पाऊस माझ्याकडनं दोघांचे जीव वाचवुन गेला,
पण तो पाऊस ,तो पाऊस त्याला हेच सांगायचे असेल कदाचित, "मी बरसेन, बरसेन त्यावेळी माणुसकीची परीक्षा सुद्धा असेल!"
तो पाऊस मला अनुभवता आला, माणुसकीची मर्यादा सांगता गेला, कोणतीही गोष्ट मर्यादा पलिकडे गेली की तो पाऊस त्याचे महाप्रलयकांरी ,ढगफुटी पाऊस व्हायला वेळ लागत नाही, मग अशातून जो मार्ग काढतो तोच टिकून राहतो. मग कसा टिकून राहतो व माणुसकी कशी टिकवतो हेच ह्यात वाचायला मिळतेय,