Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pakija Attar

Others


4.5  

Pakija Attar

Others


............तो आवडतो देवाला !!

............तो आवडतो देवाला !!

4 mins 743 4 mins 743

हवेत गारवा होता. आज शाळेत बरेच शिक्षक आले नव्हते. आज दिवसभर शाळेत काम करावं लागलं. एकही ऑफ तास मिळाला नाही. सलमा फार थकली होती. शाळा सुटली. तिने पटकन आवरले. ट्रेन पकडली. बसायला जागा मिळवली. डोळे मिटले.


तेवढ्यात फोन वाजला. "हॅलो दादा काय म्हणतोस! आवाज येत नाहीये. मी घरी गेल्यावर फोन करेल."असे म्हणत तिने फोन ठेवला. 


खिडकीची जागा मिळाली . गार वाऱ्यामुळे तिचा डोळा लागला."आहो , स्टेशनआले. उतरायचे ना तुम्हाला?". तिने डोळे उघडले. पटकन वरून बॅग घेऊन स्टेशनवर उतरली. भरभर चालू लागली. पोचल्यावर आधी दादाला फोन लावला.


"बोल दादा तेव्हा मी ट्रेनमध्ये होते ऐकायला येत नव्हतं रेंज जाते ना मध्ये मध्ये."


"तुला वेळ आहे ना."दादा म्हणाला.


"बोल बोल निवांत आहे मी आता, घरी आले." सलमा म्हणाली.


"आपल्या बाबाजींना कॅन्सर झालाय!"


"काय?" असे म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मुलगा धावतच आला. 


"काय झालंय आई ?का रडतेस?"त्याने आईच्या हातातून फोन घेतला."मामा काय झालं रे. आई रडते एवढी."


"हे बघ आजोबांना कॅन्सर झालाय. आईला सावर, तिला धीर दे." असे म्हणत मामाने फोन ठेवला."तेवढ्यात बेल वाजली. मुलाने दरवाजा उघडला.


" अबू बरं झाले, तुम्ही आलात. मम्मी पहा रडते. दादाजींना कॅन्सर झालाय."


"काय? फार वाईट झालं. सलमा असं कर आत्ताच निघते का? मी सोडतो तुला"


"नाही उदया शाळेतूनच जाईल. दहावीच्या मुलांचा पेपर आहे. पेपर माझ्या लॉकर मध्ये आहे. मला ते द्यावेच लागतील." सलमा म्हणाली.


दुसऱ्या दिवशी शाळेतूनच पुण्याला जाण्यासाठी निघाली. एसटी पकडली. तिच्या मनात अनेक विचारांचे थैमान माजले होते. बाबाजी देव माणूस. त्यांचा स्वतःचा वर्कशॉप आहे. गावाकडून आलेल्या बऱ्याच गरीब मुलांना त्यांनी शिकवले. घरच जेवण दिलं. त्यांना कुशल बनवलं. काही कंपनीमध्ये लावले. त्यामुळे गरीब लोक सुद्धा बाबाजींना दुवा देत. अशा अनेक मुलांचा उद्धार केला. चाचा म्हणून प्रसिद्ध होते. चाचा म्हटले इमानदार, गरिबीची जाणीव असणारा, कनवाळू, दयाळू, प्रेमळ अशी व्यक्ती. त्यांना कॅन्सर व्हावा हेच सलमाला पटत नव्हते


तेवढ्यात गाडी थांबली.


"गाडी पुढे जाणार नाही. इंजिन खराब झालंय. दुसरी एसटी आली तर बसून देईल. फोन केलाय. दुरुस्तीला माणूस येईपर्यंत वाट बघावी लागेल. "कंडक्टर म्हणाला.


भर दुपारची वेळ होती. रखरखत्या उन्हात घाटावरच बस थांबली. घाटाला बांध नव्हता. एखाद्या झाडाजवळ विसावा घ्यावा यासाठी पुढे लोक चालत गेले. खाली खोल दरी दिसत होती. मुलेबाळे घेऊन सगळे उतरले. सलमा उतरली.


तेवढ्यात" आई ग..."असा आवाज आला


लोक धावले. एक छोटी मुलगी घसरली होती. झाडाला अडकली होती. खाली पाहिलं तर खोल दरी. सलमाने पाहिले


तिला तर चक्कर आल्यासारखं झालं. मुलीला सगळे आवाज देत होते. "झाड पकडून ठेव. तुला वर काढतो. दोरआहे का? कोणीतरी वाचवा माझ्या मुलींला. "आई रडत होती.सलमा धाडसाने पुढे आली. "यावर एकच उपाय आहे. इथे कोणी काही दिसत नाही. फोन केला आहे मदतीला कोणी येईपर्यंत मुलगी तग धरेल का? येथे किती बायकांनी साड्या घातल्या ते पहा. साडी काढून जर एकेक साडी बांधली तिच्यापर्यंत सोडता येईल."कोणी तयार होईना. मुलीच्या आईने आपली अंगावरची साडी फेडली. म्हणू लागली. " मी हात जोडते. द्या साडी फेडून" ती प्रत्येक स्त्रियांच्या पायावर लोळण घेऊ लागली.


"पुरुष वर्गाने आपला शर्ट काढून आपल्या आपल्या बरोबर असणाऱ्या महिलांना द्या."


त्यामुळे सर्व महिला तयार झाल्या. साड्या ची गाठ एकमेकांना बांधत गेले. लांबलचक दोर तयार झाला. सलमाने प्रत्येक गाठ तपासून पाहिली. शेवटच्या टोकाला छोटीशी काठी आणि आणि एक दगड बांधला. साडीचा दोर खाली टाकला. "तनु, पकड तो दोर घट्ट पकड. दोर सोडू नको आम्ही वर खेचतो."


महिलावर्ग सर्वांनी हात जोडले होते. देवा आता तूच मदत कर. सलमाने अल्लाहकडे प्रार्थना करू लागली. 

"अल्लाह या मुलींला वाचव ! तू दयाळू आहेस. आईची अवस्था बघ". ती एक सारखे म्हणत होती.


"माझ्या मुलीला वाचवा. नाहीतर मी पण जाते तिच्याजवळ. माझं बाळ वाचवा." 


मुलीने दोर पकडला हळूहळू तिला वर खेचू लागले. प्रत्येकाचा श्वास रोखला होता. प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून पाहत होते. ती वर आली. आईने तिला मिठीत घेतले. कुरवाळले. ती सलमा कडे वळली. तुमच्यामुळे माझे आज मुलगी वाचली. पाया पडू लागली.


"मी काही केले नाही. करता करविता तो वर बसलेला आहे. त्याची कृपा."


"जाको राखे साइयां मार सके न कोई!!"


"चला एसटीत बसा. गाडी तयार झाली आहे." कंडक्टर म्हणाला. 


सगळे गाडीत बसले. गाडी निघाली थेट पुण्याला पोचली. सलमा उतरली. सगळ्यांनी तिचे आभार मानले. ती भावाच्या घरी आली. बाबा खुर्चीवर बसले होते. तिने मनाला सावरले. 


"बाबाजी कसे आहात?"


"अग तू कशी आलीस.असलम, आपा आली आहे."


दादा धावतच आला. त्याने डोळ्यानेच सलमाला खुणावले. बाबांना काही सांगितलेले नाही. बाबा इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागले. बाबांना काहीच माहित नाही पण केमोथेरपी डॉक्टर सांगतील तेव्हा काय होईल या विचाराने सलमा हवालदिल झाली.


"अल्लाह या फरिश्ता सारख्या बाबाजींना बरं कर। त्यांना हि शिक्षा का ?"


बाबाजी कोणाला तरी म्हणत होते, "जो मनुष्य चांगला असतो. तो देवालाही आवडतो."


काही महिन्या नंतर, बाबाजी कॅन्सरमुक्त झाले.


तिच्या प्रश्नाचे उत्तर तिला मिळाले होते.


जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला.


Rate this content
Log in