Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

3 mins
242


    तंत्रज्ञान म्हणजे काय हो? प्रथम याचाच विचार करायला हवा नाही का?

   काय होते तंत्रज्ञान हा शब्द फार भरभक्कम,मोठा,न समजणारा असा वाटतो.मला पण तसाच वाटत होता.पण हे तंंत्रज्ञान एकदा अवगत झाले की झालेला आनंद इतका असतो की तो शब्दात वर्णन करता येणार नाही.

  चला तर आता पाहू तंत्रज्ञान...

तंत्रज्ञान म्हणजे माणसाची सध्या होत असलेली आधुनिक प्रगती. मानवाला मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारातील समतोल.तंत्रज्ञानातून विज्ञानप्रगती.विज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग करून विविध साधनांची सोय उपलब्ध होते.हे आधुनीक ज्ञान म्हणजेच तंत्रज्ञान होय.विविध अवजारे,यंत्रे, यांचा भौतिक सुखासाठी नित्य वापर ,दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी वापर होतो.उदा..पूर्वी आदिमानवाला चाकाचा शोध लागला.त्याचा वापर अनेक यंत्रात होवू लागला.जसे बैलगाडी,घड्याळ,पवनचक्की इत्यादी.

 पुढे पुढे मानवाने प्रगतीचे पंखच जणू लावले व मस्त मानवाची प्रगती होत गेली. 

   पवनचक्की,शिलाई यंत्र,छापखाना  असे कितीतरी यंत्र मानवाने जन्माला घातले.

   माणूस एकमेकांपासून दूर असेल तर बोलण्याचीही सोय केली म्हणजे टेलीफोनचा शोधही लावला गेला.त्या पूर्वी पत्रव्यवहार असायचे. त्या पत्रातही लेखन करायला मजा यायची.आणि आपले पत्र नातेवाईकांच्या हातात पडून त्यांचे परत उत्तर येईपर्यंत जी मनाची घालमेल चालायची त्यातही एक वेगळा आनंद लपलेला असायचा. पण फोनचा शोध लागला आणि नंबर फिरवला की लगेच माणूस एकमेकांशी बोलायला लागला.

  अशा रितीने मानवाने प्रगतीचे पंख गगनी पसरवायला सुरूवात केली.

   नंतर साधे बटणांचे मोबाइल आले .हा मोबाईल खिशात टाकून माणूस हवे तेव्हा हवे तिथे संपर्क करू लागला.माणसाला चिंतेचे काहीच कारण राहिले नाही .

  हळूहळू टचस्र्कीन मोबाईल बाजारात आले हा शोध तर काय फारच आकर्षकहोता.सर्वच जग सेकंदात जवळ आले. सातासमुद्रापलीकडील आपल्या आप्तांशी सेकंदात बोलणे होतेय.फोटो शेअर करतोय,विनोद,दुःखद बातमी , असे सर्व काही सेकंदात आपण पाठवू शकतो...

   तसेच यात जगातील सर्व एकत्रीत येतात असा प्लॅटफाॅर्मही मिळाला.फेसबूक,इन्स्टाग्राम,व्हाॅटसॅप,ट्विटर ,संगणक अशा विविध तंत्रज्ञानाचा उपयोग मानव नित्य जीवनात करू लागला आहे.

  या सर्वांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर होत चालले आहे.

   अगदी मानवाला झालेल्या आनंदापासून ते दुःखापर्यंत सर्व पोस्ट शेअर केल्या जातात.माणसांची ओळख होते.चांगले वाईट अनुभव येतात.

  तंत्रज्ञानाबद्दल आत्मियता वाटण्यासाठी विचारांचे आदान प्रदान गरजेचे आहे.नवनिर्मितीचा ध्यास हवा आहे.

  आता जरा भाषेकडे वळूया. प्रांतीय भाषा विचारात घेतली तर सर्वांना मराठी छान जमते.

  पण जागतिक लेव्हलवर पाहिले तर इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर जास्त होताना दिसतो.त्या साठी मानवाला या तिनही भाषा अवगत असाव्यात .अगदी जास्त नाही आले तर समजण्याइतके तरी भाषाज्ञान हे हवेच.

  हल्ली मराठी भाषेचे फाॅन्टही छान उपलब्ध आहेत.तगदीतुम्ही मराठी बोलून त्याचे इंग्रजी वाक्य होते.असेही की बोर्ड उपलब्ध असल्याने मराठी इंग्रजी ही भीती आता राहिलेली नाही.

   या भाषा विकासाबरोबरच आणखी एक सांकेतीक भाषा या विविध माध्यमांद्वारे चालते .

  आनंद,दुःख,आश्चर्य,कंटाळा हे असे दाखवण्यासाठी शब्दांऐवजीसांकेतीक खुणा वापरतात.इथे शब्दातून व्यक्त हौण्या ऐवजी सांकेतीक भाषेतून म्हणजेच इमोजीचा वापर सर्रास केला जातो.ही पण एक या युगातील भाषाच म्हणावी लागेल.

  कदाचीत काही वर्षानंतर सर्व जगाचाच जीवन जगण्यात सारखेपणा येईल हे निश्चित.

  आपल्या जीवनमानात हास्यरसाचा शृंगार पूर्ण करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग होतो हे मात्र १००% खरे आहे.

   आपले जीवनमान या तत्रज्ञानामुळे उंचावत आहे .नित्य काही शिकत आहे .प्रगतीपथावरील हे आयुष्य पाहताना असे वाटते की आतापर्यंत जे अवगत नव्हते अवगत करावे व या तरूण पिढीबरोबर राहावे.

   या तंत्रज्ञानाचे धडे गिरवायला हवेत.खूप काही शिकण्यासारखे आहे यात.ते आत्मसात करावे. जसे ज्ञानरूपी सागरात कितीही खोल जाण्याचा प्रयत्न केला तरी गुडघाभर हाती ज्ञान लागले तरी खूप आहे .तसेच आहे हे तंत्रज्ञान ..हे शिकून घ्या,इतरांना शिकवा,सोपे आहे .आपण त्याचा बाऊ करतो."मला येईल का?मी हात लावला तर काही होईल का?" असे अने प्रश्न मनात असतात.पण या तंत्रज्ञानाशी मैत्री करा.जे ज्ञान प्राप्त होईल त्याचा आनंद खूप असेल. तो अवर्णनीय असेल.


चला तर मग विज्ञानाची कास धरु या

अंधश्रद्धांना दूर पळवून लावू या...

तंत्रज्ञानाने आपले ज्ञान अगदी

तरूण पिढीसमान अवगत करू या...


Rate this content
Log in