तिने फिरवली पाठ
तिने फिरवली पाठ


सूरजने दहावीनंतर सायन्स कॉलेजला अँडमिशन घेतली. नवनवीन मित्र,नवीन कॉलेज, मस्त चालले होते कॉलेज जीवन. सूरज मुळातच खूप हुशार होता.
वागणं,बोलनं एखाद्या निवेदकाला लाजवेल असे होते. गाणी पण छान म्हणायचा. अभ्यासात पण टॉप वर असायचा नेहमी. असे असेल तर फेवरिट स्टुडेंट व्हायला किती वेळ लागणार? बारावी उत्तीर्ण झाल्यावर डिप्लोमाला अँडमिशन घेतली. एक नवीन मुलगी आली होती त्यांच्या क्लासमधे. जिज्ञासा नाव होते तिचे. दिसायला तशी बरी होती. पण सूरज तिच्या प्रेमात पडला होता. पण तिच्या मनात काय होते माहिती नाही. एकदा कॉलेजमध्ये फंक्शन होते. त्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स होते. सूरजने देखील त्यात भाग घेतला होता. बेस्ट अँकर आणि बेस्ट सिंगर म्हणून अँवार्ड पण मिळाले त्याला. आता एकच इव्हेंट बाकी होता..आणि त्यामध्ये सगळ्यानी भाग घ्यावा असा नियम होता. इव्हेंट होता चॉकलेट बॉय आणि चॉकलेट क्वीनसाठी.
जिज्ञासा फारशी कुणाला ओळखत नव्हती. समोरच बाकीच्या मुलींसोबत बसली होती. चॉकलेट बॉय अँवार्ड मिळवण्यासाठी मुलांची झुंबड उडाली होती. जो तो आपापल्या परीने लाईक्स मिळवण्यासाठी धडपड करत होता. एकंदरीत काय तर जो स्टेजवर जाईल त्याच्या विषयी इतरांनी आपल्या भावना व्यक्त करून चॉकलेट द्यायची. सूरज सगळ्याचा फेव्हरिट. त्याला भरपूर लाईक्स आणि चॉकलेट मिळाली. आणि अँवार्डसुध्दा.किती छान ना... एकाच वेळी तीन अँवार्ड. बेस्ट अँकर.. बेस्ट सिंगर... चॉकलेट बॉय...
आता मुलींमध्ये चॉकलेट क्वीनसाठी खेचाखेच सुरू झाली. कॉलेज नियमानुसार जिज्ञासाला पण त्यात भाग घ्यावा लागला. जिज्ञासा स्टेजवर गेली तशी तिलाही भरपूर चॉकलेट नि लाईक्स मिळाली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण खरी गंमत तर पुढे होती.
सूरज जिज्ञासावर प्रेम करत होता. तिनेच चॉकलेट क्वीन व्हावे असे त्याला वाटत होतं. म्हणून त्याने आधीपासूनच मित्रांना सांगितले होते. सगळ्यांनी तिला चॉकलेट द्या म्हणून. दिली सर्वांनी आणि जिज्ञासा बनली चॉकलेट क्वीन. पण तिने सूरजने दिलेली कँडबरी घेतली नाही. सूरज टेबलवरच ठेवून गेला. नंतर मात्र तिने गूपचूप ती कँडबरी आपल्या पर्समध्ये ठेवली.
कॉलेज संपत आले तरीही तिने सूरजची फ्रेंडशिप सुध्दा अक्सेप्ट केली नव्हती. तो खूप प्रेम करायचा तिच्यावर. मित्र पण त्याला चिडवायला लागले. अरे तुला तिच्यापेक्षा छान पोरगी भेटेल.. का तिच्या मागेपुढे करतो. पण कशाचं काय. एकदा तरी तिला विचारायचे असं ठरवलं. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी सूरजने तिला विचारलं धीर करून... मला तू खूप आवडतेस.. लग्न करशील माझ्याशी? ती काहीच न बोलता निघून गेली. गेली ती गेलीच. पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. नंतर समजले की तिचे लग्न आधीपासूनच ठरले होते. सूरजचे प्रेम उमलण्याआधीच कोमेजून गेले. सूरजनेदेखील हा विषय तिथेच सोडला आणि आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वप्ने पाहू लागला. करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करू लागला.
तात्पर्य काय तर... एखादी गोष्ट मनासारखं झाली नसेल... होत नसेल तर तिथेच सोडून द्या...कदाचित त्यापेक्षा कितीतरी पटींनी अजून काही तरी चांगले तुमच्या आयुष्यात घडणार असेल असा विचार करा आणि पुढे चालत रहा.