ती आणि मी
ती आणि मी
तिची आणि माझी नाळ ही खूप जुनी आहे तसे म्हणाल तर बालपणापासून. इयत्ता चौथी मध्ये तीला समजावून घेण्याचा प्रयत्न केला खुप दिवस लागले तिला समजण्यासाठी. रोज न चुकता मी तिच्याकडे जायचो जिच्या सोबत फिरण्याचा प्रयत्न करायचो कधी कधी आमचा दोघांचा अर्धा प्रवास होत असे तर कधी कधी काही कारणास्तव प्रवास मधीच सोडून तिच्या सोबत निवांत चालत यावे लागत असे.
सुरुवातीला तिची आणि माझी नाळ जुळे पर्यन्त खूप प्रयत्न केले. कधी रिकाम्या शेता मध्ये तर कधी कधी तर रोडवरच हिच्याशी गप्पा मरात आणि समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला. कधी कधी तर हिच्या नादमध्ये कित्येक वेळा कोणाचा ना कोणाचा मार ही खावा लागला आहे तर कधी कधी तिला खांद्यावर घेऊन परत यावे लागले आहे. म्हणतात ना प्रेम हे खूपच आंधळे असते हे मला हिच्या सोबत असताना जाणवायला लागले होते. सर्वात पहिले मी जिच्या प्रेमात पडलो तिने मला खूप काही गोष्टी शिकविल्या. जसा घरातून बाहेर पडायचो तास तिला फिरायला सोबत घेऊनच जायचो ती सोबत असताना मला वेळेचे काहीच भान नसायचे. जेव्हा मी घरी पोहचायचो तेव्हा आई कडून खूप शिव्या खायचो. आई म्हणायची हिला सोबत घेऊन गेलास की तुला काहीच सुधरत कसे नाही रे एकदाचा गेलास की आम्हा सर्वांना विसरून जातोस. असे खूप वेळा माझ्या आईने मला तिच्यामुळे सुनवले आहे पण तू माझ्या मनात जशी होती तशीच राहिली. कित्येक वेळा आम्ही मित्रानं सोबत तिला घेऊन बाहेर फिरायला गेलो, कधी शाळेतील सहलीसाठी तर कधी मित्र मित्र मिळून संध्याकाळी. तिला घेऊन मी एकदा मामाच्या गावी पण गेलो होतो. काही दिवसांनी ती मला न सांगता सोडून गेली मग काय मी खूप हताश झालो जणू माझे मनच तुटले. काही दिवस कर्मेनासे झाले कसे बसे दिवस ढकलले मना मध्ये विचार केला खुप साऱ्या ट्रेन स्टेशनवर येतात आणि निघून जातात अशीच ही सुद्धा माज्या आयुष्यतून निघून गेली.
थोडयाच दिवसात मी कॉलेज मध्ये जायला लागलो. तसे कॉलेज आणि हॉस्टेल मधील अंतर खूपच कमी होते पण रोज दुपारी क्लासेस सुरू असायचे तेव्हा परत एकदा मी दुसरीच्या प्रेमात पडलो . कधी युनिव्हसिटी सोबत फिरायला जायचो तर कधी कोल्हापूर फिरायला सोबत जायचो तसे आम्ही सोबत पूर्ण एक ते दीड वर्ष घालविली आणि खूप मस्त मजा केली परत हेही कोणाला ना कोणाला मानवले नाही आणि आम्ही दोघे विभक्त झालो. तसाच हताश होत पुढच्या कामा साठी मी पुणे मध्ये आलो आणि जुन्या कोल्हापूर च्या तीला तिथेच सोडावे लागले.
पुण्या मध्ये आल्या नंतर एकच मन मध्ये विचार की आपले पुढचे जीवन हे तिच्या वीणा जगायचे. आणि तिच्या विना जगण्याची सुरुवात झाली पुढची ७-८ व
र्षे एकट्याने काढली. पण मना मधील तीची उणीव कोणीच भरून काढू शकत नव्हते जेव्हा तिच्या सारखी दिसणारी एकादी कोणी जाताना दिसली तर पाहतच बसावे असे वाटत असे . पुन्हा मना मध्ये विचार येऊ लागले ते म्हणजे अत्ता परत याच पुणे मध्ये नवीन तीला शोधले पाहिजे. पुण्यामध्ये ती शोधणे म्हणजे तुम्हला महितच आहे की मुश्किल असते. ती एकटी आणि तिच्यावर प्रेम करणारे खूप सारे कारण पुणे हे एक मोठे शहर आहे. पुणे तिथे काय उणे, पुण्यमधील तीला जवळ करायचे असेल तर तितकीच किंमत ही मोजावी लागते. तुम्हला माहीतच आहे की शहर म्हंटले की नाटपटा, वीकेंड, पार्टी इ गोष्टीची चाहूल तीला लागलेली असतेच. ७-८ वर्षे पुण्यात राहिल्या नंतर विचार केला अत्ता साम, दाम, दंड भेद सगळे एकत्र करून तीच्या पुन्हा एकदा प्रेमात पडून तिला जिंकायचे आणि आपल्या सोबत ठेवायचे. खूप वर्षेच्या महिनतीतून, घरच्यांचा विरोध असताना देखील तिला मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तो पूर्ण झाला.
एके दिवशी तिला मी मिळविले पण आत्ता वेळ अशी होती की मी एका कंपनी मध्ये कामासाठी होतो तर तिच्या साठी मला वेळ काढणे खूपच कठीण होत होते. अशीच काही वर्षे निघून गेली आम्ही दोघे फक्त नावाला एकत्र होतो तेही एकाद्या शनिवार रविवारी मूड झाला तर एकत्र फेरफटका मारायचो नाही तर ती तशीच घरी बसलेली असायची. एक-दीड वर्षांनी मी ठरविले की अत्ता वेळ आली आहे तर या आपल्या तिच्या सोबत आपले जीवन एकदम आनंदात जगावे. तिथून तीची आणि माझी प्रेम कहाणी अधिकच मजबुत बनली.
तसे हे माझे नवीन प्रेम होते म्हणून तीला घेऊन मी रोज संध्याकाळी आळंदीच्या घाटावर जाऊन बसायचो. मस्त तीचे आणि माझे फोटो काढायचो. घाटावरच्या वातावरणाचा आनंद लुटायचो आणि रात्री परत घरी जायचो. एकदा असेच ठरविले की तीला घेऊन पुणे ते मुंबई सफर करायची मग काय ती सोबत आहे म्हंटले की सफर न कळत पूर्ण होणारच यात काही शंकाच नाही पुणे मुंबई सफर ही तिच्या सोबत पूर्ण केली. इतकेच काय तर तील घेऊन मी रात्री पूर्ण मुंबई चा नजरा पहिला. काय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मारिन लाईन वाह तीला घेऊन मस्त म्हणजे न विसारणारा प्रवास झाला तिचे आणि माझे फोटो तर काही विचारूच नाका मोबाईल भरू प्रयत्न काढले. पण ती बिचारी अजिबात दमली नाही मला पूर्ण पणे शेवट पर्यंत साथ दिली. अणखी सांगेल तेवढे कमीच तीला घेऊन मी लोणावळा, सिंहगड, तुळापूर इ सारखी खूप ठिकाणे पाहिली ती ही खुश आणि मीही खूश.
अत्ता ती म्हणजे कोण हा प्रश्न पडला असेलच ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसुन माझी प्रिय "सायकल" आहे.