Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Ashutosh Purohit

Others

2  

Ashutosh Purohit

Others

ती आणि मी

ती आणि मी

2 mins
2.6K


उद्यापासून पुन्हा ती तिच्या विश्वात गुंग, अन मी माझ्या..

सहा दिवसांच्या धकाधकीनंतर एक रविवार निवांत मिळतो आम्हाला. खिडकीशी बसून बाहेरचा वारा खात, एकमेकांशी मनातल्या गोष्टी share करतो आम्ही दोघे. तीही मग आणखीन खुलते. आठवड्याभराचा professional attitude बाजूला ठेवून थोडी हलकी होते. खरंतर आठवडाभर आम्ही दोघेही परीट घडीत वावरतो. रविवारी त्या घडीतल्या चुण्या निवारण्याचा दिवस असतो. मग पुन्हा छानशी इस्त्री मारून हसऱ्या चेहऱ्याने उगवत्या सोमवारला आणि वाहत्या जगाला सामोरं जायचं.

आज ती जरा उदास होती. पाऊस पडला होता म्हणून असावी.. पण तरीही बोलली सगळं मनातलं माझ्याशी.

"मला माहित्ये रे, रोज सकाळी तुझ्या डोळ्यांसमोरून मी अशी घाईघाईनं बाहेर पडते. नीट बोलायलाही फुरसत नाही मिळत आपल्याला."

"तुझ्या या speed ची आणि attitude ची भीतीच वाटते मला कधीकधी." मी म्हटलं. तशी ती हसायला लागली. चेहऱ्यावरचे उदास भाव कुठच्या कुठे पळून गेले.

"वेडा.. घाबरायचं काय त्यात? माझ्याबरोबरच तूही पटपट हालचाली कराव्यास म्हणून करते मी तसं. बर आपल्यावर tensions काय कमी आहेत का? मग सकाळी असा रटाळपणा कसा चालेल?" ती आणखीनच बिलगत म्हणाली.

"आज बांद्राच्या आज्जींकडे नाही जायचं? एकट्या असतात ना बिचाऱ्या?" तिनं विचारलं.

"हो जायचंय ना. संध्याकाळी जाईन. तू आहेस ना फ्री?"

"Of course." ती खांदे उडवत attitude मधे म्हणाली.

नंतर थोडा वेळ आम्ही काहीच बोललो नाही. तिचं हे रूप पुन्हा आठवडाभर बघायला मिळत नाही, म्हणून आत्ताच साठवून घेतो जमेल तितकं.

एरवी काय. ती 'विरार' आणि 'चर्चगेट' अशी दोन ठळक नावं कपाळावर झळकवीत धावत असते.

"जेवतेस ना गं वेळच्यावेळी?" असं मी जेव्हा तिला विचारतो तेव्हा काहीही न बोलता त्याच ऐटीत प्लॅटफॉर्म सोडत भरधाव वेगाने ती मला घेऊन जाते. 'भावुक होण्याची ही वेळ नाही. काम महत्वाचं.' ती सांगून जाते.

म्हणूनच आज मुद्दाम तिचा मोकळा रविवार थोडा वाचून काढला मी. म्हटलं न्याहाळूया तिच्या डब्यामधे काही दुखरे वारे घुसमटतायत का. पाहूया तिच्या गजावरचे तिचेच असणारे काही दुर्लक्षित अश्रू.. लोक ज्याला 'पावसाचं पाणी' म्हणतात असे!

मुंबईची ही लक्ष्मी मुंबईत आनंदानं बागडत्ये ना, इतकंच मला विचारायचं असतं. तीही त्याच attitude मधे 'of course' असं उत्तर देते.

मी ब्रिज उतरून आनंदानं स्टेशन च्या बाहेर पडतो.

बाकी उद्यापासून काय हो!

पुन्हा ती तिच्या विश्वात गुंग, अन मी माझ्या.


Rate this content
Log in