Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Others


4.4  

Sangieta Devkar

Others


तिचे अवकाश

तिचे अवकाश

8 mins 872 8 mins 872

 सीमा स्वहताचे आवरून जेवण उरकून अक्षय ची वाट पहात डायनींग टेबल वरच बसली होती. रोज अक्षय ला घरी यायला उशीर व्हायचा कधी तो जेवून यायचा कधी घरी जेवायचा म्हणून सीमा रिया आणि वरुण सोबत मुलां सोबत जेवून घ्यायची. अक्षय एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला होता. कामा मुळे तो परदेशी ही वारंवार जायचा.दिसायला स्मार्ट कामात हुशार त्यामुळे त्याला स्वहता बद्दल अहंकार पण जास्तच होता. सीमाही डबल ग्रॅज्युएट झाली होती. पण अक्षय च्या इगो मुळे त्याने तिला जॉब करू नाही दिला. त्याच्या प्रेमा खातर तिने घर सांभाळणे आनंदाने स्वीकारले.


सुरवातीचे नवीन नवलाई चे दिवस पटकन निघून गेले पण कायम एक गोष्ट खटकायची की अक्षय तिला नेहमी स्वहता पेक्षा कमी लेखायचा पण ती ही गोष्ट सुद्धा इग्नोर करत असे. नतर तिला रिया आणि वरुण ही दोन गोड मुलं झाली त्याच्या सोबत ती खुश राहायची. अक्षय मात्र त्याच्यात असूनही नसल्या सारखा असायचा . रात्री खूप उशीर अक्षय घरी आला. सीमा कंटाळून तिथेच झोपी गेली होती. दाराच्या लैच च्या आवाजाने तिला जाग आली . तिने पटकन त्याला विचारले अक्षय जेवायला वाढू का ? काही नको मी जेवून आलो आहे असे म्हणत तो बेडरूम मध्ये गेला पण एका शब्दाने पण त्याने तिला तू जेवली का किंवा इतका वेळ माझी वाट पहात होती का ? असे काहीही विचारले नाही . कसा विचारणार ना तो शेवटी पुरुषी अहंकार! सीमा ही त्याच्या मागे बेडरुम मध्ये गेली . अक्षय कपडे बदलून पटकन झोपला . सीमा ही शेजारी झोपली . तिचे डोळे भरून आले कारण कित्येक दिवस झाले अक्षय लवकर येवो किंवा उशिरा येवो तो तिला जवळ घेऊन साधी तिची चौकशी ही करत नव्हता त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तिला स्वहताच्या मना सारख फक्त ओरबाडून घ्यायचा. याचेच तिला वाईट वाटायचे याला कारण होती प्राजक्ता. त्याची ऑफिस मधली कलीग. गेली चार वर्षे दोघांच अफ़येर सुरू होतं.तिनेच एकदा अक्षय च्या नकळत त्यांचे चॅट मेसेजेस पाहिले होते. पण त्यांचे अफयेर सीमा ला हे माहीत आहे याची अक्षय ला कल्पना नव्हती. पण सीमा खूप साधी आणि सोशिक अशी होती तिला वाटले हे थोडं आकर्षण असेल त्या दोघांना एकमेकांचं कारण एकत्र काम करतात त्यामुळे अक्षय कधीतरी सुधरेल त्याला मुलांची जबाबदारी समजेल असे मानून सीमा गप्प होती . तिला संसार मोडायचा नव्हता. पण अक्षय स्वहताच्या धुंदीत मस्त होता. त्याला वाटायचे सीमा काय साधारण बाई आहे प्राजक्ता बोल्ड आणि स्मार्ट !. शेवटी पुरुषांना बायको बायको सारखी आणि मैत्रीण मात्र बोल्ड आणि स्मार्ट हवी असते. असा काहीसा प्रकार होता. सकाळी सीमा लवकर उठून मुलांना तयार करून स्कुल बस पर्यंत सोडून यायची . मग अक्षय चा नाष्टा डबा तयार करायची. पण अक्षय ला तिची कदर नव्हती. नाष्टा करत असताना अक्षयचा फोन वाजला त्याला मेसेज आला होता परत लागोपाठ 2 मेसेज आले फोन त्याने बेडरूम मध्ये चार्जिंग ला लावला होता . सो त्याने सीमा ला सांगितले फोन बाहेर आण. सीमा पटकन गेली आणि त्याचा फोन बघत बघत बाहेर आली तसा अक्षय तिच्यावर ओरडला फोन काय बघतेस कोणाचे मेसेजस पाहू नयेत इतके पण मॅनरस नाहीत का तुला ? सीमा म्हणाली नाही मी न्हवते पहात काही ते सहजच तिला मध्येच तोडत अक्षय म्हणाला नॉनसेन्स पुन्हा माझा फोन पाहायचा नाहीं . सीमा ला खूप वाईट वाटले. ती गप्प बसली . तिला माहीत होते की प्राजक्ता चे मेसेज असणार म्हणून तो खवळला . अक्षय खाऊन झाल्यावर बाहेर पडला. सीमाचे डोळे भरून आले ती तशीच आसवे गाळत राहिली. तो कायम तिचा अपमान करायचा. आणि ती शांत राहून ते सहन करायची. तिला आई वडील न्हवते ती लहान असताना एका अपघातात ते गेले. मामा कडे ती लहानाची मोठी झाली . शिक्षण केले आता आपल्या मुळे मामा मामी ला अजून त्रास नको काही म्हणून ती अक्षय चे वागणे सहन करत होती. कोणाला काही बोलत नव्हती.आज वरुण चा 10 वा वाढदिवस होता अक्षय ने मोठी पार्टी ठेवली होती त्याच्या ऑफिस स्टाफ आणि वरूण च्या मित्रांना बोलावले होते. एका हॉटेल मध्ये पार्टी होती . संपूर्ण पार्टी मध्ये अक्षय प्राजक्ता सोबत च फिरत होता सीमा चे त्याला काही पडले नव्हते पण त्या कडे ही सीमा ने कानाडोळा केला . पार्टी छानच झाली वरूण रिया खूप खुश होते. रात्री सर्व घरी परतले.आज अक्षय ही खुश होता त्यामुळे किती तरी दिवसांनी त्याने सीमा ला जवळ केले आणि तुटून पडला तिच्या शरीरावर आणि स्वहताची तृप्ती झाल्यावर शांत झोपला देखील. सीमा विचार करू लागली या घरात माझं माज्या मनासारखं काहीतरी आहे का. कुठेच माझ्या मनाला आणि मताला देखील किंमत नाही मुलां साठी मी सगळं सहन करते पण म्हणून मला मन भावना नाहीत असे होत नाही ना पण कोणाला बोलणार हे सगळं .? सीमा या विचारातच झोपी गेली. सकाळी सगळे घरा बाहेर पडले सीमा एकटीच होती तिचा फोन वाजला तिने पाहिले तिची बेस्ट फ्रेंड नीता चा फोन होता. तिने घेतला म्हणाली नीता अग किती दिवसांनी केलास फोन कशी आहेस तू ? माहेरी आली आहेस का ? नीता म्हणाली हो हो अग किती प्रश्न मी मजेत आहे मी आता तुला भेटायला येतेय घरी मग बोलू निवांत चालेल ? हो नीता ये लवकर मी वाट पाहते अस म्हणत सीमा ने फोन ठेवला. आणि घर आवरू लागली. थोडयाच वेळात नीता आली. दोघी कॉलेज च्या खास मैत्रिणी नीता माहेरी आली की सीमा ला आवर्जून भेटत असे . नीता खूप बडबडी त्यामुळे ती बोलतच होती सीमा मात्र ऐकत हसत तिचे बोलणे ऐकत होती. नीता म्हणाली बाकी काय म्हणतात आमचे भाऊजी खूप लाड करत असतील ना तुझे इतकं छान तू घर सांभाळतेस मूलांकडे बघतेस . सीमा फक्त हु म्हणाली . आणि सीमा तुमच्या लग्नाला 12 वर्ष होतील ना ग आता. हो सीमा म्हणाली . ओहह तरी तू किती छान स्वताला मेन्टेन ठेवले आहेस . भाऊजीचे खूप प्रेम असेल ना ग तुझ्यावर ? पण सीमा यावर गप्प बसली. तिच्या चेहर्या कडे पाहून नीता ला समजले काहीतरी घोळ आहे . नीता म्हणाली सीमा बोल काय आहे तुझ्या मनात. तू कायम अशी शांत सोशिक बनून राहतेस .सगळं ठीक आहे ना संसारात तुझ्या ? मला समजतंय तुझ्या चेहर्या कडे पाहून आणि तू जास्त बोलत ही नाहीयेस सांग मला . नीता ने इतकं विचारल्यावर सीमाला राहवले नाही ती रडू लागली.

नीताने तिला जवळ घेतले म्हणाली रडू नको सीमा बोल काय प्रॉब्लेम आहे. मी तुला नक्की मदत करेन. मग सीमा ने अक्षय चे वागणे त्याचे प्राजक्ता सोबत चे अफेयर सगळं नीता ला सांगितले . यावर नीता म्हणाली अग कुठल्या जमान्यात राहतेस सीमा आणि का हे सगळं सहन करतेस? अक्षय ला धडा शिकवायचा सोडून तू रडत बसतेस. काय करू शकते मी नीता ? मला माहेरचा ही आधार नाही ग सीमा म्हणाली. हो सीमा पण म्हणून तू तुझा स्वाभिमान पण गमावून बसली आहेस का ? तू डबल ग्रॅज्युएट आहेस हे विसरलीस का? अग अक्षय ला सांग आता मुलं मोठी झाली आहेत मी घरी बसणार नाही नोकरी करनार हे ठणकावून सांग. आणि त्याच्या अफ़येर बद्दल पण बोल मग बघू कसा तुला नोकरी करू देत नाही तो.. सीमा तू स्वताच्या पायावर आधी उभी रहा. मग पुढे बघू काय करायचे. अक्षय ला त्याची चूक समजली तर ठीक नाहीतर बघू काय करता येईल पण तू जॉब शोधत रहा मी पण तुझ्या साठी प्रयत्न करते. सीमा ला तिचे म्हणणे पटले जो पर्यंत ती काही स्टँड घेत नाही तो पर्यंत अक्षय ला ही तिची किंमत कळणार नाही . ती म्हणाली हो नीता तू म्हणतेस तसेच करेन मी . येस ग्रेट सीमा आणि मी आहे कायम तुझ्या सोबत . मग जेवण करून नीता निघून गेली . सीमा ने लगेचच ऑनलाईन प्रोफाईल बनवले आणि आपण जॉब करायचाच असा निग्रह केला. थोड्याच दिवसात तिला एका कॉलेज कडून जॉब ऑफर आली . तिने ती स्वीकारली . आणि आजच अक्षय ला हे सांगायचे असे ठरवले . रात्री अक्षय उशिरा च आला . ती जागीच होती. ती म्हणाली अक्षय मला बोलायचे आहे तुझ्याशी. अक्षय म्हणाला,आता मी दमलो आहे उद्या बघू असे पण तुला काय बोलायचे असणार किराणा संपला किंवा काही आणायचे असेल सो झोप आता. नाही अक्षय मला महत्वाचं बोलायचे आहे ती म्हणाली. अक्षय भडकला म्हणाला, तुला समजत नाही का मी दमून आलो आहे . सीमा म्हणाली दमायला काय तू ओव्हर टाईम करून आलास का प्राजक्ता सोबत? हे ऐकताच अक्षय ने तिला जोरात थप्पड लगावली. सीमा तशी रागात म्हणाली का मी बोलले ते खोटे आहे का ? तुझे आणि प्राजक्ता चे काय चाललय मला सगळ माहीत आहे. अक्षय म्हणाला हो आहे आमचं अफेयर तुला काय करायचे ते कर..आय डोन्ट माइंड तुला डिओर्स घ्यायचा तर घे मी माझ्या मुलांना सांभाळू शकतो तितका मी कमावतो ओके . सीमा म्हणाली, हे घर कायद्याने माझं सुद्धा आहे मी इथून कुठेच बाहेर जाणार नाही आणि मुलांना मी सुध्दा सांभाळू शकते कारण उद्या पासून मी ही जॉब करणार आहे . तुझे वागणे इतके दिवस सहन केले आता नाही . आणि अक्षय तुला या घरात राहायचे तर रहा मात्र डिओर्स मी तुला अजिबात देणार नाही . आज पर्यंत मी मुलां कडे पहात त्यांच्या साठी जगले आता ही त्यांच्या सोबतच जगेन . इतकं बोलून सीमा बेडरूम मधून बाहेर आली आणि मुलांच्या रुम मध्ये गेली . अक्षय ला अनपेक्षित असा हा धक्का होता . त्याला हे समजत न्हवते की सीमा अशी बदलली कशी ? त्याच्या सारख्या पुरूषांना हे समजत नाही की स्त्री तशीच वेळ आली तर वाघिणीचे रूप घेऊ शकते ती शांत आहे तोपर्यंत शांत नाहीतर ती महाकाली बनते . कधी कधी परिस्थिती तीला तसे बनायला भाग पाडते . सकाळी लवकर उठून सीमा ने सगळं काम आवरले. अक्षय चा नाष्टा डबा बनवला . मुलांना तयार केले . अक्षय टेबलवर आला होता स्वहताचे आवरून नाष्टा करायला. सीमा त्याला किचनमध्ये नाही दिसली . तो स्वहता हातानें नाष्टा घेऊन खात होता. इतक्यांत सीमा मस्त छान ड्रेस घालून केस क्लीप लाऊन मोकळे सोडून हलकीशी गुलाबी लिपस्टिक लावून तयार होऊन मुलां सोबत बाहेर आली . अक्षय तीच्या या बदललेल्या रूपा कडे पाहतच राहिला. मुलाना तिने सांगितले की ती संध्याकाळी पाळणा घरातून त्यांना पिकअप करेल . आणि मुलांना बस पर्यंत सोडायला गेली. घरी येऊन तिने तिचा डबा घेतला आणि अक्षय कडे न पाहताच बाहेर पडली. नीता चा कॉल आला तिला बेस्ट लक देण्यासाठी साठी. आज सीमाला तीचे अवकाश गवसले होते सो नीता ही जाम खुश होती. एका कॉलेजमध्ये सीमा लेक्चर म्हणून लागली होती. आता तिने ठरवले होते आता" मागे वळुन नाही पाहायचे फक्त पुढे जायचे". खूप समाधान आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. .

 समाप्त ....

 . 


Rate this content
Log in